settings icon
share icon
प्रश्नः

प्रार्थना आणि उपवास? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण प्रार्थना आणि उपवास?

उत्तरः


जरी प्रार्थना आणि उपवास यांच्यामधील संबंधाच्या बाबतीत वचनांमध्ये विशिष्ठपणे स्पष्ट केले नसले, तरी शास्त्रामध्ये नोंदवलेल्या प्रार्थना आणि उपवासाच्या सर्व घटनांमध्ये दोघांना जोडणारा एक सामान्य धागा दिसून येतो. जुन्या करारामध्ये प्रार्थनेबरोबर उपवास हा वास्तविक किंवा अपेक्षित आपत्तीच्या वेळी गरज आणि अवलंबून असणे आणि/किंवा पूर्णपणे असहाय्यतेच्या भावनांशी संबंधित असल्याचे दिसून येतो. जुन्या करारात प्रार्थना आणि उपवास यांना एकत्रितपणे दुःखाच्या, पश्चात्ताप आणि/किंवा गहन आत्मिक गरजेच्या काळात केले गेले आहेत.

नहेम्याच्या पहिल्या अधिकारामध्ये नहेम्याने प्रार्थना आणि उपवास केल्याचे वर्णन केले आहे, कारण यरुशलेम ओसाड झाल्याची बातमी ऐकल्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले होते. त्याच्या बऱ्याच दिवसांच्या प्रार्थनेमध्ये अश्रू, उपवास, त्याच्या लोकांच्या वतीने कबुली आणि देवाने कृपा करावी म्हणून याचना ही वैशिष्ठ्ये होती. त्याच्या चिंतांचा उद्रेक इतका तीव्र होता की, बहुदा हे समजण्यापलीकडले होते की अशा प्रार्थनेच्या मध्येच त्याने खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी “विश्रांती” घेतली असेल. यरुशलेममध्ये झालेल्या विध्वंसामुळे दानिएलला सुद्धा अशीच स्थिती घेण्याची प्रेरणा मिळाली: “हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोनताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले” (दानिएल 9:3). नहेम्यासारखेच दानिएलने सुद्धा देवाकडे त्याने त्याच्या लोकांवर दया करावी म्हणून उपवास करून अशी प्रार्थना केली की, “आम्ही पाप केले, कुटीलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय यांपासून आम्ही परावृत्त झालो” (वचन 5).

जुन्या करारातील अनेक घटनांमध्ये, उपवास हा मध्यस्थीच्या प्रार्थनेबरोबर जोडला गेला होता. दावीदाने त्याच्या आजारी मुलासाठी उपवास करून प्रार्थना केली (2 शमुवेल 12:16); प्रामाणिक मध्यस्थी करताना देवासमोर रडला (व. 21-22). एस्तेरने मोर्दक्य आणि यहुदी लोकांना तिच्यासाठी उपवास करण्यास उद्युक्त केले कारण तिने तिचा पती जो राजा होता त्याच्यासमोर जाण्याची योजना केली होती (एस्तेर 4:16). स्पष्टपणे, उपवास आणि याचना हे एकमेकांशी जवळून संबंधित होते.

नवीन करारामध्ये सुद्धा उपवास करून प्रार्थना केल्याच्या घटना आहेत, परंतु त्यांचा संबंध पश्चात्ताप किंवा कबूल करण्याशी नाही. संदेष्ट्री हन्ना “मंदिर कधीही सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे” (लूक 2:37). वयाच्या 84 व्या वर्षी, तिच्या प्रार्थना आणि उपवास हे देवाच्या मंदिरात तिच्या सेवेचा एक भाग होती, कारण ती इस्राएलच्या वचनदत्त तारणहाराची वाट बघत होती. अजून नवीन करारामध्ये, अंत्युखीयाच्या मंडळीने सुद्धा उपवास करून आराधना केली, जेंव्हा पवित्र आत्मा त्यांच्याशी शौल आणि बर्णबा यांना देवाच्या कामासाठी सोपवण्याबद्दल बोलला. त्या वेळी, त्यांनी उपवास करून प्रार्थना केली आणि त्या पुरुषांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना पाठवून दिले. म्हणून, आपण या प्रार्थना आणि उपवासांच्या उदाहरणांना देवाच्या आराधनेचे आणि त्याची मर्जी मिळवण्याचे घटक असे बघतो. तथापि, जर प्रार्थना उपवास करून केली तरच देव त्याचे उत्तर देतो असे संकेत कुठेही मिळत नाही. त्याऐवजी, प्रार्थनेबरोबर उपवास हे प्रार्थना करणाऱ्या लोकांचा प्रामाणिकपणा आणि ते ज्या जटील प्रकारच्या परिस्थितीत अडकलेले आहेत त्याकडे निर्देश करत असल्याचे दिसते.

एक गोष्ट स्पष्ट आहे: उपवासाचा सिद्धांत हा प्राधान्यक्रमांचा सिद्धांत आहे, ज्यामध्ये विश्वासणाऱ्यांना देवाची अविभाजित आणि सखोल भक्ती करून आणि आत्मिक आयुष्याच्या चिंतांना व्यक्त करण्याची संधी दिली जाते. आपल्या पित्याशी अविरत संवाद साधण्याचा आनंद घेण्यासाठी काही काळ खाणे-पिणे यासारख्या सामान्य आणि चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या भक्तीला व्यक्त केले जाऊ शकते. उपवास असो किंवा नसो “परम पवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे” (इब्री लोकांस पत्र 10:19), हा त्या “चांगल्या गोष्टींच्या” सर्वात आनंददायक भागापैकी एक आहे जो ख्रिस्तामध्ये आमचा आहे. प्रार्थना आणि उपवास करणे हे ओझे किंवा कर्तव्य नसावे, परंतु त्याऐवजी देवाचा त्याच्या लेकारांच्यासाठी असलेला चांगुलपणा आणि दयाळूपणा यांचा उत्सव असावा.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रार्थना आणि उपवास? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण प्रार्थना आणि उपवास?
© Copyright Got Questions Ministries