मी माझ्या प्रार्थनांचे देवाकडून उत्तर कसे मिळवू शकतो?


प्रश्नः मी माझ्या प्रार्थनांचे देवाकडून उत्तर कसे मिळवू शकतो?

उत्तरः
अनेक लोकांचा असे विश्वास आहे की उत्तरित प्रार्थना म्हणजे देव त्याला केलेल्या प्रार्थना विनंतीचे उत्तर देतो. जर प्रार्थनेचे उत्तर दिले गेले नाही, तर त्यास "अनुत्तरित" प्रार्थना समजावे. तथापि प्रार्थनेविषयीचा हा चुकीचा समज आहे. देव त्याला करण्यात आलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देतो. कधी कधी देव "नाही" अथवा "थांब" असे उत्तर देतो. जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेनुसार त्याला मागतो केवळ तेव्हाच तो आमच्या प्रार्थनांचे उत्तर देण्याचे अभिवचन देतो. "त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जें धैर्य आहे : ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणें कांहीं मागितले तर तो आपले ऐकेल — आणि आपण जें काहीं मागतों ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे (योहानाचे 1 ले पत्र 5:14-15).

देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्याचा अर्थ काय आहे? देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करणे म्हणजे अशा गोष्टींसाठी प्रार्थना करणे ज्या देवास आदर व गौरव देतात आणि/अथवा अशा गोष्टींसाठी प्रार्थना करणे ज्याविषयी बायबल स्पष्टपणे देवाची इच्छा असल्याचे प्रगट करते. जर आपण अशा गोष्टींसाठी प्रार्थना करतो जिच्याद्वारे देवाचे गौरव होत नाही किंवा जी आमच्या जीवनांसाठी देवाची इच्छा नसते, तर जे काही आम्ही मागू ते देव आम्हास देणार नाही. देवाची इच्छा काय आहे ते आपण कसे जाणू? जेव्हा आम्ही देवाजवळ बुद्धी मागतो तेव्हा ती देण्याचे आम्हास अभिवचन देतो. याकोबाचे पत्र 1:5 मध्ये घोषणा करण्यात आली आहे की, "जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणाने देतो." सुरूवात करण्याचे उत्तम स्थान आहे थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 5:12-24, ज्यात अनेक गोष्टींचा आराखडा देण्यात आला आहे ज्या आमच्यासाठी देवाची इच्छा आहेत. आम्ही देवाचे वचन जितके चांगल्याप्रकारे समजू, तितक्या चांगल्याप्रकारे काय प्रार्थना करावी ते आम्हास कळून येईल (योहान 15:7). कशासाठी प्रार्थना करावी हे आम्ही जितक्या चांगल्याप्रकारे जाणू, तितक्यांदा देव आमच्या विनंत्यांचे उत्तर "होय" असे देईल.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
मी माझ्या प्रार्थनांचे देवाकडून उत्तर कसे मिळवू शकतो?