settings icon
share icon
प्रश्नः

देव भूकंप, वादळे, आणि सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींची परवानगी का देतो?

उत्तरः


देव भूकंप, चक्रीवादळ, वादळ, सुनामी, भूस्खलन, आणि इतर नैसर्गिक आपत्तींना का परवानगी देतो? 2004 मध्ये आशियातील सुनामीची शोकांतिका, दक्षिण अमेरिकेत 2005 मध्ये कॅटरिना चक्रीवादळ आणि 2008 मध्ये म्यानमारमधील चक्रीवादळामुळे बर्याच लोकांनी देवाच्या चांगुलपणावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. हे दुःखदायक आहे की नैसर्गिक आपत्तींना बर्याचदा “देवाची कृत्ये” म्हटले जाते, पण वर्षानुवर्षे, अनेक दशकांपर्यंत किंवा शतकानुशतके शांत हवामानाचे देवाला “श्रेय” दिले जात नाही. देवाने संपूर्ण विश्व आणि निसर्गाचे नियम तयार केले (उत्पत्ति 1:1) बहुतेक नैसर्गिक आपत्ती या नियमांचा परिणाम आहेत. चक्रीवादळ, टायफून आणि वादळे हे भिन्न हवामानांची टक्कर होण्याचे परिणाम आहेत. भूकंप हा पृथ्वीच्या प्लेट रचनेत बदल झाल्यामुळे येतो. पाण्याखाली आलेल्या भूकंपामुळे सुनामी येते.

बायबल घोषित करते की येशू ख्रिस्त सर्व निसर्गास सांभाळून धरतो (कलस्सै 1:16-17). देव नैसर्गिक आपत्ती रोखू शकत होता? अगदी! देव कधीकधी हवामानावर प्रभाव पाडतो? होय, जसे आपण अनुवाद 11:17 आणि याकोब 5:17 मध्ये पाहतो. गणना 16:3०-34 आपल्याला हे दाखवते की देव कधीकधी पापाविरुद्ध न्याय म्हणून नैसर्गिक आपत्ती आणतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात अनेक घटनांचे वर्णन करण्यात आले आहे ज्याचे निश्चितपणे नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्णन केले जाऊ शकते (प्रकटीकरण अध्याय 6,8, आणि 16). प्रत्येक नैसर्गिक आपत्ती देवाकडून शिक्षा आहे का? नक्कीच नाही.

ज्या प्रकारे देव वाईट लोकांना वाईट कृत्य करण्यास परवानगी देतो त्याचप्रकारे, देव पृथ्वीवर पापामुळे निर्माण झालेले दुष्परिणाम प्रतिबिंबित होऊ देतो. रोम 8:19-21 आपल्याला सांगते की, “कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाघ्र्यामुळे. सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.” मानवतेच्या पतनानंतर आपण राहात असलेल्या जगासह सर्वच गोष्टींवर परिणाम झाला. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट “निराशा” आणि “क्षय” यांच्या अधीन आहे. पाप हे नैसर्गिक आपत्तींचे अंतिम कारण होय जसे ते मृत्यु, रोग आणि दुःख यांचे देखील कारण आहे.

नैसर्गिक आपत्ती का घडतात हे आपण समजू शकतो. आपल्याला हे समजत नाही की देव त्यांना का होऊ देतो. आशिया खंडात सुनामीला देवाने परवानगी का दिली ज्यात तब्बल 2,25,००० लोक मारले गेलेे? कट्रिनाद्वारे चक्रीवादळाने देवाने हजारो लोकांची घरे नष्ट करण्याची परवानगी का दिली? एक गोष्ट आहे, अशा घटनांमुळे या जीवनावरील आपला आत्मविश्वास डळमळतो आणि आपल्याला अनंतकाळाचा विचार करण्यास भाग पाडतो. आपले आयुष्य खरोखर किती कष्टदायक असते आणि क्षणात आयुष्य कसे काढून घेतले जाऊ शकते हे लोकांना कळून येते आणि आपत्तींनंतर चर्चमध्ये सहसा गर्दी वाढते. आपल्याला जे माहित आहे ते आहे: देव चांगला आहे! नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अनेक विस्मयकारक चमत्कार घडले जेणेकरून जास्त जीवितहानी रोखली गेली. नैसर्गिक आपत्तींमुळे कोट्यावधी लोक जीवनातल्या त्यांच्या प्राथमिकतांचे पुन्हा मूल्यांकन करतात. पीडित लोकांना मदत करण्यासाठी कोट्यावधी डॉलर्सची मदत पाठविली जाते. ख्रिस्ती सेवासंस्थांना मदत करण्याची, सेवा करण्याची, सल्ला देण्याची, प्रार्थना करण्याची आणि ख्रिस्तावरील विश्वासाप्रत लोकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते! देव भयानक शोकांतिकांतून चांगूलपणा आणू शकतो आणि आणेतो (रोम 8:28).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देव भूकंप, वादळे, आणि सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींची परवानगी का देतो?
© Copyright Got Questions Ministries