एखादी गोष्ट पाप आहे का हे मी कसे जाणू शकतो?


प्रश्नः एखादी गोष्ट पाप आहे का हे मी कसे जाणू शकतो?

उत्तरः
ह्या प्रश्नात दोन बाबींचा समावेश आहे, ज्यांचा बायबल विशिष्टरित्या उल्लेख करते आणि त्यांस पाप घोषित करते आणि ज्यांस बायबल प्रत्यक्षपणे संबोधित करीत नाही. विभिन्न पापातील पवित्र शास्त्रातील यादींत नीतिसूत्रे 6:16-19, गलतीकरांस पत्र 5:19-21, आणि करिंथकरांस 1 ले पत्र 6:9-10 यांचा समावेश आहे. यात कुठलीही शंका नाही की हे परिच्छेद त्या कार्यांस पापमय असे सादर करतात, ज्या गोष्टी देवास नामंजूर आहेत. खून, व्यभिचार, खोटे बोलणे, चोरी करणे, इत्यादी. अधिक कठीण बाब हे ठरविण्यात आहे की त्या क्षेत्रांत पापमय काय आहे ज्यांस बायबल प्रत्यक्षपणे संबोधित करीत नाही. जेव्हा बायबल एखाद्या विषयासंबंधाने बोलत नाही, तेव्हा आमचे मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हास त्याच्या वचनात काही सामान्य सिद्धांत देण्यात आले आहेत.

पहिले म्हणजे, जेव्ळा पवित्र शास्त्रात कोणताही स्पष्ट उल्लेख नसतो, तेव्हा एखादी गोष्ट चूक आहे काय हे विचारणे श्रेयस्कर ठरत नाही, तर, मग, जर ते निश्चितपणे चांगले असेल तर. उदाहरणार्थ, बायबल म्हणते की, आम्ही "संधी साधून घ्यावी" (कलस्सैकरांस पत्र 4:5). येथे पृथ्वीवरील आमचे दिवस अनंतकाळाच्या संबंधात अल्पकालीन व इतके मूल्यवान आहेत की आम्ही स्वार्थाच्या गोष्टींवर आपला वेळ वाया दवडता कामा नये, पण "गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र" उपयोग करावे (इफिसकरांस पत्र 4:29).

उत्तम कसौटी हे ठरविणे आहे की आपण शुद्ध विवेकाने, प्रामाणिकपणे, देवास विनंती करावी की विशिष्ट कार्य त्याने त्याच्या उत्तम हेतूंसाठी आशीर्वादित करावे आणि उपयोगात आणावे. "म्हणून तुम्ही खाता किंवा पीता किंवा जे काही करीता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करावे" (करिंथकरांस 1 ले पत्र 10:31). त्याद्वारे देवास प्रसन्नता मिळते किंवा नाही याविषयी जर शंकेस जागा असेल, तर ते सोडून देणे उत्तम आहे. "जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे" (रोमकरांस पत्र 14:23). आम्ही हे स्मरण केले पाहिजे की आमची शरीरे, तसेच आमचे प्राण, देवाने खंडणी भरून मुक्त केले आहेत आणि ते देवाचे आहेत. "तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा, जो पवित्र आत्मा, देवापासून तुम्हाला मिळाली आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही; तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा" (करिंथकरांस 1 ले पत्र 6:19-20). ह्या थोर सत्याचा आम्ही जे काही करतो आणि जेथे कोठे जातो त्याच्याशी खरा संबंध असला पाहिजे.

याशिवाय, आम्ही आमच्या कृतींचे मूल्यमापन केले पाहिजे केवळ परमेश्वराच्या संबंधात नव्हे, तर आमच्या कुटूंबावर, आमच्या मित्रांवर, आणि इतर लोकांवर त्यांच्या प्रभावाच्या संबंधात. एखादी विशिष्ट गोष्ट आम्हास व्यक्तिगतरित्या हानी पोहोचवत नसेल, पण जर त्याचा हानिकारक प्रभाव अथवा परिणाम इतरांवर घडत असेल, तर ते पाप आहे. "मास न खाणे किंवा द्राक्षरस न पीणे किंवा जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो अथवा अडखळतो अथवा अशक्त होतो ते न करणे बरे... आपण जे अशक्त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे" (रोमकरांस पत्र 14:21; 15:1).

शेवटी हे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त आमचा प्रभु आणि तारणारा आहे, आणि त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यापेक्षा इतर कुठल्याही गोष्टीस प्राधान्य मिळता कामा नये. कुठलीही सवय अथवा मनोरंजन अथवा महत्वाकांक्षा यांस आमच्या जीवनावर अनुचित नियंत्रण करण्याची मोकळीक मिळता कामा नये; केवळ ख्रिस्ताला तो अधिकार आहे, "सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे — तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे — तरी मी कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाणार नाही" (करिंथकरांस 1 ले पत्र 6:12). "आणि बोलणे किंवा करणे, जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा" (कलस्सैकरांस पत्र 3:17).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
एखादी गोष्ट पाप आहे का हे मी कसे जाणू शकतो?