settings icon
share icon
प्रश्नः

बहुदेववाद म्हणजे काय?

उत्तरः


बहुदेववाद अर्थात पोलीथेइजम हा असा एक विश्वास आहे कि जगात खूप देवी-देवता आहेत. यास खंडीत केल्यास “पॉली” हा शब्द ग्रीक शब्दापासून येतो ज्याचा अर्थ “अनेक” असा होतो आणि “थेइजम” या ग्रीक शब्दाचा अर्थ “देव” असा होतो. बहुदेववाद कदाचित मानवी इतिहासातील प्रमुख आस्तिक दृष्टिकोन आहे. प्राचीन काळी बहुदेवतेचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ग्रीक/रोमन पौराणिक कथा (झ्यूस, अपोलो, एफ्रोडाइट, पोसेडॉन इ.). बहुदेवतेचे सर्वात स्पष्ट आधुनिक उदाहरण म्हणजे हिंदू धर्म, ज्यात 300 दशलक्षाहून अधिक देव आहेत. जरी हिंदू धर्म, थोडक्यात, देवपंथी आहे, तरीही तो अनेक देवतांच्या श्रद्धांना धरून आहे. हे लक्षात घेणे रूचक आहे की बहुदेववादी धर्मातही, एक देव सहसा इतर देवांवर सर्वोच्च राज्य करतो, उदा., ग्रीक/रोमन पौराणिक कथांमध्ये झ्यूस आणि हिंदू धर्मात ब्रह्मण.

काहींचा असा युक्तिवाद आहे की पवित्र शास्त्र जुन्या करारामध्ये बहुदेववाद शिकवते. मान्य आहे, अनेक परिच्छेद बहुवचन मध्ये “देवता” चा संदर्भ देतात (निर्गम 20:3; अनुवाद 10:17; 13:2; स्तोत्र 82:6; दानियेल 2:47). प्राचीन इस्रायलला पूर्णपणे समजले की फक्त एकच खरा देव आहे, परंतु ते बऱ्याचदा त्याला अनुसरून जगले नाहीत, जसे की ते खरे असल्याचे मानत होते, आणि सतत मूर्तिपूजा आणि परदेशी देवतांची पूजा करत होते. तर या आणि इतर अनेक परिच्छेदांमधून आपण काय बनवायचे जे अनेक देवांबद्दल बोलतात? हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हिब्रू शब्द एलोहिम हा एक खरा देव आणि खोटे देवता/मूर्ती यांचा संदर्भ देण्यासाठी वापरला गेला. हे “गॉड अर्थात देव” या इंग्रजी शब्दाशी जवळजवळ एकसारखा होता.

एखाद्या गोष्टीचे “देव” म्हणून वर्णन करणे याचा अर्थ असा नाही की आपण त्याला दैवी अस्तित्व मानता. जुन्या कराराच्या बहुसंख्य शास्त्रवचनांमध्ये जे देवांबद्दल बोलतात ते खोटे देवता विषयी बोलत आहेत, जे देव असल्याचा दावा करतात परंतु ते देव नाहीत. ही संकल्पना 2 राजे 19:18 मध्ये सारांशित केली आहे: “त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठ व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.” स्तोत्रसंहिता 82:6 वर लक्ष द्या, “मी म्हणालो, 'तुम्ही “देव” आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात.' तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.”

पवित्र शास्त्र स्पष्टपणे बहुदेवताविरूद्ध शिकवते. अनुवाद 6:4, आपल्याला सांगते, “हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;” स्तोत्रसंहिता 96: 5 घोषित करते, “कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.” याकोबाचे पत्र 2:19 म्हणते, “एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.” फक्त एकच देव आहे. या जगात पुष्कळ खोटे देवता आहेत आणि जे देव असल्याचे भासवतात, परंतु फक्त एकच देव आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बहुदेववाद म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries