settings icon
share icon
प्रश्नः

मरणानंतर जीवन आहे काय?

उत्तरः


मरणानंतर जीवन आहे काय? हा सर्व जगातील लोकांचा प्रश्न आहे.ईयोब सार्वाना सांगतो “ स्त्रिपासुन जन्मलेला मानवप्राणी,अल्पाआयु व क्लेशभरित असतो. तो फूला सारखा फूलतो व खुडला जातो, तो छाये प्रामणे सत्वर निघुन जातो. राहत नाही, “ वचन 14 मध्ये म्हणतो “ मनुष्य मृत झाल्यावर पुन: जिवंत होईल का?” (ईयोब 14:1-2,14) इयोबा प्रमाणे आम्हाला सुध्दा हया प्रश्नाच्या उत्तराचे आव्हान आहे. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा नेमके काय होते.तर मग आमचे अस्तीत्वच नष्ट होऊ जाते का ? तर मग एखादया गोलफिरणाऱ्या दरवाज्या प्रमाणे आमचे जीवन आहे कि मेल्यानंतर परत पृथ्वीवर आपल्या योग्यते प्रामाणे मनुष्य जन्मास येतो का ? काय मृत्यूनंतर आम्ही सर्वच एकाच ठिकाणी जातो? की, वेगवेगळया ठिकाणी आपण जातो? आणि खरच स्वर्ग व नरक आहे काय ?

पवित्र शास्त्र आम्हला सांगते की, मरणारनंतर जीवनच नाही., तर सार्वकालीक जिवन आहे. आणि तेही महिमायुक्त असे आहे “ …….. डेाळयाने पाहिलेनाही, कानाने ऐकले नाही, व माणसाच्या मनात आले नाही. ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिध्द केले आहे.” (I करिथ 2:9) देवाने खिस्ता मध्ये देह धारण केले तो जगात आला व सार्वकालीक जीवनाचे महान देणगी दिली “ खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झालाआमच्या दुषकर्मामुळे ठेचला गेला , आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास अरोगय प्राप्त झाले” (यशया 53.5 ) येशुने आमच्या पापाची किंमत चुकविली त्याने बलिदान केले तीसऱ्या दिवशी कबरेतून उठून मरणारवर विजय मिळविल्याचे प्रमाण दिले. पुन:रुत्थाना नंतर त्याने हजारो लोकांना दर्शन दिले स्वता प्रगट केले. व त्या नंतर तो स्वर्गात घेतेला गेला रोम 4:25 मध्ये असे सांगितले आहे.” तर ज्या आपल्या प्रभु येशु ख्रिस्ताला आपल्या आपराधामुळे धरुन देण्यात आले व आपण नितीमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले”

येशु ख्रिस्ताचे पुन:रुत्था ह्याला इतिहास साक्ष् आहे. प्रेषीत पौल लोकांना अव्हान करीतो की, ज्यांनी येशुला पुन:त्थीत झालेला पाहिले आहे.परंतु त्याचा समना करण्यासाठी कोणीही तयार कारण ते सत्य आहे. येशु ख्रिस्ताच्या पुन:रुत्थावर विश्वास ठेवणाऱ्याचा अधार आहे. कारण येशु मरणातून उठला जर आम्ही येशुवर विश्वास ठेवला तर आम्ही सुध्दा मरणातून उठले जाऊ येशु ख्रिताताने त्याच्या पुन:रुत्थानावरुन असे दाखविले की, मरणा नंतर पुन:रुत्थान आहे. येशु हा सर्व प्रथम आहे. की,जो मरणा नंतर पुन:रुत्थीत झाला शाररीक मृत्यु हा मनूष्य मात्रावर येतो. जो कोणी आदामपासून आहे. त्याला मृत्यु आहे. परंतु जो येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या कुटूंबामध्ये दत्तक म्हणून घेतले व त्याला नविन जीवन दिले (I करिथ 15:20-22) “देवाने प्रभु येशुला उठविले आणि तो आपल्या सामर्थाने आपल्याला उठविल” (I करिथ 6:14) जेव्हा येशु परत येईल् तेव्हा हे होईल्.

