खटला/खटला चालविण्याविषयी बायबल काय म्हणते?


प्रश्नः खटला/खटला चालविण्याविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः
प्रेषित पौलाने करिंथ येथील विश्वासणार्यांस आज्ञा दिली की त्यांनी एकमेकांविरुद्ध न्यायालयात जाता कामा नये (करिंथकरांस 1 ले पत्र 6:1-8). ख्रिस्ती लोकांनी एकमेकांस क्षमा न करणे आणि त्यांच्यातील मतभेद दूर सारून आपसात समेट न करू शकणे हे आध्यात्मिक पराजय प्रगट करणे होय. ख्रिस्ती लोकांजवळही इतरांसारख्याच समस्या असतील आणि त्यांचा उपाय शोधावयास ते सारखेच असमर्थ असतील तर कोण का म्हणून ख्रिस्ती बनू इच्छिणार? तथापि, काही उदाहरणे आहेत जेथे न्यायालयात जाणे हाच योग्य उपाय ठरतो. जर बायबलनुसार समेटाच्या मार्गाचे अनुसरण केले (मत्तय 18:15-17) आणि तरीही अपराध करणारा पक्ष चुक करीत असेल, तर काही बाबतींत खटला चालविणे न्याय्य ठरू शकते. बुद्धिसाठी बरीच प्रार्थना केल्यानंतर (याकोब 1:5) आणि आध्यात्मिक पुढार्याचा सल्ला घेतल्यानंतरच असे करावे.

करिंथकरांस 1 ले पत्र 6:1-6 चा पूर्ण संदर्भ मंडळीतील वादांविषयी चर्चा करतो, पण पौल पण ह्या जीवनातील गोष्टींसंबंधी न्यायाविषयी बोलत असतांना न्यायसंस्थेचा उल्लेख करतो. पौलाच्या बोलण्याचा अर्थ हा आहे की न्यायसंस्था ह्या जीवनातील मंडळीबाहेरील बाबींसाठी अस्तित्वात आहे. मंडळीच्या समस्या न्यायसंस्थेकडे नेता कामा नये, पण मंडळीतच त्यांचा न्याय केला जावा.

प्रेषितांची कृत्ये अध्याय 21-22 ही वचने पौलास अटक झाल्याविषयी आणि त्याने न केलेल्या एका अपराधाचा चुकीचा आरोप त्याच्यावर लावण्यात आल्याचे सांगतात. रोमी लोकांनी त्यास अटक केली आणि "सरदाराने असा हुकुम केला की त्याला गढींत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चैकसी चाबकाखाली करण्यास सांगितले. मग त्यांनी त्याला वाद्यांनी तानले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, 'रोमन मनुष्याला व तशांत ज्याला दोषी ठरविले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?'" पौलाने स्वतःचे रक्षण करण्यासाठी रोमी कायद्याचा आणि त्याच्या नागरिकत्वाचा उपयोग केला. योग्य हेतू आणि शुद्ध अंतःकरणाने न्यायसंस्थेचा उपयोग करण्यात काहीही वावगे नाही.

पौल पुढे घोषणा करतो, "तुम्ही एकमेकांवर खटले भरिता ह्यांत सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?" (करिंथकरांस 1 ले पत्र 6:7). येथे पौलाला ज्या गोष्टीची काळजी आहे ती म्हणजे विश्वासणार्याची साक्ष होय. एखाद्या व्यक्तीला न्यायालयात नेऊन त्याला/तिला ख्रिस्तापासून दूर नेण्यापेक्षा आमचा कोणी फायदा घ्यावा, अथवा आमच्याशी गैरवर्तन करावे हे जास्त बरे आहे. जास्त महत्वाचे काय आहे — कायदेशीर युद्ध अथवा व्यक्तीच्या आध्यात्मिक प्राणासाठी लढा?

सारांश म्हणजे, ख्रिस्ती लोकांनी मंडळीच्या बाबींसाठी एकमेकांस न्यायालयात न्यावे काय? मुळीच नाही! ख्रिस्ती लोकांनी दिवाणी हक्कासाठी एकमेकांस न्यायालयात न्यावे काय? जर ते टाळता येऊ शकत असेल, तर नाही. ख्रिस्ती लोकांनी गैरख्रिस्ती लोकांस दिवाणी हक्कांबाबत न्यायालयात न्यावे काय? पुन्हा, जर ते टाळता येऊ शकत असेल, तर नाही. तथापि, काही बाबतीत, जसे स्वतःच्या हक्कांचे रक्षण (जसे प्रेषित पौलाच्या उदाहरणात दिसून येते), कायदेशीर उपाय अमलात आणणे योग्य ठरू शकते.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
खटला/खटला चालविण्याविषयी बायबल काय म्हणते?