settings icon
share icon
प्रश्नः

इर्ष्येबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

उत्तरः


जेव्हा आपण “ईर्ष्या” हा शब्द वापरतो, तेव्हा आपण ज्याच्याकडे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचा हेवा करण्याच्या अर्थाने वापरतो. या प्रकारची मत्सर हे पाप आहे आणि ख्रिश्चनचे वैशिष्ट्य नाही; उलट, हे दर्शविते की आपण अजूनही आपल्या स्वतःच्या इच्छांद्वारे नियंत्रित आहोत (1 करिंथ 3:3) गलतीकरांस पत्र 5:26 असे म्हणते कि, “आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.”

पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की आपल्याजवळ देवाचे आपल्यासाठी परिपूर्ण प्रकारचे प्रेम आहे. “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही” (1 करिंथ 13:4-5). आपण स्वतःवर आणि आपल्या स्वतःच्या इच्छांवर जितके जास्त लक्ष केंद्रित करू तितकेच कमी आपण देवावर लक्ष केंद्रित करू शकू. जेव्हा आपण आपले अंतःकरण सत्याकडे कठोर करतो, तेव्हा आपण येशूकडे वळू शकत नाही आणि त्याला बरे करण्याची परवानगी देऊ शकत नाही (मत्तय 13:15). परंतु जेव्हा आपण पवित्र आत्म्याला आपल्यावर नियंत्रण ठेवू देतो, तेव्हा तो आपल्यामध्ये आपल्या तारणाचे फळ देईल, जे प्रेम, आनंद, शांती, संयम, दया, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्म-नियंत्रण आहे (गलतीकर 5:22-23).

ईर्ष्या असणे हे सूचित करते की देवाने आपल्याला जे दिले आहे त्यावर आपण समाधानी नाही. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की आपल्याकडे जे आहे त्यामध्ये तृप्त राहा, कारण देव कधीही तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही (इब्री 13:5). ईर्ष्येचा सामना करण्यासाठी आपल्याला येशूसारखे अधिक आणि स्वतःसारखे कमी होणे आवश्यक आहे. पवित्र शास्त्र अभ्यास, प्रार्थना आणि परिपक्व विश्वासणाऱ्यांच्या सहवासातून आपण त्याला ओळखू शकतो. जसे आपण स्वतःऐवजी इतरांची सेवा कशी करावी हे शिकू, आपली अंतःकरणे बदलू लागतील. “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या” (रोमकरांस पत्र 12:2).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

इर्ष्येबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries