settings icon
share icon
प्रश्नः

प्रार्थनेचे सामर्थ्य काय आहे?

उत्तरः


प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे ही संकल्पना खूप लोकप्रिय आहे. पवित्र शास्त्रानुसार, प्रार्थनेचे सामर्थ्य, अगदी सोप्या पद्धतीने, देवाचे जो प्रार्थना ऐकतो आणि उत्तर देतो त्याचे सामर्थ्य हे आहे. खालील गोष्टी लक्षात घ्या:0

1) सर्वसामर्थी देव सर्व गोष्टी करू शकतो; देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही (लूक 1:37).

2) सर्वसामर्थी देव त्याची प्रार्थना करण्यासाठी त्याच्या लोकांना आमंत्रित करतो. देवाला प्रार्थना करताना त्यामध्ये सातत्यामध्ये (लूक 18:1), धन्यवादासहित (फिलीप्पैं 4:6), विश्वासाने (याकोब 1:5), देवाच्या इच्छेनुसार (मत्तय 6:10), देवाच्या गौरवासाठी (योहान 14:13-14), आणि देवाबरोबर योग्य अंतःकरण ठेवून (याकोब 5:16) करावी.

3) सर्वसामर्थी प्रभू परमेश्वर त्याच्या लेकरांची प्रार्थना ऐकतो. त्याने आपल्याला प्रार्थना करण्याची आज्ञा केली, आणि जेंव्हा आपण ती करेल तेंव्हा ती तो ऐकेल याचे अभिवचन दिले आहे. “मी माझ्या संकटात परमेश्वराचा धावा केला; माझ्या देवाला मी हाक मारिली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली” (स्तोत्र 18:6).

4) सर्वसामर्थी प्रभू परमेश्वर प्रार्थनेचे उत्तर देतो. “मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तु माझे ऐकतोस” (स्तोत्र 17:6). नीतिमान धावा करितात, तो ऐकून परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो” (स्तोत्र 34:17).

अजून एक लोकप्रिय संकल्पना ही आहे की, देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल की नाही हे तुमचा देवावर किती प्रमाणात विश्वास आहे हे ठरवते. तथापि, काहीवेळेस आमचा विश्वास कमी प्रमाणात असूनही देव आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. प्रेषित 12 मध्ये, मंडळी पेत्र तुरुंगातून सुटावा म्हणून प्रार्थना करत होती (वचन 5), आणि देवाने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर दिले (वचन 7-11). पेत्र प्रार्थनेच्या ठिकाणी जातो आणि दरवाजा ठोठावतो, परंतु जे लोक प्रार्थना करत असतात तेच लोक सुरवातील या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास नकार देतात की तो खरोखर पेत्रच आहे. त्याची सुटका व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली, परंतु त्यांच्या प्रार्थनेच्या उत्तराची अपेक्षा ठेवण्यात ते अयशस्वी झाले.

प्रार्थनेचे सामर्थ्य आपल्यापासून वाहत नाही; हे काही विशेष शब्द ज्यांना आपण म्हणतो किंवा विशेष पद्धतीने म्हणतो किंवा आपण हे किती वेळा बोलतो ते नाही. प्रार्थनेचे सामर्थ्य आपण एखाद्या विशिष्ठ दिशेला तोंड करून बसने किंवा आपल्या शरीराच्या विशिष्ठ स्थितीवर आधारित नाही. प्रार्थनेचे सामर्थ्य मानवनिर्मित वस्तू किंवा चिन्हे किंवा मेणबत्त्या किंवा मणी यांच्यापासून येत नाही. प्रार्थनेचे सामर्थ्य सर्वशक्तिमान, जो आपली प्रार्थना ऐकतो आणि त्याचे उत्तर देतो त्याच्यापासून येते. प्रार्थना आपल्याला सर्वसामर्थी देवाच्या संपर्कात आणून ठेवते, आणि जरी त्याने आपल्या याचिकांना स्वीकारले किंवा आपल्या विनंत्यांना नाकारले तरी आपण सर्वसामर्थी परिणामांची अपेक्षा केली पाहिजे. आपल्या प्रार्थनांचे उत्तर काहीही आसो, आपण ज्या देवाची प्रार्थना करतो तोच प्रार्थनेच्या सामर्थ्याचा स्त्रोत आहे, आणि तो आपल्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि वेळेनुसार उत्तर देऊ शकतो आणि उत्तर देईल.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रार्थनेचे सामर्थ्य काय आहे?
© Copyright Got Questions Ministries