ख्रिस्ती लोकांनी देशाच्या कायद्यांचे पालन करावे काय?


प्रश्नः ख्रिस्ती लोकांनी देशाच्या कायद्यांचे पालन करावे काय?

उत्तरः
रोमकरांस पत्र 13:1-7 सांगते, "प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाÚयांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमिलेले आहेत. ह्यास्तव जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकाÚयांची भीति असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाÚयांची भीति नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल; कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तूं वाईट करिशील तर त्याची भीति बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करीत नाही; तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाÚयांचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. ह्यास्तव क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सद्सद्विवेकबुद्धीमुळेेही अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात. ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यावयाची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरावयाचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा."

हा परिच्छेद हे स्पष्ट करतो की देवाने आम्हावर नेमिलेल्या सरकारच्या आज्ञेचे आम्ही पालन केले पाहिजे. देवाने सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी, वाईटास शिक्षा देण्यासाठी आणि न्यायास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारची उत्पत्ती केली (उत्पत्ति 9:6; करिंथकरांस 1 ले पत्र 14:33; रोमकरांस पत्र 12:8). आम्हाला सर्व बाबतीत सरकारच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे — कर देणे, नियम व कायद्यांचे पालन करणे, आदर व्यक्त करणे. जर आम्ही असे करीत नसू, तर आम्ही शेवटी देवाप्रत अनादर व्यक्त करीत आहोत, कारण त्याने त्या सरकारला आमच्यावर नेमिले आहे. जेव्हा प्रेषित पौलाने रोमकरांस पत्र लिहिले, तेव्हा तो निरोच्या राज्यातील रोमी शासनाधीन होता, हा रोम सम्राटांपैकी कदाचित सर्वात दुष्ट सम्राट होता. तरीही पौलाने रोमी सरकारचे शासन मान्य केले. आम्ही देखील असे करू नये का?

पुढील प्रश्न हा आहे "अशी वेळ आहे का जेव्हा आपण जाणूनबूझून देशाच्या कायद्याचे उल्लंघन करावे?" ह्या प्रश्नाचे उत्तर प्रेषितांची कृत्ये 5:27-29 या वचनात आढळून येते, "त्यांनी त्यांस आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांस विचारिले, ह्या नांवाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकिले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणू पाहत आहा. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर केले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानिली पाहिजे." यावरून हे स्पष्ट होते की जोवर देशचा कायदा देवाच्या कायद्याच्या विरुद्ध असत नाही, तोवर देशच्या कायद्याचे पालन करणे आम्हास बंधनकारक आहे. जेव्हा देशचा कायदा देवाच्या आज्ञेचा विरोध करतो, तेव्हा आम्ही देशाच्या कायद्याची उल्लंघन केले पाहिजे आणि देवाच्या कायद्याचे पालन केले पाहिजे. तथापि, त्यावेळीसुद्धा, आम्हास आमच्यावरील सरकारचा अधिकार मान्य केला पाहिजे. हे या गोष्टीवरून दिसून येते की पौल आणि योहानाने फटक्यांचा विरोध केला नाही, तर त्याऐवजी त्यांनी आनंद केला की त्यांना देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी दुख सोसावे लागले (प्रेषितांची कृत्ये 5:40-42).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
ख्रिस्ती लोकांनी देशाच्या कायद्यांचे पालन करावे काय?