आम्ही स्वर्गात आपल्या मित्रांस आणि कुटुंबजनांस पाहू शकणार का आणि ओळखू शकणार का?


प्रश्नः आम्ही स्वर्गात आपल्या मित्रांस आणि कुटुंबजनांस पाहू शकणार का आणि ओळखू शकणार का?

उत्तरः
अनेक लोक असे म्हणतात की स्वर्गात गेल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट जे ते करू इच्छितात ती म्हणजे त्यांच्या सर्व मित्रांची व प्रियजनांची भेट घेणे जे त्यांच्यापूर्वी निघून गेले. अनंतकाळात, आमच्या मित्रांस आणि कुटुंबजनांस पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि वेळ घालविण्यासाठी भरपूर वेळ असेल. तथापि, स्वर्गात आमचा मुख्य जोर त्या गोष्टीवर नसेल. आपण देवाची उपासना करण्यात आणि स्वर्गातील अद्भुत गोष्टींचा आनंद घेण्यात गूंतलेले असू. आमच्या प्रियजनांसोबत आमची पुनर्मिलन आमच्या जीवनातील देवाची कृपा आणि गौरव, त्याचे अद्भुत प्रेम, त्याची सामर्थ्याची कामे यांचे वर्णन करणे असेल. आम्ही अत्यंत आनंदीत होऊ कारण आपण इतर विश्वासणार्यांसोबत प्रभूची स्तुती व उपासना करू शकतो, विशेषेकरून त्यांच्यासोबत ज्यांस आम्ही पृथ्वीवर प्रीती केली.

आपण यानंतरच्या जीवनात लोकांस ओळखू शकू अथवा नाही याविषयी बायबल काय म्हणजे? एन-दोर येथील भूतविद्याप्रवीण स्त्रीने जेव्हा शमुवेलास मृतांच्या राज्यातून बोलाविले तेव्हा राजा शौलाने शमुवेलास ओळखले (1 शमुवेल 28:8-17). जेव्हा दावीदाचा मुलगा मेला तेव्हा दावीदाने म्हटले, "मी त्याजकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही" (2 शमुवेल 12:23). दाविदाने हे मानले होते की जरी त्याचे मूल लहान बाळ म्हणून मरण पावले, तरीही तो स्वर्गात आपल्या मुलास ओळखू शकेल. लूक 16:19-31 मध्ये, अब्राहाम, लाजर, आणि श्रीमंत मनुष्य हे सर्व एकमेकांस मृत्यूनंतर ओळखू शकत होते. रूपांतरणाच्या वेळी, मोशे आणि एलीयांस ओळखता आले (मत्तय 17:3-4). या उदाहरणांत, बायबल हे दाखविते की मृत्यूनंतर आम्हास ओळखता येईल.

बायबल घोषणा करते की जेव्हा आम्ही स्वर्गात येऊ, तेव्हा "तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल" (योहानाचे 1 ले पत्र 3:2). ज्याप्रमाणे आमची पार्थिव शरीरे प्रथम पुरुष आदामाची होती, त्याचप्रमाणे आमची पुनरूत्थित शरीरे ख्रिस्तासमान असतील (करिंथकरांस 1 ले पत्र 15:47). "आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याच्याही प्रतिरूप धारण करू. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे" (करिंथकरांस 1 ले पत्र 15:49, 53). अनेक लोकांनी ख्रिस्तास त्याच्या पुनरूत्थानानंतर ओळखले (योहान 20:16, 20; 21:12; करिंथकरांस 1 ले पत्र 15:4-7). जर येशूला त्याच्या गौरवीत शरीरात ओळखता आले, तर आम्हास देखील आमच्या गौरवीत शरीरांत ओळखले जाऊ. आपल्या प्रियजनांस पाहता येणे हा स्वर्गाचा गौरवमय पक्ष आहे, पण स्वर्ग हा देवाशी अधिक, आणि आमच्याशी फार कमी जुळलेला आहे. आपल्या प्रियजनांशी पुन्हा जाऊन मिळणे आणि सदाकाळ त्यांच्यासोबत देवाची उपासना करणे यात किती आनंद व सुख आहे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आम्ही स्वर्गात आपल्या मित्रांस आणि कुटुंबजनांस पाहू शकणार का आणि ओळखू शकणार का?