settings icon
share icon
प्रश्नः

देवाने पवित्र शास्त्रामध्ये बहुपत्नीत्व/द्विविवाह याला परवानगी का दिली?

उत्तरः


बहुपत्नीत्वचा प्रश्न हा एक मनोरंजक प्रश्न आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा बहुपत्नीत्वकडे बघण्याचा आजचा दृष्टीकोन ते अनैतिक आहे असा आहे तर पवित्र शास्त्र कोठेही स्पष्टपणे त्याला दोष देत नाही. पवित्र शास्त्रामध्ये बहुपत्नीत्व/द्विविवाह याची पहिली घटना उत्पत्ती 4:19 मध्ये लामेखाच्या बाबतीत घडली: “लामेखाने दोन बायका केल्या.” जुन्या करारातील अनेक प्रमुख पुरुष हे बहुविवाहवादी होते. अब्राहम, दावीद, शलमोन आणि इतर सर्वांना अनेक पत्नी होत्या. 1 राजे 11:3 च्या अनुसार शलमोनाच्या 700 पत्नी आणि 300 उपपत्नी (प्रामुख्याने खालच्या स्तरातील पत्नी) होत्या. आपल्याला या जुन्या करारातील बहुपत्नीत्वच्या घटनांबरोबर काय करायचे आहे? तीन प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरे देणे गरजेचे आहे: 1) देवाने जुन्या करारात बहुपत्नीत्वला परवानगी का दिली? 2) देवाचा आज घडीला बहुपत्नीत्वकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? 3) तो का बदलला?

1) देवाने जुन्या करारात बहुपत्नीत्वला परवानगी का दिली? पवित्र शास्त्र हे स्पष्टपणे सांगत नाही की देवाने बहुपत्नीत्वला परवानगी का दिली. जसे आपण देवाच्या शांततेबद्दल तर्क लावतो, तसे तेथे कमीत कमी एका मुख्य घटकाबद्दल विचार करणे गरजेचे आहे. पितृप्रधान समाजामुळे, अविवाहित स्त्रीसाठी स्वतःच्या गरजा भागवणे हे जवळजवळ अशक्य होते. बऱ्याचदा स्त्रीया अशिक्षित आणि अप्रशिक्षित असायच्या. स्त्रीया त्यांच्या गरजांच्या तरतुदीसाठी आणि सुरक्षेसाठी पित्यावर, भावांवर, आणि पतींवर अवलंबून होत्या. अविवाहित स्त्रीया बऱ्याचदा वेश्याव्यवसाय आणि गुलामीच्या कामी येत होत्या.

म्हणून, असे दिसून येते की, ज्या स्त्रीयांना पती मिळत नाही अशांचे संरक्षण आणि तरतूद करण्यासाठी कदाचित देवाने बहुपत्नीत्वला परवानगी दिली असावी. एक पुरुष अनेक पत्नी करून घेत असे, आणि त्या सर्वांचा पुरवठादार आणि संरक्षक म्हणून उपयोगी पडत असे. जरी बहुपत्नीवादी घरामध्ये राहणे हे आदर्शवादी नसले, तरी वेश्याव्यवसाय, गुलामी, किंवा उपासमार यासारख्या पर्यायांपेक्षा ते कितीतरी चांगले होते. संरक्षण/तरतूद या घटकांमध्ये भर म्हणून, बहुपत्नीत्वाने देवाच्या “तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा” (उत्पत्ती 9:7) या आज्ञेची पूर्तता करत, मानवतेला अधिक जलद गतीने विस्तारित होण्यास सक्षम केले. पुरुष एकाच वेळी अनेक स्त्रीयांना गर्भधारणा करवण्यात सक्षम होते, जे मानवतेला जर प्रत्येक पुरुषाने प्रत्येक वर्षी एकाच मुलाला निर्माण केले असते त्यापेक्षा अधिक जलद गतीने वाढवण्यास कारणीभूत ठरले.

2) देवाचा आज घडीला बहुपत्नीत्वकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? जरी बहुपत्नीत्वला परवानगी दिली असली, तरी पवित्र शास्त्र एकपत्नीत्वला देवाच्या आदर्श लग्नाच्या योजनेशी तंतोतन जुळणारे म्हणून प्रस्तुत करते. पवित्र शास्त्र असे सांगते की देवाचा मूळ उद्देश हा एका पुरुषाने केवळ एकाच स्त्रीशी लग्न करावे हा होता: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी [स्त्रियांशी नव्हे] जडून राहील, आई ती दोघे एकदेह [अनेक देह नव्हे] होतील” (उत्पत्ती 2:24). ज्या वेळी उत्पत्ती 2:24 लग्न म्हणजे काय याचे वर्णन करते, त्या वेळी किती लोकांचा समावेश आहे याची नोंद घेण्यापेक्षा एकवचनी रूपाच्या एकसारख्या वापराची नोंद घेणे आवश्यक आहे. अनुवाद 17:14-20 मध्ये देवाने सांगितले की, राजांनी पुष्कळ बायका करू नयेत (किंवा घोडदळ किंवा सोनेरूपे). तरी त्याचा अर्थ राजांनी एकपत्नीवादी असले पाहिजे अशी आज्ञा म्हणून लावला जाऊ शकत नाही, याला अनेक पत्नी असणे हे समस्यांचे कारण बनू शकते असे समजून घेतले जाऊ शकते. याला शलमोनाच्या जीवनामध्ये स्पष्टपणे बघितले जाऊ शकते (1 राजे 11:3-4).

