वेगवेगळ्या वंशांचे मूळ काय आहे?


प्रश्नः वेगवेगळ्या वंशांचे मूळ काय आहे?

उत्तरः
बायबल आम्हास स्पष्टपणे मानवजातीतील वेगवेगळ्या "वंशांचे" अथवा रंगवर्णाचे मूळ सांगत नाही. खरे म्हणजे, केवळ एकच वंश आहे — मानववंश अथवा मानवजात. मानवजातीत त्वचेच्या रंगात आणि इतर शारीरिक वैशिष्ट्यांत विविधता आहे. काही असा अंदाज लावतात की जेव्हा देवाने बाबेलच्या बुरूजाजवळ भाषेचा गोंधळ घातला (उत्पत्ती 11:1-9), त्यावेळी त्याने वांशिक विविधता देखील उत्पन्न केली. हे शक्य आहे की वेगवेगळ्या पर्यावरणात लोकांस उत्तरप्रकारे जगता यावे म्हणून देवाने मानवजातीत आनुवंशिक बदल केले असतील, जसे आफ्रिकेच्या अतिशय उष्णतेत जीवंत राहण्यासाठी आफ्रिकन लोकांचा काळा वर्ण आनुवंशिकरित्या उत्तम ठरतो. ह्या मतानुसार, देवाने भाषांत गोंधळ घातला, आणि भाषेच्या दृष्टीने मानवजातीस विलग केले, आणि मग प्रत्येक वांशिक समूह कोठे कायम होईल या आधारे आनुवंशिक वांशिक भिन्नता होऊ घातली. हे शक्य असले तरीही, ह्या मतासाठी बायबलचा कुठलाच आधार नाही. मानवजातीचे वंश/वर्ण यांचा बाबेलच्या बुरूजाच्या संबंधात कोठेही उल्लेख आलेला नाही.

महाप्रलयानंतर, जेव्हा वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या, तेव्हा एक भाषा बोलणारे गट समान भाषा बोलणार्या लोकांसोबत निघून गेले. असे करतांना, विशिष्ट गटाचा जीन कोष नाट्यपूर्णरित्या आकुंचित झाला कारण आता त्या गटास संपूर्ण मानव लोकसंख्येत मिसळण्याची गरज उरली नाही. जवळचे सगोत्र विवाह घडून आले, आणि कालांतराने ह्या वेगवेगळ्या गटांत काही वैशिष्ट्यांची भर पडली (ज्यापैकी सर्व शक्यता म्हणून जननिक सांकेतिक वर्णात म्हणजे जेनेटिक कोडमध्ये उपस्थित होते). ह्या पिढ्यांत जेव्हा पुढे सगोत्र विवाह घडून आले, तेव्हा जीन कोष लहान आणि लहान होत गेला, इतका की एका भाषा कुटूंबातील सर्व लोकांची समान अथवा सारखीच वैशिष्ट्ये होती.

दुसरे स्पष्टीकरण हे आहे की आदाम आणि हव्वा यांच्या काळी, सावळी, आणि गोरी संतती उत्पन्न करणारे जीन्स (आणि सर्वच काही) होते. हे असे असेल असे मिश्र-वंशाच्या दाम्पत्त्यास कधीकधी अशी मुले होतात ज्यांच्या रंगवर्णात भिन्नता असते. स्पष्टपणे देवाची अशी इच्छा होती की मानवजातीने वेगवेगळे दिसावे, त्यामुळे हे अथपूर्ण वाटते की देवाने आदाम आणि हव्वेस वेगवेगळ्या रंगवर्णाची मुले जन्मास आणण्याची क्षमता दिली असावी. नंतर, महाप्रलयानंतर फक्त नोहा आणि त्याची पत्नी, नोहाची तीन मुले आणि त्यांच्या बायका जीवंत वाचल्या — एकूण आठ लोक (उत्पत्ती 7:13). कदाचित नोहाच्या सुना वेगवेगळ्या वंशाच्या असाव्यात. हे देखील शक्य आहे की नोहाची पत्नी नोहापेक्षा भिन्न वंशाची असेल, ज्याचा अर्थ वेगवेगळ्या वंशाच्या मुलांस जन्म देण्याचे आनुवंशिक गुण त्यांच्या ठायी होते. स्पष्टीकरण काहीही का असेना, ह्या प्रश्नाचा सर्वात महत्वाचा पैलू हा आहे की आम्ही सर्वजण समान वंशाचे आहोत, सर्वांस एकाच देवाने उत्पन्न केले आहे, सर्व एकाच हेतूने उत्पन्न केलेले आहेत — त्याचे गौरव करण्यासाठी.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
वेगवेगळ्या वंशांचे मूळ काय आहे?