settings icon
share icon
प्रश्नः

नैतिक सापेक्षतावाद म्हणजे काय?

उत्तरः


नैतिक निरपेक्षतेच्या तुलनेत नैतिक सापेक्षतावादाला अधिक सहजपणे समजले जाऊ शकते. निरपेक्षता असा दावा करते की नैतिकता सार्वभौम तत्त्वांवर (नैसर्गिक कायदा, सदसद्‍विवेकबुद्धी) अवलंबून असते. ख्रिस्ती निरपेक्षतावादी मानतात की देव हा आपल्या सामान्य नैतिकतेचा अंतिम स्त्रोत आहे आणि म्हणूनच तो तितकाच अपरिवर्तनीय आहे जितका तो आहे. नैतिक सापेक्षतावाद असा दावा करतो की नैतिकता कोणत्याही परिपूर्ण मानकांवर आधारित नाही. त्याऐवजी, नैतिक “सत्य” परिस्थिती, संस्कृती, एखाद्याच्या भावना इत्यादी परिवर्तनशील गोष्टींवर अवलंबून असते.

नैतिक सापेक्षतावादाच्या युक्तिवादांबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जाऊ शकतात जे त्यांचे संदिग्ध स्वरूप दर्शविते. प्रथम, सापेक्षतावादाला पाठिंबा देण्याच्या प्रयत्नात वापरलेले बरेच युक्तिवाद सुरुवातीला चांगले वाटू शकतात, परंतु त्या सर्वांमध्ये एक तार्किक विरोधाभास आहे कारण ते सर्व “योग्य” नैतिक योजना प्रस्तावित करतात - ज्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. पण हे स्वतःमध्ये निरपेक्षता आहे. दुसरे, अगदी तथाकथित सापेक्षतावादीही बहुतांश घटनांमध्ये सापेक्षतावाद नाकारतात. जोपर्यंत त्याने स्वत: च्या स्तराचे उल्लंघन केले नाही तोपर्यंत खुनी किंवा बलात्कारी अपराधीपणापासून मुक्त आहे असे ते म्हणणार नाहीत.

सापेक्षतावादी असा युक्तिवाद करू शकतात की भिन्न संस्कृतींमधील भिन्न मूल्ये दर्शवतात की नैतिकता वेगवेगळ्या लोकांशी संबंधित आहे. परंतु हा युक्तिवाद संपूर्ण मानकांसह (त्यांनी तसे करावे का) व्यक्तींच्या कृतींना (ते काय करतात) गोंधळात टाकतो. जर संस्कृती योग्य आणि अयोग्य ठरवते, तर आम्ही नाझींचा न्याय कसा करू शकलो असतो? शेवटी, ते फक्त त्यांच्या संस्कृतीच्या नैतिकतेचे पालन करीत होते. जर फक्त हत्या सार्वत्रिक चुकीची आहे तरच नाझी चुकीचे होते. वस्तुस्थिती ही आहे कि त्यांच्याकडे “त्यांची नैतिकता” होती, याची काहीच फरक पडत नव्हता. पुढे, जरी बर्‍याच लोकांच्या नैतिकतेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तरीही ते एक सामान्य नैतिकता सामायिक करतात. उदाहरणार्थ, गर्भपात करणारे आणि गर्भपात विरोधी या गोष्टीला सहमत आहेत कि हत्या चुकीची आहे, परंतु गर्भपात हत्या आहे की नाही यावर ते सहमत नाहीत. तर, इथेही निरपेक्ष सार्वभौमिक नैतिकता खरी असल्याचे दाखवले आहे.

काहींचा असा दावा आहे की बदलती परिस्थिती नैतिकता बदलण्यासाठी बनते - भिन्न परिस्थिती वेगवेगळ्या कृतींना सांगितले जाते ज्या इतर परिस्थितींमध्ये योग्य अस्य शकत नाहीत. परंतु तीन गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण एखाद्या कृतीचा न्याय केला पाहिजे: स्थिती, कृती आणि हेतू. उदाहरणार्थ, आपण एखाद्याला खुनाच्या प्रयत्नासाठी (हेतू) दोष देऊ शकतो, जरी तो अपयशी ठरला (कृती). परिस्थिती नैतिक निर्णयाचा भाग आहे, कारण त्यांनी विशिष्ट नैतिक कृती (सार्वत्रिक तत्त्वांचा वापर) निवडण्यासाठी संदर्भ निश्चित केला आहे.

सापेक्षतावाद्यांना आवाहन करणारा मुख्य युक्तिवाद म्हणजे सहिष्णुता. त्यांचा असा दावा आहे की एखाद्याला आपली नैतिकता चुकीची आहे हे सांगणे असहिष्णु आहे, आणि सापेक्षतावाद सर्व मते सहन करतो. पण हे दिशाभूल करणारे आहे. सर्व प्रथम, वाईटाला कधीही सहन करू नये. काय आपणाला बलात्कार करणाऱ्याच्या या विचारला सहन केले पाहिजे कि स्त्री उपभोगाची वस्तू आहे ज्याचे शोषण केले जाऊ शकते? दुसरे म्हणजे, हे आत्म-पराभूत आहे कारण सापेक्षतावादी असहिष्णुता किंवा निरपेक्षता सहन करत नाहीत. तिसरे, सापेक्षतावाद हे स्पष्ट करू शकत नाही की कोणीही प्रथम सहिष्णु का असावे. आपण लोकांना सहन केले पाहिजे ही वस्तुस्थिती (आपण असहमत असतानाही) पूर्ण नैतिक नियमावर आधारित आहे की आपण नेहमीच लोकांसोबत योग्य व्यवहार केला पाहिजे - परंतु ती पुन्हा निरपेक्षता आहे! खरं तर, सार्वत्रिक नैतिक तत्त्वांशिवाय चांगुलपणा असू शकत नाही.

वस्तुस्थिती अशी आहे की सर्व लोक विवेकासोबत जन्माला येतात आणि आपल्या सर्वांवर केव्हा अन्याय झाला आहे किंवा जेव्हा आपण इतरांवर अन्याय केला आहे हे आपल्या सर्वांना सहजपणे माहित असते. आम्ही असे वागतो जसे आपण इतरांनी ते ओळखले पाहिजे अशी अपेक्षा करतो. लहान असताना सुद्धा आम्हाला “निष्पक्ष” आणि “अन्यायकारक” मधील फरक माहित होता. आपण चुकीचे आहोत आणि नैतिक सापेक्षतावाद खरे आहे हे पटवून देण्यासाठी आपल्याला वाईट तत्त्वज्ञानाची गरज आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

नैतिक सापेक्षतावाद म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries