settings icon
share icon
प्रश्नः

मोर्मोनवाद हा खोटा संप्रदाय आहे काय? मोर्मोन मतावलंबी लोकांचा विश्वास काय आहे?

उत्तरः


मोर्माेन धर्म (मोर्मोनवाद), ज्याच्या अनुयायांस मोर्मोन आणि लॅटर डे सेंट्स म्हणजे नंतरच्या दिवसातील संत (एलडीएस) म्हणून ओळखले जाते, जोजफ स्मिथ नावाच्या इसमाद्वारे दोनशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आला. त्याचा दावा होता की त्याला देवपित्याने व येशू ख्रिस्ताने वैय्यक्तिक भेट दिली आणि सांगितले की सर्व मंडळ्या व त्यांची मते घृणास्पद आहेत. मग जोजफ स्मिथने अगदी नवा कोरा धर्म स्थापन करावयास सुरूवात केली जो दावा करतो की तीच काय तो "पृथ्वीवरील एकमेव खरी मंडळी" आहे. मोर्मोनवादाची समस्या ही आहे की तो बायबलचे खंडन, रूपांतर, व विस्तार करतो. ख्रिस्ती लोकांस हा विश्वास धरण्याचे कुठलेही कारण नाही की बायबल खरे आणि पुरेसे नाही. देवावर खरोखर विश्वास आणि भरवंसा ठेवण्याचा अर्थ आहे त्याच्या वचनावर, आणि संपूर्ण पवित्र शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहे यावर विश्वास ठेवणे होय, याचा अर्थ ते देवाकडून आले आहे (तीमथ्याला 2 रे पत्र 3:16).

मोर्मोनचा असा विश्वास आहे की खरे म्हणजे ईश्वरप्रेरित वचनांचे चार स्त्रोत आहेत, केवळ एक नाही: 1) बायबल "जोवर त्याचे योग्य भाषांतर झाले आहे." कोणत्या वचनांचे अयोग्य भाषांतर झाले आहे हे नेहमीच स्पष्ट असत नाही. 2) मोर्माेनचे पुस्तक, ज्याचे स्मिथद्वारे 1830 मध्ये "भाषांतर" आणि प्रकाशन करण्यात आले. स्मिथने प्रतिपादन केले की हे पृथ्वीवरील "सर्वात अचूक पुस्तक" आहे आणि "इतर कुठल्याही पुस्तकांऐवजी" त्यातील नियमांचे पालन करण्याद्वारे व्यक्ती देवाच्या जवळ येऊ शकतो. 3) सिद्धांत आणि करार, म्हणजे द डाॅक्ट्रिन एँड कवेनन्ट्स, ज्यात "पुनःस्थापित करण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या मंडळीविषयीचे" आधुनिक प्रकटीकरणाचे संकलन समाविष्ट आहे..4) बहुमूल्य मोती म्हणजे द पर्ल आॅफ द ग्रेट प्राईस, ह्या पुस्तकास मोर्मोनद्वारे सिद्धांतांचे व शिकवणींचे "स्पष्टीकरण" करणारे पुस्तक मानले जाते ज्या शिकवणी बायबलमधून लुप्त झाल्या होत्या आणि पृथ्वीच्या निर्मितीसंबंधाने त्यात त्यांची आपली माहिती जोडण्यात आली आहे.

मोर्मोन्स देवाविषयी खालील विश्वास धरतात: तो नेहमीच विश्वाचा परमश्रेष्ठ व्यक्ती नव्हता, पण त्याला नीतिमान जीवनाद्वारे व सतत प्रयत्नाद्वारे हा दर्जा प्राप्त झाला. ते असा विश्वास धरता की देवपित्यास "मनुष्यासारखे हाडामांसाचे आणि साकार असे शरीर" आहे. जरी आधुनिक मोर्मोन नेते ह्या मताचा त्याग करतात, तरीही ब्रिगम यंगने देवाविषयी असे शिकविले आहे की आदाम हा खरोखर देव आणि येशू ख्रिस्ताचा पिता होता. या विपरीत, ख्रिस्ती विश्वासणारे देवाविषयी हे जाणतात: केवळ एकच खरा देव आहे (अनुवाद 6:4; यशया 43:10; 44:6-8), तो सदापासून होता आणि सदा राहील (अनुवाद 33:27; स्तोत्र 90:2; तीमथ्याला 1 ले पत्र 1:17), आणि त्याला कोणीही उत्पन्न केले नाही तर तो स्वतः उत्पन्नकर्ता आहे (उत्पत्ति 1; स्तोत्र 24:1; यशया 37:16). तो सिद्ध आहे, आणि कोणीही त्याच्या समान नाही (स्तोत्र 86:8; यशया 40:25). देवपिता मनुष्य नाही, तो कधीही मनुष्य नव्हता (गणना 23:19; 1 शमुवेल 15:29; होशे 11:9). तो आत्मा आहे (योहान 4:24), आणि आत्म्यास मांस व हाड नसते (लूक 24:39).

