settings icon
share icon
प्रश्नः

तारणाची योजना काय आहे?

उत्तरः


तारण म्हणजे उद्धार, मुक्ती होय. सर्व जगाचे धर्म हे शिकवितात की आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळविणे आवश्यक आहे, परंतु आपल्याला कशापासून मुक्त केले जाणे आवश्यक आहे, आपणास सुटका प्राप्त करण्याची गरज का आहे आणि मुक्ती कशी प्राप्त किंवा साध्य केली जाऊ शकते याविषयी प्रत्येकाची वेगळी समज आहे. बायबलमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की तारणाची केवळ एकच योजना आहे.

तारणाची योजना समजून घेण्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती देवाची योजना आहे, मानवाची योजना नाही. मानवाची तारणाची योजना म्हणजे धार्मिक विधी पाळणे किंवा काही आज्ञा पाळणे किंवा काही विशिष्ट आध्यात्मिक आत्मज्ञान प्राप्त करणे होय. परंतु यापैकी कोणत्याही गोष्टी देवाच्या तारण योजनेचा भाग नाहीत.

देवाची तारणाची योजना - का

देवाच्या तारण योजनेत प्रथम आपण हे का समजले पाहिजे की आपणास तारण प्राप्त करण्याची गरज का आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आम्ही तारण प्राप्त करणे आवश्यक आहे कारण आपण पाप केले आहे. बायबल घोषित करते की प्रत्येकाने पाप केले आहे (उपदेशक 7:20; रोम 3:23; 1 योहान 1:8)). पाप हे देवाविरुद्ध बंड आहे. आम्ही सर्वजण चुकीच्या गोष्टी सक्रियपणे करण्याची निवड करतो. पाप इतरांचे नुकसान करे, आमचे नुकसान करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाचा अनादर करते. बायबल असेही शिकवते की देव पवित्र आणि नीतिमान असल्यामुळे पापाला शिक्षेवाचून सोडत नाही. पापाची शिक्षा म्हणजे मृत्यू (रोम 6:23) आणि देवापासून शाश्वत वेगळेपण (प्रकटीकरण 20:11-15). देवाच्या तारण योजनेवाचून, चिरंतन मृत्यू हे मानवाचे भविष्य आहे.

देवाची तारणाची योजना - काय

देवाच्या तारण योजनेत, केवळ देव स्वतःच आहे जो आपणास तारण पुरवू शकतो. आपण आपल्या पापांमुळे आणि त्याच्या परिणामामुळे स्वतःस वाचविण्यात पूर्णपणे अक्षम आहोत. देव येशू ख्रिस्ताच्या रूपात मनुष्य बनला (योहान 1:1, 14) येशू पापरहित जीवन जगला (2 करिंथ 5:21; इब्री 4:15; 1 योहान 3:5))आणि आमच्या वतीने स्वतःला परिपूर्ण बलिदान म्हणून अर्पण केले (1 करिंथ 15:3; कलस्सै 1:22; इब्री 10:10) . येशू देव आहे, म्हणून त्याच्या मृत्यूचे अनंत आणि सार्वकालिक मूल्य होते. वधस्तंभावर येशू ख्रिस्ताच्या मृत्यूने संपूर्ण जगाच्या पापांची पूर्णपणे किंमत दिली (1 योहान 2:2). मृतांमधून पुनरुत्थानाने हे सिद्ध झाले की त्याचे बलिदान खरोखरच पुरेसे आहे आणि ते तारण आता उपलब्ध आहे.

देवाची तारणाची योजना - कशी

प्रेषितांची कृत्ये 16:31 मध्ये, एका इसमाने प्रेषित पौलाला विचारले की तारण प्राप्त व्हावे म्हणून काय करावे. पौलाची प्रतिक्रिया होती, “प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुला तारण प्राप्त होईल.” देवाच्या तारण योजनेचे अनुसरण करण्याचा मार्ग म्हणजे विश्वास ठेवणे. ही एकमेव अट आहे (योहान 3:16; इफिस 2:8-9). देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी तारण पुरविले. आपण केवळ येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून पूर्ण विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे (योहान 14:6; प्रेषितांची कृत्ये 4:12) ही देवाची तारणाची योजना आहे.

देवाची तारणाची योजना - आपण ती स्वीकाराल का?

जर आपण देवाच्या तारणाच्या योजनेचे अनुसरण करण्यास तयार असाल, तर आपला तारणारा म्हणून येशूवर विश्वास ठेवा. पाप करण्यापासून परावृत्त व्हा आणि देवाचा नाकार करण्यापासून आपले मन बदला आणि पापाचा नाकार करून येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा स्वीकार करा. आपल्या पापांची परिपूर्ण आणि संपूर्ण किंमत म्हणून येशूच्या बलिदानावर पूर्णपणे विश्वास ठेवा. आपण हे केल्यास, देवाचे वचन आपल्याला तारण देईल असे अभिवचन देवाचे वचन देते. तुमची पापांची क्षमा केली जाईल आणि तुम्ही स्वर्गात अनंतकाळ घालवाल. यापेक्षा कोणताही महत्त्वाचा निर्णय नाही. आज आपला तारणारा म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा!

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

तारणाची योजना काय आहे?
© Copyright Got Questions Ministries