settings icon
share icon
प्रश्नः

देवाशी वैयक्तिक नातेसंबंध ठेवण्याचा अर्थ काय होतो?

उत्तरः


देवासोबत वैयक्तिक नातेसंबंध ठेवण्याची सुरुवात जेव्हा आपल्याला त्याची गरज समजते, आपण पापी आहोत हे मान्य करतो आणि विश्वासाने येशू ख्रिस्ताला तारणहार म्हणून स्वीकारतो तेंव्हा होते. देव आपला स्वर्गीय पिता नेहमी आपल्या जवळ असण्याची, आपल्याशी नातेसंबंध ठेवण्याची इच्छा करतो. आदामने एदेन बागेमध्ये पाप करण्यापूर्वी (उत्पत्ती अध्याय 3), तो आणि हव्वा दोघेही देवाला जवळून, वैयक्तिक पातळीवर ओळखत होते. ते त्याच्याबरोबर बागेत फिरले आणि सरळ त्याच्याशी बोलले. मनुष्याच्या पापामुळे, आपण देवापासून विभक्त आणि वेगळे झालो आहोत.

बऱ्याच लोकांना माहित नाही, त्यांना जाणवत नाही किंवा ते काळजी हि करत नाही कि येशूने आपल्याला सर्वात आश्चर्यकारक भेट दिली - जर आपण देवावर विश्वास ठेवला तर तो त्याच्याबरोबर अनंतकाळ घालवण्याची संधी देतो. “कारण पापाची वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे” (रोमकरांस पत्र 6:23). देव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपले पाप स्वीकारण्यासाठी, ठार मारण्यासाठी आणि नंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी, पाप आणि मृत्यूवर त्याचा विजय सिद्ध करण्यासाठी मानव बनला. “म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच” (रोम. 8:1). जर आपण ही भेट स्वीकारली तर आपण देवाला स्वीकारार्ह झालो आहोत आणि त्याच्याशी नातेसंबंध ठेवू शकतो.

ज्यांचा देवाशी वैयक्तिक संबंध आहे त्यांच्या दैनंदिन जीवनात देवाचा समावेश आहे. ते त्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याच्या प्रयत्नात त्याला प्रार्थना करतात, त्याचे वचन वाचतात आणि वचनांवर मनन करतात. ज्यांचे देवाशी वैयक्तिक संबंध आहेत ते शहाणपणासाठी प्रार्थना करतात (याकोब 1:5), जी आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. ते त्यांच्या विनंत्या त्याच्याकडे घेऊन येशूच्या नावाने मागतात (योहान 15:16). येशूच आहे जो आपल्यावर आपले जीवन देण्यासाठी आपल्यावर पुरेसे प्रेम करतो (रोम 5:8), आणि तोच तो आहे ज्याने आपल्या आणि देवामधील अंतर कमी केले आहे.

आमचा सल्लागार म्हणून पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आला आहे. “माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील” (योहान 14:15-17). येशूने त्याच्या मृत्यूपूर्वी हे सांगितले आणि त्याच्या मृत्यूनंतर पवित्र आत्मा त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उपलब्ध झाला. हा तो आहे जो विश्वासणार्यांच्या हृदयात राहतो आणि कधीही सोडत नाही. तो आपल्याला सल्ला देतो, आपल्याला सत्य शिकवतो आणि आपली अंतःकरणे बदलतो. या दैवी पवित्र आत्म्याशिवाय आपल्याकडे वाईट आणि प्रलोभनांशी लढण्याची क्षमता नसते. परंतु आपल्याकडे तो असल्यामुळे, आपण प्रेम, आनंद, शांती, संयम, दया, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्म-नियंत्रण हि आत्म्याची आपल्यावर नियंत्रण ठेवण्याची फळे देण्यास सुरुवात करतो (गलतीकर 5:22-23 ).

देवासोबतचा हा वैयक्तिक नातेसंबंध आपल्याला वाटेल तितका कठीण नाही आणि ते मिळवण्यासाठी कोणतेही रहस्यमय सूत्र नाही. आपण देवाची मुले बनताच आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो, जो आपल्या हृदयावर कार्य करण्यास सुरवात करतो. आपण न थांबता प्रार्थना केली पाहिजे, पवित्रशास्त्र वाचले पाहिजे आणि पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या चर्चमध्ये सामील झाले पाहिजे; या सर्व गोष्टी आपल्याला आध्यात्मिकरित्या वाढण्यास मदत करतील. प्रत्येक दिवशी आपल्याला प्राप्त करण्यासाठी देवावर विश्वास ठेवणे आणि तो आपला निभावक आहे यावर विश्वास ठेवणे हा त्याच्याशी संबंध ठेवण्याचा मार्ग आहे. जरी आपण लगेच बदल पाहू शकत नसलो तरी कालांतराने आपण ते पाहू लागतो आणि सर्व सत्ये आपणास स्पष्ट होतील.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाशी वैयक्तिक नातेसंबंध ठेवण्याचा अर्थ काय होतो?
© Copyright Got Questions Ministries