settings icon
share icon
प्रश्नः

श्वापदाचे चिन्ह काय आहे?

उत्तरः


इतर संदर्भ प्रकटीकरण 14:9,11, 15:2, 16:2,19:20 आणि 20:4 मध्ये आपण पाहू शकतो. हे चिन्ह ख्रिस्तविरोधक आणि खोट्या संदेष्ट्याच्या अनुयायांसाठी (ख्रिस्तविरोधकाचा प्रवक्ता) शिक्का म्हणून कार्य करतो. खोटा संदेष्टा (दुसरा श्वापद किंवा पशू) तो आहे जो लोकांना हे धारण करावयास लावतो घेतात. हे चिन्ह अक्षरशः हातावर किंवा कपाळावर ठेवले जाईल आणि आमच्यासोबत घेतलेला कार्ड नाही.

मेडिकल इम्प्लांट चिप टेक्नॉलॉजीजमध्ये नुकत्याच झालेल्या प्रगतीमुळे प्रकटीकरण अध्याय 13 मध्ये ज्या श्वापदाचा उल्लेख केला गेला आहे त्याच्याविषयी अधिक रस निर्माण झाला आहे. आज आपण ज्या तंत्रज्ञानास पहात आहोत हे त्या पशूचे चिन्ह म्हणून वापरल्या जाणा्या सुरवातीचा टप्पा दर्शविते ज्यास शेवटी श्वापदाचे चिन्ह म्हणून उपयोग केले जाईल. हे समजणे महत्वाचे आहे की वैद्यकीय रोपण चिप हे श्वापदाची खूण नाही. श्वापदाचे चिन्ह केवळ त्यांनाच दिले जाईल जे ख्रिस्तविरोधकाची उपासना करतील. आपल्या उजव्या हातात किंवा कपाळावर वैद्यकीय किंवा आर्थिक मायक्रोचिप घातली तर

श्वापदाची खूण नाही. त्या श्वापदाची खूण खरेदी-विक्री करण्यासाठी ख्रिस्तविरोधकाने मागणी केलेली शेवटच्या काळाचे ओळखपत्र असेल आणि ते केवळ ख्रिस्तविरोधकाची उपासना करणार्‍यास दिले जाईल.

प्रकटीकरणाच्या अनेक उत्तम व्याख्याकारांमध्ये श्वापदाच्या चिन्हाचे नेमके स्वरूप काय असेल याविषयी अनेक मतभेद आहेत. रोपण्यात आलेल्या चिप विषयीच्या मतांव्यतिरिक्त, इतर अनुमानांमध्ये आयडी कार्ड, मायक्रोचिप, त्वचेवर गोंदलेले बारकोड किंवा ख्रिस्तविरोधकाच्या राज्याप्रत विश्वासू असल्याचे ओळख दाखविणारी खूण इत्यादींचा समावेश आहे. या शेवटच्या मतासाठी किमान अनुमानाची आहे कारण बायबल आपल्याला जे काही सांगते त्यामध्ये ते अधिक माहिती जोडत नाही. दुसर्या शब्दांत, यापैकी कोणत्याही गोष्टी शक्य आहेत, परंतु त्याचवेळी त्या सर्व अनुमान आहेत. आम्ही अचूक तपशीलांवर अनुमान काढण्यात जास्त वेळ घालवू नये.

666 चा अर्थ देखील गूढ आहे. काहींनी असा अंदाज लावला आहे की 6 जून 2006 चा एक संबंध होता - 06/06/06. तथापि, प्रकटीकरण अध्याय 13 मध्ये, 666 संख्या एखाद्या व्यक्तीची ओळख पटवते, तारखेची नाही. प्रकटी 13:18 आम्हास सांगते, “येथे अकलेचे काम आहे; ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे; त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो; ती त्याची संख्या सहाशे सहासष्ट होय.” (2 थेस्सल. 2:3-4). 666 ही संख्या ख्रिस्तविरोधकाची ओळख करील. शतकानुशतके बायबलचे व्याख्याकार 666 असलेल्या विशिष्ट व्यक्तींना ओळखण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीही निर्णायक नाही. म्हणूनच प्रकटीकरण 13:18 म्हणते की संख्या ओळखण्यासाठी बुद्धीची गरज आहे. ख्रिस्तविरोधक प्रकट झाल्यावर (2 थेस्सल 2:3-4), तो कोण आहे आणि 666 क्रमांक त्याला कसा ओळखतो हे स्पष्ट होईल.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

श्वापदाचे चिन्ह काय आहे?
© Copyright Got Questions Ministries