विवाह टिकवून ठेविणे — किल्ली काय आहे?


प्रश्नः विवाह टिकवून ठेविणे — किल्ली काय आहे?

उत्तरः
आपला विवाह टिकून राहील याची खात्री करून घेण्यासाठी विवाहित दाम्पत्त्य काय करू शकते? सर्वात महत्वाचा आणि पहिला विषय हा आहे देवाप्रत आणि त्याच्या वचनाप्रत आज्ञापालनाची बाब. हा एक महत्वाचा सिद्धांत आहे जो वैवाहिक जीवनाची सुरूवात होण्यापूर्वी अमलात असला पाहिजे. परमेश्वर देव म्हणतो, "सहमत असल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?" (आमोस 3:3). नवा जन्म झालेल्या विश्वासणार्‍यासाठी, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीसोबत जो विश्वासणारा नाही त्याच्याशी जवळचे नाते सुरू न करणे होय. "तुम्ही विश्वास न ठेवणाÚयांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?" (करिंथकरांस 2 रे पत्र 6:14). जर ह्या एका तत्वाचे पालन करण्यात आले, तर त्याद्वारे लग्नानंतर बरीच डोकेदुखी आणि यातनांपासून बचाव होईल.

वैवाहिक जीवनाचे दीर्घायुष्य वाचवून ठेवणारा दुसरा सिद्धांत हा आहे की पतीने देवाच्या आज्ञेचे पालन करावे आणि आपल्या पत्नीवर अगदी तशीच प्रीती करावी, मान राखावा, रक्षण करावे जसे तो आपल्या स्वतःच्या शरीराचे करील (इफिसकरांस पत्र 5:25-31). तत्सम सिद्धांत हा आहे की पत्नीने देवाच्या आज्ञेचे पालन करावे आणि आपल्या पतीच्या अधीन राहावे "जसे प्रभुच्या" (इफिसकरांस पत्र 5:22). स्त्री आणि पुरुषातील विवाह ख्रिस्त आणि मंडळीतील नात्याचे चित्र होय. ख्रिस्ताने स्वतःस मंडळीकरिता वाहून दिले, आणि तो त्याची "वधू" म्हणून तिजवर प्रीती करतो, तिचा मान राखतो, आणि तिचे रक्षण करतो (प्रकटीकरण 19:7-9).

नीतिमान विवाहाच्या पायाच्या आधारावर, अनेक दाम्पत्त्यांस त्यांच्या वैवाहिक जीवनास टिकवून ठेवण्यात सहाय्यक असे व्यवहारिक मार्ग दिसून येतात : उदाहरणार्थ, सोबत उत्तम वेळ घालविणे, बरेचदा "मी तुजवर प्रीती करतो किंवा करते," असे म्हणणे, प्रेमळ असणे; प्रेम दाखविणे; स्तुती करणे; फिरावयास जाणे; पत्रे लिहिणे; बक्षिसे देणे; आणि क्षमा करावयास तयार असणे. ह्या सर्व कृती पती व पत्नीस बायबलमध्ये दिलेल्या आज्ञेने वेढलेल्या आहेत.

पहिल्या विवाहात जेव्हा देवाने हव्वेस आदामाजवळ आणले, तेव्हा ती त्याच्या "हाड व मांसातून" घडविली गेली होती (उत्पत्ति 2:21) आणि ती "एक देह" झाली (उत्पत्ति 2:23-24). एकदेह होण्याचा अर्थ मात्र शारीरिक मिलनापेक्षा फार अधिक आहे. त्याचा अर्थ आहे मन व प्राण मिळून एक होणे. हे नाते कामुक अथवा भावनात्मक आकर्षणाच्या फार पुढे जाते आणि आध्यात्मिक क्षेत्राच्या "एकतेत" प्रवेश करते जे केवळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा दोघेही जोडीदार देवाच्या आणि एकमेकाच्या अधीन होतात. हे नाते "मी आणि माझे" यावर केंद्रित नसते पण "आम्ही आणि आमचे" यावर केंद्रित असते. स्थायी विवाहाच्या रहस्यांपैकी हे एक आहे.

आयुष्यभर विवाह टिकवून ठेवणे हे दोघाही जोडीदारांचे प्राधान्य असले पाहिजे. ज्या दाम्पत्त्यांचे विवाह टिकून राहतात ते एकमेकाच्या समर्पणाचा उत्सव साजरा करतात. काही दाम्पत्त्य हे ठरवितात की ते घटस्फोटाबद्दल बोलणारही नाहीत, रागात सुद्धा नाही. देवासोबत उभे नाते मजबूत बनविण्याद्वारे ह्या गोष्टीची खात्री करता येते की पती व पत्नीमधील आडवे नाते हे टिकाऊ, देवास आदर देणारे आहे.

जे युगुल आपला विवाह टिकून राहावा अशी इच्छा धरतात त्यांनी आपल्या समस्या कशा हाताळाव्या हे शिकले पाहिजे. प्रार्थना, बायबलचा अभ्यास, आणि एकमेकांस प्रोत्साहन देणे चांगले आहे. आणि बाहेरून मदत घेण्यातही काहीही चुकीचे नाही; खरे म्हणजे, मंडळीच्या हेतूंपैकी एक आहे "प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देणे" (इब्री लोकांस पत्र 10:24). संघर्ष करणार्‍या दाम्पत्त्याने वयाने मोठ्या ख्रिस्ती दाम्पत्त्याचा, पाळकाचा, अथवा बायबलनुसार विवाह सल्लाकारांचा सल्ला मागावा.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
विवाह टिकवून ठेविणे — किल्ली काय आहे?