settings icon
share icon
प्रश्नः

मी नरकात जाण्यापासून कसा वाचू शकतो?

उत्तरः


नरकात न जाणे हे आपण विचार करता त्यापेक्षा कितीतरी सोपे आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की नरकात जाऊ नये म्हणून त्यांना संपूर्ण आयुष्यभर दहा आज्ञांचे पालन करावे लागेल. काही लोकांचा असा विश्वास आहे की नरकात जाऊ नये म्हणून त्यांना काही विधी संस्कारांचे पालन करावे लागेल. काही लोकांचा असा विश्वास आहे की आपण नरकात जाणार नाही हे आपणास खात्रीपूर्वक जाणता येईल असा कुठलाच मार्ग नाही. यापैकी कुठलीही विचारधारा योग्य नाही. मृत्यूनंतर व्यक्ती नरकात जाण्यापासून कसे वाचू शकतो याविषयी बायबल अत्यंत स्पष्टपणे सांगते.

बायबलमध्ये नरकाचे वर्णन भयानक आणि भयावह स्थान म्हणून करण्यात आले आहे. नरकाचे वर्णन “सार्वकालिक आग” (मत्तय 25:41), “न विझणारा अग्नी” (मत्तय 3:12), “अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार” (दानीएल 12:2) असे करण्यात आले आहे, जिथे “अग्नी विझत नाही” (मार्क 9:44-49) आणि “युगानुयुगाचा नाश” आहे (2 थेस्सल. 1:9). प्रकटीकरण 20:10 मध्ये नरकाचे वर्णन “अग्नीचे व गंधकाचे सरोवर” म्हणून केले आहे जिथे दुष्टांना “रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल” (प्रकटीकरण 20:10). स्पष्टपणे, आपण नरकापासून वाचले पाहिजे.

नरक का अस्तित्त्वात आहे आणि देव तिथे काही लोकांना का पाठवितो? बायबल आपल्याला सांगते की सैतान आणि पापात पडलेल्या देवदूतांनी त्याच्याविरुद्ध बंड केल्यामुळे त्यांच्यासाठी देवाने नरक “तयार” केले (मत्तय 25:41). जे लोक देवाची क्षमेची देणगी नाकारतात त्यांना दुरात्मे आणि पतीत देवदूतांच्या समान सार्वकालिक दंड भोगावा लागेल. नरक का आवश्यक आहे? सर्व पाप शेवटी देवाविरूद्ध आहे (स्तोत्र 51:4) आणि देव अनंत आणि सनातन आहे म्हणून केवळ अनंत आणि सार्वकालिक दंडच पुरेसा आहे. नरक हे ठिकाण आहे जिथे देवाच्या पवित्र आणि न्याय्य न्यायाची मागणी पूर्ण केली जाईल. परमेश्वर नरकात पापास आणि जो त्याला नाकारतो त्या सर्वांना दंड देतो. बायबल हे स्पष्ट करते की आपण सर्वांनी पाप केले आहे (उपदेशक 7:20; रोम. 3:10-23), परिणामी, आपण सर्व नरकात जाण्यास पात्र आहोत.

तर मग आपण नरकात जाण्यापासून कसे वाचू शकतो? केवळ एक अनंत आणि सार्वकालिक दंड पुरेसा असल्याने, अनंत आणि सनातन किंमत मोजली जाणे आवश्यक आहे. देव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वात मनुष्य बनला. येशू ख्रिस्तामध्ये, देव आपल्यामध्ये राहिला आणि त्याने आपल्याला बरे केले - पण या गोष्टी त्याचे अंतिम लक्ष्य नव्हत्या. देव मनुष्य झाला (योहान 1:1,14) जेणेकरून त्याला आपल्यासाठी मरता यावे. येशू, मानवी स्वरूपात देव, वधस्तंभावर मरण पावला. देव म्हणून, त्याच्या मृत्यूचे अनंत आणि सार्वकालिक मूल्य होते, ज्याने पापाची संपूर्ण किंमत चुकविली (1 योहान 2:2). देव आपणास निमंत्रण देतो की येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावे, आणि त्याच्या मृत्यूस आमच्या पापांसाठी पूर्ण व न्याय्य भरपाई म्हणून स्वीकार करावे. देव वचन देतो की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो (योहान 3:16), तारणारा म्हणून केवळ त्याच्यावर विश्वास ठेवतो (योहान 1:1) तो वाचला जाईल, म्हणजे, नरकात जाणार नाही.

कोणीही नरकात जाऊ नये अशी देवाची इच्छा आहे (2 पेत्र 3:9). म्हणूनच देवाने आपल्या वतीने अंतिम, परिपूर्ण आणि पुरेसे बलिदान दिले. आपण नरकात जाऊ इच्छित नसल्यास, येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. हे इतके सोपे आहे. देवाला सांगा की आपण पापी आहात आणि आपण नरकात जाण्यास पात्र आहात हे आपण ओळखता. देवाला सांगा की तुम्ही येशू ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे. तुमचे तारण व नरकापासून सुटका करण्यासाठी देवाचे आभार माना. येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणे हा सोपा विश्वास आहे म्हणजे आपणास नरकात जाणे कसे टाळता येईल!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी नरकात जाण्यापासून कसा वाचू शकतो?
© Copyright Got Questions Ministries