नवीन करारातील, 1 तीमथ्या 3:2, 12 आणि तीताला पत्र 1:6 यात दिलेल्या आत्मिक पुढाऱ्यांच्या योग्यतेच्या यादीमध्ये “तो एकाच पत्नीचा पती असावा” असे सांगते. या योग्यतेचा विशिष्ठ्पणे काय अर्थ होतो यावर वादविवाद सुद्धा आहेत. या वाक्यांशाचे शब्दशः भाषांतर “एका स्त्रीचा पती” असे केले जाऊ शकते. जरी या वाक्यांशाचा केवळ संदर्भ बहुपत्नीत्वशी असला किंवा नसला, तरीही कोणत्याही अर्थाने बहुपत्नीवाद्याला “एका स्त्रीचा पती” असे समजले जाऊ शकत नाही. जरी या योग्यता विशेषकरून पुढाऱ्यांच्या पदासाठी असल्या तरीही या सर्व ख्रिस्ती लोकांवर समान लागू होतात. सर्व ख्रिस्ती “अदुष्य...नेमस्त, आत्मसंयम असणारा, आदरणीय, अतिथीप्रिय, निपुण शिक्षक, मद्यपी नसावा, मारका नसावा तर सौम्य असावा, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न करणारा” (1 तीमथ्या 3:2-4) असे असू नयेत का? आपल्याला पवित्र होण्यासाठी पाचारण केले गेले आहे (1 पेत्र 1:16), आणि जर ही मानके वडील आणि सहसेवक यांच्यासाठी पवित्र असतील, तर मग ती सर्वांसाठी पवित्र आहेत.

इफिस 5:22-23 पतीपत्नीमधील नातेसंबंधांबद्दल सांगते. जेंव्हा पतीला (एकवचनी) संदर्भित करते, तेंव्हा ते पत्नीला (एकवचनी) सुद्धा संदर्भित करते. “कारण पती पत्नीचे मस्तक आहे [एकवचनी] ... जो त्याच्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो [एकवचनी]. म्हणून पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील ...तुमच्यातील प्रत्येकाजण जसा स्वतःवर प्रेम करतो तसे त्याने स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे [एकवचनी], आणि पत्नीने [एकवचनी] तिच्या पतीचा [एकवचनी] आदर केला पाहिजे.” तरी कलस्सै 3:18-19 मधील त्याच्या जवळपास समान परिच्छेद पती आणि पत्नीला अनेकवचनी रुपामध्ये संदर्भित करतो, पौल कलस्सैतील विश्वासू लोकांमधील सर्व पती आणि पत्नींना संबोधित करत आहे हे स्पष्ट आहे, तो एक पती अनेक पत्नी करू शकतो असे सांगत नाही. त्याच्या विरुद्ध, इफिस 5:22-23 विशेषकरून वैवाहिक नातेसंबंधाचे वर्णन करते. जर बहुपत्नीत्वाला परवानगी असेल, तर ख्रिस्ताचे त्याच्या शरीराशी (मंडळी) आणि पतीचे पत्नीशी असलेल्या नात्यांचे संपूर्ण स्पष्टीकरण बाजूला पडते.

3)तो का बदलला? देव लग्नाला त्याच्या मूळ योजनेमध्ये पुनर्स्थापित करत असताना हे असे नाही की, त्याने आधी एखाद्या गोष्टीला परवानगी दिली आणि आता तो ती नाकारत आहे. जरी आदम आणि हव्वा यांच्या काळात मागे गेलो, तरी बहुपत्नीत्व हा देवाचा मूळ उद्देश कधीच नव्हता. असे दिसून येते की, देवाने समस्या सोडवण्यासाठी बहुपत्नीत्वला परवानगी दिली, परंतु हे आदर्शवत नव्हते. बऱ्याच आधुनिक समाजामध्ये, बहुपत्नीत्वाची अजिबात गरज नाहीये. आजघडीला बऱ्याच संस्कृतीमध्ये स्त्रीया स्वतःची तरतूद आणि संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत—ज्याने बहुपत्नीत्वच्या एकमेव “सकारत्मक” पैलूला काढून टाकले. याशिवाय, अनेक आधुनिक राष्ट्रांनी बहुपत्नीत्वाला बेकायदेशीर ठरवले आहे. रोम 13:1-7 अनुसार, सरकारने केलेल्या कायद्यांचे पालन आपल्याला करायचे आहे. वचनाच्या द्वारे कायद्याचे उल्लंघन करण्याची परवानगी फक्त अशा घटनांमध्ये दिलेली आहे जेथे कायदा देवाच्या आज्ञेच्या विरुध्द आहे (प्रेषित 5:29). जेणेकरून, देवानेच बहुपत्नीत्वला परवानगी दिलेली आहे, आणि त्याची आज्ञा केलेली नाही, म्हणून बहुपत्नीत्वाला प्रतिबंधित करणाऱ्या कायद्याचे समर्थन केले पाहिजे.

अजून काही अशा घटना आहेत का जेथे बहुपत्नीत्वच्या परवानगीस आजघडीला लागू केले जाऊ शकते? कदाचित, परंतु हे अनाकलनीय आहे की तेथे दुसरा शक्य उपाय असू शकेल. लग्नाच्या “एकदेह” या पैलूमुळे, तसेच लग्नातील ऐक्य आणि सुसंवाद यांची गरज, आणि बहुपत्नीत्वच्या खऱ्या गरजेच्या कमतरतेमुळे, हा आपला ठाम विश्वास आहे की, बहुपत्नीत्वाने देवाचा सन्मान होत नाही आणि लग्नासाठी ती त्याची रचना नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाने पवित्र शास्त्रामध्ये बहुपत्नीत्व/द्विविवाह याला परवानगी का दिली?
© Copyright Got Questions Ministries