settings icon
share icon
प्रश्नः

नवे आकाश व नवी पृथ्वी म्हणजे काय?

उत्तरः


अनेक लोकांच्या मनात स्वर्ग खरोखर कसा आहे याविषयी चुकीची कल्पना आहे. प्रकटीकरणाचे अध्याय 21-22 आम्हास नवे आकाश व नवी पृथ्वी याचे सविस्तर चित्र देतात. शेवटच्या काळातील घटनांनंतर, सध्याचे आकाश व पृथ्वी नाहीसे होईल व त्याची जागा नवे आकाश व नवी पृथ्वी घेईल. विश्वासणार्यांचे सार्वकालिक निवासस्थान नवी पृथ्वी असेल. नवी पृथ्वी तो "स्वर्ग" आहे ज्यावर आम्ही सनातन काळ घालवू. नव्या पृथ्वीवर स्वर्गीय नगर, नवे यरूशलेम, असेल. नव्या पृथ्वीवर मोत्यांचे फाटक आणि सोन्याच्या वाटा असतील.

स्वर्ग — नवी पृथ्वी — हे भौतिक स्थान जेथे आम्ही आपल्या गौरवी भौतिक शरीरांसमवेत राहणार आहोत (करिंथकरांस 1 ले पत्र 15:35-58). स्वर्ग हा "ढगांत" आहे यास बायबलचा आधार नाही. आम्ही "स्वर्गात इकडे तिकडे तरंगत फिरणारे आत्मे" असू ह्या कल्पनेस देखील बायबलचा आधार नाही. ज्या स्वर्गाचा विश्वासणारे अनुभव घेतील तो एक नवा आणि सिद्ध ग्रह असेल ज्यावर आम्ही वस्ती करू. नवी पृथ्वी पाप, दुष्टपणा, आजार, क्लेश, आणि मृत्यू यापासून मुक्त असेल. ती शक्यतः आमच्या वर्तमान पृथ्वीसमान असेल, अथवा कदाचित आमच्या सांप्रत पृथ्वीची पुनर्रचना असेल, पण पापाच्या श्रापावाचून.

नव्या आकाशाचे काय? हे स्मरणात ठेवणे महत्वाचे आहे की प्राचीन मनास, "स्वर्गांचा" उल्लेख आकाश आणि बाह्य अंतरिक्ष, तसेच ते क्षेत्र ज्यात देव राहतो वाटत असे. म्हणून, जेव्हा प्रकटीकरण 21:1 नव्या आकाशाचा उल्लेख करते, तेव्हा ते शक्यतः हे दर्शविते की संपूर्ण विश्वासाची निर्मिती केली जाईल — नवी पृथ्वी, नवे आकाश, नवीन बाह्य अंतरीक्ष. असे वाटते की विश्वातील प्रत्येक गोष्टीस "नवी सुरूवात" देण्यासाठी, मग ती भौतिक असो व आध्यात्मिक, जणूकाही देवाच्या स्वर्गाचीही पुनरूत्पत्ती केली जाईल. सनातन काळात नवे आकाशात आम्हास प्रवेश मिळेल काय? शक्यतः, पण आम्हाला ते शोधून काढण्यासाठी वाट पाहावी लागेल. स्वर्गाची आमची समज घडून यावी म्हणून आम्ही सर्वांनी देवाच्या वचनास मोकळीक द्यावी.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

नवे आकाश व नवी पृथ्वी म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries