settings icon
share icon
प्रश्नः

मुळ पाप म्हणजे काय?

उत्तरः


मूळ पाप या संज्ञेचा संदर्भ आदमचे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाण्याच्या अवज्ञेच्या पापाशी येतो आणि त्याचा परिणाम उर्वरित मानवजातीवर होतो. मूळ पापाची व्याख्या “आदमच्या पापामुळे आपल्यात नैतिक भ्रष्टाचार आला, ज्याचा परिणाम एक पापी स्वभाव नेहमीच्या पापी वर्तनात प्रकट होतो” हा मूळ पापाचा सिद्धांत विशेषत्वाने आपला आंतरिक स्वभाव आणि आपले देवासमोर उभे राहणे याच्यावर होणाऱ्या परिणामांवर केद्रित आहे. तीन मुख्य दृष्टीकोन आहेत जे या परिणामांना हाताळतात:

पेलगिअनिसम: हा दृष्टीकोन असे सांगतो की, आदमच्या पापाचा त्याच्या वंशजांच्या आत्म्यावर त्याने एक पापमय उदाहरण देण्यापलीकडे कोणताही परिणाम होत नाही. आदमच्या उदाहरणाने त्या लोकांना प्रभावित केले ज्यांनी त्याचे अनुसरण करत पाप केले. परंतु, ह्या दृष्टीकोनानुसार, जर मनुष्याने ठरविले तर त्याच्याकडे पाप करण्याचे थांबवण्याची क्षमता आहे. पेलगिअनिसम असंख्य परिच्छेदांच्या विरोधामध्ये आहे, जे असे सूचित करतात की, मनुष्य आपल्या पापांमुळे हताश होऊन गुलाम झाला (देवाच्या मध्यस्थी शिवाय) आणि त्याचे सर्व चांगले कार्य देवाची मर्जी संपादन करण्यात “मृत” किंवा शुल्लक आहेत (इफिस 2:1-2; मत्तय 15:18-19; रोम 7:23; इब्री 6:1; 9:14).

अर्मिनिअनिसम: अर्मिनिअन लोकांचा असा विश्वास आहे की, आदमच्या मूळ पापाचा परिणाम उर्वरित मानवजातीला भ्रष्ट, आणि पापमय स्वभाव वारसाहाक्कामध्ये मिळाला, ज्याचा परिणाम मांजरीचा स्वभाव जसा तिच्या पिल्लात येतो त्याचप्रमाणे तो आपल्याला पाप करण्यास भाग पाडतो—ते सहज येते. ह्या दृष्टीकोनानुसार मनुष्य स्वतःहून पाप करणे थांबवू शकत नाही; सुवार्तेच्या संयोगासोबत देवाची अलौकिक, सक्षम करणारी कृपा, जिला प्रतिबंधात्मक कृपा असे म्हणतात ती एखाद्या व्यक्तीला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची निवड करण्यास परवानगी देतात. प्रतिबंधात्मक कृपेची शिकवण वचनांमध्ये स्पष्टपणे आढळत नाही.

कॅल्विनिसम: मूळ पापाचा कॅल्विनिस्टीक सिद्धांत असे सांगतो की, आदमच्या पापाचा परिणाम फक्त आपल्यामध्ये पापी स्वभाव आला एवढेच नाही तर देवासमोर आम्ही अपराधी ठरतो आणि त्यासाठी आम्ही शिक्षेस पात्र आहोत. गर्भधारण केले तेंव्हापासूनच मूळ पाप आमच्यावर आहे (स्तोत्र 51:5) त्याचा परिणाम वारसाहक्कामध्ये मिळणारा स्वभाव आहे आणि तो इतका दुष्ट आहे की यिर्मिया 17:9 मानवी हृदयाचे वर्णन “हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे” असे करते. फक्त आदमने पाप केले म्हणून त्याला दोष लावण्यात आला नाही तर त्याचे ते पाप आपल्या माथी मारण्यात आले, ज्याने आपल्याला सुद्धा दोषी ठरवले आणि शिक्षेस सुद्धा (मृत्युच्या) पात्र ठरवले (रोम 5:12,19). आदमचे पाप आपल्या माथी का मारण्यात आले याचे दोन दृष्टीकोन आहेत. पहिला दृष्टीकोन असे सांगतो की मनुष्य हे आदमच्या कुळातील त्याच्या बीजापासून आलेले आहेत; म्हणून जेंव्हा आदमने पाप केले, तेंव्हा आपण त्याच्यामध्ये पापी झालो. हे पवित्र शास्त्र जसे शिकवते की लेवी लोक (अब्राहमचे वंशज) जरी लेवी शंभर वर्षानंतर सुद्धा जन्माला आलेले नव्हते तरीसुद्धा मलकीसदेकला अब्राहममध्ये दशांश देत, त्या सारखे आहे. दुसरा महत्वाचा दृष्टीकोन हा आहे की, आदमने आपला प्रतिनिधी म्हणून सेवा केली, आणि म्हणून, जेंव्हा त्याने पाप केले, तेंव्हा आपण सुद्धा पापी झालो.

अर्मिनिअन आणि कॅल्वानिस्टीक दोन्ही दृष्टीकोन मूळ पापाला शिकवतात आणि व्यक्तिगतरीत्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय पापावर जय मिळवणे अशक्य आहे असे पाहतात. बहुतेक सर्व कॅल्वानिस्ट माथी मारलेल्या पापाबद्दल सुद्धा शिकवतात; काही अर्मिनिंस माथी मारलेल्या पापाला नाकारतात, आणि बाकीचे असे विश्वास ठेवतात की, ख्रिस्ताच्या मृत्यूने माथी मारलेल्या पापाच्या परिणामांना रद्द केले.

मूळ पापाची वस्तुस्थिती ही आहे की, आपण देवाला स्वतःहून संतुष्ट करू शकत नाही. आपण कितीही “चांगली कृत्ये” केली तरीही, अजूनही आपण पाप करतो, आणि अजूनही आपल्यामध्ये भ्रष्ट स्वभाव असल्याची समस्या आहे. आपल्याकडे ख्रिस्त असला पाहिजे; आपण नव्याने जन्मलो पाहिजे (योहान 3:3). शुद्धीकरणाच्या प्रक्रियेद्वारे देव आपल्या हृदयातील मूळ पापांच्या परिणामांना हाताळतो. जसे जॉन पायपर मांडतो, “आपल्या नैतिक अशुद्धतेचा आणि पाप करण्याच्या सवयीचा प्रश्न आत्म्याच्या कार्याच्या द्वारे आपणाला शुद्ध करून सोडवला जातो” (“अॅडम, ख्राईस्ट अॅन्ड जस्टीफीकेशन: पार्ट IV’” प्रीच्ड 8/20/2000).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मुळ पाप म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries