settings icon
share icon
प्रश्नः

स्वर्गाचे वेगवेगळे स्तर आहेत काय?

उत्तरः


स्वर्गाचे वेगवेगळे स्तर आहेत हे सांगणारे सगळ्यात जवळचे वचन 2 करिंथ 12:2 मध्ये सापडते, “ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहित आहे, त्याला चौदा वर्षापूर्वी तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही नेण्यात आले हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे.” काही लोक याचा अर्थ असे सूचित करतो म्हणून लावतात की, स्वर्गाचे तीन वेगवेगळे स्तर आहेत, एक स्तर “अतिशय निष्ठावान ख्रिस्ती” किंवा असे ख्रिस्ती ज्यांनी अत्मिकतेमध्ये उच्च स्तर प्राप्त केला, एक स्तर “सामान्य” ख्रिस्ती लोकांचा, आणि एक स्तर अशा ख्रिस्ती लोकांचा ज्यांनी देवाची सेवा विश्वसनीय राहून केली नाही. या दृष्टीकोनाला वचनामध्ये कोणताही आधार नाही.

पौल हे सांगत नाही की, तेथे तीन स्वर्ग किंवा स्वर्गाचे तीन स्तर होते. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये, लोक स्वर्ग या शब्दाचा उपयोग तीन वेगवेगळ्या “क्षेत्रांचे” वर्णन करण्यासाठी करत—आकाश, बाहेरील अंतराळ, आणि मग आत्मिक स्वर्ग. पौल हे सांगत होता की देवाने त्याला “आत्मिक” स्वर्गापर्यंत—असे क्षेत्र जे भौतिक विश्वाच्या पलीकडे आहे जिथे देव वास करतो तेथे नेले. स्वर्गाच्या वेगवेगळ्या स्तरांची संकल्पना कदाचित डॅन्टच्या दी डिव्हाईन कॉमेडी या पुस्तकातून आली असेल, ज्यामध्ये कवी स्वर्ग आणि नरक या दोन्हींचे वर्णन त्यात नऊ वेगवेगळे स्तर आहेत असे करतो. तथापि, दी डिव्हाईन कॉमेडी, हे एक काल्पनिक कार्य आहे. स्वर्गाच्या वेगवेगळ्या स्तरांची संकल्पना ही वचनाच्या बाहेरील आहे.

स्वर्गामधील वेगवेगळ्या बक्षीसांबद्दल वचन बोलते. येशू बक्षीसांबद्दल बोलला, “पहा, मी लवकर येतो; आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास मजजवळ वेतन आहे” (प्रकटीकरण 22:12). जेणेकरून येशू बक्षीसांचे वितरण आपण जे काही केले त्याच्यानुसार करणार आहे, आपण सुरक्षितपणे असे म्हणू शकतो की, विश्वासणाऱ्यांसाठी बक्षीसाची एक वेळ आहे आणि ती बक्षीसे व्यक्ती दर व्यक्ती वेगवेगळी असतील.

असे कार्य जे देवाच्या शुद्धीकरणाच्या अग्नीतून तरले जाईल त्याच कार्याला सार्वकालिक किंमत आहे आणि तेच कार्य बक्षीसाच्या योग्य असेल. अशा किमती कार्यांना “सोने, चांदी आणि मौल्यवान खडे” असे संदर्भित केले गेले आहे (1 करिंथ 3:12) आणि अशा गोष्टींना येशू ख्रिस्तावर विश्वासाच्या पायावर बांधण्यात आले. अशी कार्ये ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांना “लाकूड, वाळलेले गवत, भुसा” असे म्हंटले गेले; ही दुष्ट कार्ये नाहीत पण हलकी कार्ये आहेत ज्यांना सार्वकालिक किंमत नाही. बक्षीसांना “ख्रिस्ताच्या न्यायाच्या जागी” वितरीत केले जाईल, अशी जागा जेथे विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचे बक्षीसाच्या हेतूसाठी मूल्यमापन केले जाईल. विश्वासणाऱ्यांचा “न्याय” म्हणजे त्यांना पापासाठी शिक्षा असे कधीच होत नाही. येशू ख्रिस्ताला जेंव्हा तो वधस्तंभावर मेला तेंव्हा आपल्या पापासाठी शिक्षा केली गेली, आणि देव आपल्याबद्दल बोलला: “मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही” (इब्री 8:12). किती तेजस्वी विचार आहे! ख्रिस्ती लोकांना कधीही शिक्षेपासून घाबरण्याची गरज नाही, परंतु ते बक्षीसाच्या मुकुटाची वाट बघू शकतात ज्याला ते तारणाऱ्याच्या पायाजवळ ठेऊ शकतात. निष्कर्ष असा आहे, स्वर्गाचे वेगवेगळे स्तर नाहीत, परंतु स्वर्गामध्ये वेगवेगळ्या स्तराची बक्षीसे आहेत.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

स्वर्गाचे वेगवेगळे स्तर आहेत काय?
© Copyright Got Questions Ministries