ह्याचा अर्थ येशु ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयी जे मरण पावले आहे. ते सर्व पुन:रुत्थीत होणार आहेत. व त्यापैकी सर्वच जण स्वर्गात घेतली जातील असे नाही. जर स्वर्गात जाईचे असेल तर याच पृथ्वीवर आम्हाला निवड करावी. लागणार आहे. ही निवड सार्वकालीन जीवनासाठी किंवा मृत्युसाठी राणार आहे. पवित्र शास्त्रात सांगितले आहे. प्रत्येक मनुष्याला मरावे लागाणार आहे. व त्यानंतर न्याय ठरविला आहे.( इब्रि 9:27) जो कोणी ख्रिस्तावरील विश्वासाने नितीमान ठरेल.तो सार्वकालीक जीवनासाठी देवा बरोबर असेल जो कोणी येशुला आपला तारणारा म्हणून स्विकारणार नाही. त्यांना सर्वकालीक नरकामध्ये पापाच्या शिक्षेसाठी टाकण्यात येणार आहे. ( मत्तय 25:46) नरक हे स्वर्गासारखे नाही. स्वर्ग आणि नरक ही वास्तवीक ठिकाणे आहेत. नरक हे ठीकान पापी व्यक्तीसाठी तयार करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पापी लोक देवाच्या क्रोधाचा समाना करणर आहेत. देवाचा क्रोध सर्वकालीक असणार आहे. नरकाचे विवरण हे एक अगाधकुप आहे. असे सांगण्यात आले आहे. ( लुक 8:31, प्रगटी 9:1 ) ज्या ठिकाणी आग आहे व ती गधकाने सदैव जळ आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्याला रात्र आणि दिवस त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.( प्रगटी 20:10 ) नरकामध्ये देवाच्या न्यायामुळे रडणे व दात खाने असणार आहेत. ( मत्तय 13:42)

कोणीही दुर्जन त्याच्या अपराधामुळे मरावा यामध्ये देवाला आनंद नाही तर त्याने आपल्या दुषकर्मापासून मागे फिरावे यात आनंद आहे. (यहेज्केल 33:11) तो दुर्जनाला कधीही बळजबरी करणार नाही. कि त्याने सार्वकालीक जीवनात यावेत. कारण प्रत्येक मनुष्याला त्याने निवड करण्याची इच्छा दिली आहे. या पृथ्वीवर आमचे जीवन येणाऱ्या जीवनाची तयारी आहे. आणि जो कोणी येशु ख्रिस्ताचा स्विकार करतो तो मृत्यु नंतर देवासंगती राहणार आहे. ज्यानी येशु ख्रिस्ताचा स्विकार पृथ्वीवर केला नाही. त्याला मृत्यु नंतर सार्वकालीक नरकात टाकण्यात येईल् . आम्ही फक्त येशुवर विश्वास ठेवून नरकापासून वाचू शकतो. येशूने म्हणटले “ पुन:रुत्थान व जीवन मीच आहे, जो मजवर विश्वास ठेवीतो. तो मेल असला तरी, जगेल, आणि जिवंत असून मजवर विश्वास ठेवीतो तो कधीही मरणार नाही………………” ( योहान 11:25 -26 सार्वकालीक जीवनाचे दान सार्वानसाठी आहे.सर्वकालीक जीवन जो कोणी प्रभु येशुचा तारणारा म्हणून स्विकार करीत नाही. त्याला सार्वकालीक जीवन परंतु देवाचा क्रोध त्याजवर राहणार आहे. ( योहान 3:36) मृत्यु नंतर देवाच्या तारणाचे दान स्विकारण्याची संधी असणार नाही. आमच्या पृथ्वीवरील वास्तव्या मध्ये आम्हाला ठरवावे लागणार आहे. आम्हाला सार्वकालीक जीवनामध्ये सर्वगात जायचे किंवा सार्वलीक मरणसाठी नरकात जायचे ह्याची निवड पृथ्वीवर येशुचा स्विकार करुन् किंवा नाकार करुन आपण निश्चीत करु शकतो. “ कारण तो म्हणतो प्रसाद समयी मी तुझे ऐकले व उध्दारदिनी मी तुला साह्या केले, पहा आताच प्रसाद समय पहा आताच तारणाचा दिवस आहे. (II करिथ 6:2) जर आपण येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवीतो की, देवाने आमच्या पापासाठी येशु ख्रिस्ताला जगात पाठविले तो आमाच्या पापासाठी मरण पावला गाडल्या गेला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविला गेला असा विश्वास जर आपण करतो तर आम्हाला संपूर्ण खात्री आहे. की, पृथ्वीवरच योग्य अर्थभरीत जीवन जगता येईल.व मृत्यु नंतर येशु ख्रिस्ता संगती महिमा युक्त् सर्वकालीक जीवन मिळणार आहे.

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मरणानंतर जीवन आहे काय?
© Copyright Got Questions Ministries