settings icon
share icon
प्रश्नः

आपण पिता, पुत्र किंवा पवित्र आत्मा यातील कोणाकडे प्रार्थना करावी?

उत्तरः


सर्व प्रार्थना आपला त्रीएक देव-पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याला निर्देशित केल्या पाहिजेत. पवित्र शास्त्र आपणास शिकविते कि आपण एकाकडे किंवा तिघांकडे प्रार्थना करू शकतो कारण तिघे एकच आहेत. स्तोत्रकर्त्या-बरोबर आपण पित्याजवळ प्रार्थना करू शकतो: “हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे” (स्तोत्रसंहिता 5:2). प्रभु येशूला, आपण पित्यासमान प्रार्थना करतो कारण ते समान आहेत. त्रैक्यातील एकाकडे प्रार्थना करणे म्हणजे त्यातील सर्वांकडे प्रार्थना करणे असे आहे. स्तेफन जेंव्हा रक्तसाक्षी होत होता तेव्हा त्याने अशी प्रार्थना केली कि, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर” (प्रेषित 7:59). आपण ख्रिस्ताच्या नावाने हि प्रार्थना करतो. पौलाने इफिसमधील विश्वास ठेवणाऱ्या लोकांना नेहमीच “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा” असे प्रोत्साहन दिले (इफिसकरांस पत्र 5:20). येशूने त्याच्या शिष्यांना आश्वासन दिले की त्यांनी जे काही त्याच्या नावाने मागितले - अर्थात त्याच्या इच्छेत - ते त्यांना दिले जाईल (योहान 15:16; 16:23). त्याचप्रमाणे, आपल्याला पवित्र आत्म्याने व त्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करण्यास सांगितले आहे. कशी आणि कशासाठी प्रार्थना करायची के आपल्याला माहित नसते तेंव्हा पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना करण्यास मदत करतो (रोमकरांस पत्र 8:26: यहूदाचे पत्र 20). त्रैक्याची प्रार्थनेतील भूमिका समजून घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पुत्राद्वारे (किंवा त्याच्या नावाने) पित्याला प्रार्थना करतो. तिघेही विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या प्रार्थनेत सक्रिय सहभागी असतात.

याचरोबर, आपण कोणाची प्रार्थना करू नये हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. काही गैर-ख्रिश्चन धर्म त्यांच्या अनुयायांना देव, मृत नातेवाईक, संत आणि आत्मे यांची प्रार्थना करण्याचे प्रोत्साहित करतात. रोमन कॅथोलिक लोकांना मरियम आणि विविध संतांची प्रार्थना करण्यास शिकवले जाते. अशा प्रार्थना शास्त्रवचनात्मक नसून त्या वास्तविकरीत्या आपल्या स्वर्गीय पित्याचा अपमान आहे. हे समजण्यासाठी, आपल्याला केवळ प्रार्थनेचे स्वरूप पहावे लागेल. प्रार्थनेमध्ये अनेक घटक असतात आणि आपण जर त्यापैकी दोनच घटक पहिले जे स्तुती आणि आभार मानणे आहे तर प्रार्थना हि मुळात आराधना आहे. जेव्हा आपण देवाची स्तुती करतो तेव्हा आपण त्याच्या गुणांबद्दल आणि आपल्या जीवनात त्याच्या कार्याबद्दल त्याची आराधना करत असतो. जेंव्हा आपण आभार प्रदर्शनाची प्रार्थना चढवत असतो तेंव्हा आपण त्याचा चांगुलपणा, दया आणि प्रेमाळूपणाची आराधना करतो. आराधना एकमेव गौरवाच्या पात्र देवाला गौरव देते. देव सोडून इतर कोणाकडेही प्रार्थना करण्याची समस्या ही आहे की तो आपला गौरव इतर कोणालाही देणार नाही. खरं तर, देवाशिवाय कोणालाही किंवा इतर कोणाकडे हि प्रार्थना करणे ही मूर्तिपूजा आहे. “मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही” (यशया 42:8).

प्रार्थना करण्याचे इतर घटक जसे की पश्चात्ताप, कबुलीजबाब आणि प्रार्थना हे सुद्धा आराधनेचे इतर प्रकार आहेत. देव क्षमा करणारा आणि प्रेम करणारा देव आहे आणि आपल्या पुत्राला वधस्तंभावर खिळल्याने त्याने क्षमा प्राप्तीचा मार्ग पुरविला आहे हे जाणून घेऊन आपण पश्चात्ताप करतो. “तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील”(1 योहान 1:9) म्हणून आपण आपल्या पापांची कबुली देतो आणि त्यासाठी त्याची आराधना करतो. तो आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्या प्रार्थना ऐकतो हे आपणास ठाऊक असल्यामुळे आपण आपल्या विनंती आणि मध्यस्थीची प्रार्थना घेऊन त्याजकडे येतो. तसेच, आपल्या दयेमुळे आणि प्रेमामुळे तो आपल्या प्रार्थना एकूण उत्तर देण्यास इच्छुक असल्यामुळे आपण त्याची आराधना करतो. आपण जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करतो, तेव्हा आपल्याला हे जाणणे सोपे आहे की आपल्या त्रीएक देवाव्यतिरिक्त इतर कोणाकडे प्रार्थना करणे अशक्य आहे कारण प्रार्थना एक प्रकारची आराधना आहे आणि आराधना केवळ आणि केवळ देवासाठीच राखीव आहे. आपण कोणाकडे प्रार्थना करावी? याचे उत्तर देवाकडे असे आहे. त्रीएकातील कोणाकडे प्रार्थना करायला हवी याहून केवळ आणि केवळ देवाकडेच प्रार्थना करणे जास्त महत्त्वाचे आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपण पिता, पुत्र किंवा पवित्र आत्मा यातील कोणाकडे प्रार्थना करावी?
© Copyright Got Questions Ministries