मोर्मोनचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतरच्या जीवनात वेगवेगळ्या पातळ्या अथवा राज्ये आहेत: स्वर्गीय राज्य, ऐहिक राज्य, अंतरिक्षातील राज्य, आणि बाहेरील राज्य. मानवजात ह्या जीवनात काय विश्वास करते आणि कार्य करते यावर ती कोठे जाईल हे अवलंबून आहे. याविपरीत, बायबल आम्हास सांगते की मृत्यूनंतर, आम्ही आपला प्रभु व तारणारा म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला किंवा नाही या आधारे आपण स्वर्गास किंवा नरकास जाऊ. आमच्या शरीरापासून अनुपस्थित राहण्याचा अर्थ, विश्वासणारे म्हणून, आम्ही प्रभुसोबत आहोत (करिंथकरांस 2 रे पत्र 5:6-8). विश्वास न धरणारे नरकात अर्थात अधोलोकात अथवा मृत्यूच्या ठिकाणी पाठविले जातात (लूक 16:22-23). जेव्हा येशू दुसर्यांदा येईल, तेव्हा आम्हास नवीन शरीरे मिळतील (करिंथकरांस 1 ले पत्र 15:50-54). विश्वासणार्यांसाठी नवे आकाश व नवी पृथ्वी असेल, आणि विश्वास न धरणारे अग्नीच्या सार्वकालिक सरोवरात टाकले जातील (प्रकटीकरण 20:11-15). मृत्यूनंतर मुक्तीची दुसरी संधी नाही (इब्री लोकांस पत्र 9:27).

मोर्मोन पुढार्यांनी हे शिकविले आहे की येशूचे देह धारण करणे देवपिता आणि मरीयेतील शारीरिक संबंधाचा परिणाम होता. मोर्मोनवादी हा विश्वास ठेवतात की येशू देव आहे, पण कोणताही मनुष्यप्राणी देव बनू शकतो. मोर्मोनवाद शिकवितो की तारण विश्वास आणि सत्कृत्यांच्या संयोगाने कमविता येते. या विपरीत, ख्रिस्ती विश्वासणार्यांनी शिकविले आहे की देवाचा दर्जा कोणीही प्राप्त करू शकत नाही — केवळ तो पवित्र आहे ( 1 शमुवेल 2:2). आपण केवळ त्याच्याठायी विश्वासाद्वारे देवाच्या दृष्टीत पवित्र ठरू शकतो (करिंथकरांस 1 ले पत्र 1:2). येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे (योहान 3:16), केवळ एक जो निष्पाप, दोषरहित जीवन जगला, आणि आता त्याला स्वर्गात मानाचे सर्वोच्च स्थान आहे (इब्री लोकांस पत्र 7:26). येशू आणि देव तत्वाबाबत एक आहेत, केवळ येशूच काय तो भौतिक जन्मापूर्वी अस्तित्वात होता (योहान 1:1-8; 8:56). येशूने स्वतःस आम्हासाठी बलिदान म्हणून दिले. देवाने त्याला मेलेल्यांतून जीवंत केले, आणि एके दिवशी प्रत्येक जण कबूल करीत की येशू ख्रिस्त हा प्रभु आहे (फिलिप्पैकरांस पत्र 2:6-11). येशू आम्हाला सांगतो की आमच्या स्वतःच्या कार्यांद्वारे आमचे स्वर्गात जाणे अशक्य आहे आणि केवळ त्याच्याठायी विश्वासाद्वारे तो शक्य आहे (मत्तय 19:26). आम्ही सर्व आमच्या पापांसाठी सनातन शिक्षेस पात्र आहोत, पण देवाची अनंत प्रीती व कृपा यांनी आम्हास बाहेर निघण्याची संधी दिली. "कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे" (रोमकरांस पत्र 6:23).

स्पष्टपणे, तारण प्राप्त करण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो आहे देवाला आणि त्याचा पुत्र, येशू याला जाणणे (योहान 17:3). हे कार्यांद्वारे केले जात नाही, पण विश्वासाने केले जाते (रोमकरांस पत्र 1:17; 3:28). आपण कोणीही का असेना अथवा आपण काहीही का केले असेना आपण ह्या देणगीचा स्वीकार करू शकतो (रोमकरांस पत्र 3:22). "आणि तारण दुसÚया कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नांव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही" (प्रेषितांची कृत्ये 4:12).

माॅर्मोन्स जरी सामान्यतः मित्रभावी, प्रेमळ, आणि दयाळू लोक असले तरीही, ते एका खोट्या धर्माद्वारे फसविले जात आहेत जो देवाचा स्वभाव, येशू ख्रिस्ताचे व्यक्तित्व, आणि तारणाचे साधन या बाबींचा विपर्यास करतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मोर्मोनवाद हा खोटा संप्रदाय आहे काय? मोर्मोन मतावलंबी लोकांचा विश्वास काय आहे?
© Copyright Got Questions Ministries