settings icon
share icon
प्रश्नः

येशु देव आहे का? येशुने देव असल्याचा दावा केला आहे का?

उत्तरः


पवित्र शास्त्रामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही येशुने ह्या शब्दांना म्हटले “ मी देव आहे.” तरी पण याचा अर्थ असा नाही की,त्याने कधीच जाहिर केले नाही,तो देव आहे. उदाहरणासाठी योहान10:30, मधील येशुच्या’ शब्दांना घेऊन, “मी आणि पिता एक आहे.” आम्ही पाहतो जेव्हा येशुने हे जाहीर केले तेव्हा यहुदी’ लोकांची प्रतीक्रिया अशी होती की येशु स्वताला देव म्हणतो. त्यामुळे त्यांनी त्याला दगड मार करण्याचा प्रयत्न केला“… तु, मानव असून, स्व:ताला देव म्हणवितोस यासाठी”(योहान10:33).यहुद्याना येशुच्या बोलण्याचा अर्थ समजला होता की - येशु स्वताला देव असल्याचा दावा करीत आहे. लक्षात असू दया याठिकाणी येशु आपण देव असल्याचा नकारपण करीत नाही. जेव्हा येशुने जाहिर केले, “मी आणि पिता एक आहोत” (योहान 10:30),तो हे सांगत होता की तो आणि पिता गुणधर्मा मध्ये व व्यक्ती वैशिष्टांमध्ये एक आहोत योहान 8:58 मध्ये आनखी उदाहरण आहे. येशुने जाहिर केले,“मी तूम्हास खचित खचित सांगतो अब्राहाम झाला,त्या पूर्वी मी आहे!” ज्या यहुद्यानी हे ऐकले व त्यांची प्रतिक्रिया ही होती की, त्यांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले होते कारण त्यांनी देव निदा ऐकली होती असे त्यांना वाटले कारण,मोशेने त्याच्या नियम शास्त्राच्या पुस्तकात अशी अज्ञा दिली होती(लेवीय 24:15)

योहान येशुच्या’ दैवी पणाविषयी सांगतो: “शब्द देव होता” आणि “शब्द देही झाला”(योहान1:1,14).ही वचने स्पष्टकरीता येशु हा देहा मध्ये देव आहे. प्रेषीत 20:28 आम्हाला सांगते “देवाची जी मंडळी त्याने आपल्या रंक्ताने मिळविली तीचे पाळन तुम्ही करावे” कोणी मंडळीचे मोल देऊन तीला विकत घेतले-मंडळीच्या देवाने –त्यांच्या स्वत: रक्ताने?अर्थात येशु ख्रिस्ताने. प्रेषीत 20:28 सांगते देवाने मंडळी स्वत:च्या रक्ताने विकत घेतली. याचाअर्थ,येशु देव आहे!

थोमा जो शिष्य होता त्याने येशु, विषयी असे जाहिर केले “माझा प्रभु व माझा देव”(योहान 20:28).याठिकानी येशुने त्याला सुध्दारले नाही. तिताला पत्र 2:13 आम्हाला प्रोत्साहन देते की देवाची व तारणाची वाट पाहा ,येशु ख्रिस्ताची (आजून पाहा 2पेत्र1:1).इब्री 1:8 मध्ये, पिता येशुसाठी जाहीर करतो,“पुत्रा विषयी तो असे म्हणतो, हे देवा,तुझे राज्यासन, युगाने युगीचे आहे, आणि तुझे राजवेत्र सरळतेचे वेत्र आहे.’’’ पिता येशुला “हे देव” म्हणून उललेख करितो यावरून येशू हाच देव आहे असे स्पष्ट होते.

प्रगटीकरणामध्ये ,देवदूताने प्रेषीत योहानाला सुचना केली की फक्त देवाच्या पाया पडून नमस्कार कर(प्रगटी 19:10). पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी येशुने आराधनेच्या स्विकार केला(मतय 2:11,14:33; 28:09,17 लूक 24:52, योहान 9:38).त्याने कधी त्यांची आराधना करणाऱ्या व्यक्तीना धमकावीले नाही.जर येशु हा देव नसता, तर त्याने लोकाना त्यांची आराधना करण्यास मनाई केली असती ,जसे की प्रगटीकरणामध्ये देवदुताने मना केले होते. पवित्र शास्त्रातील पुष्कळ वचने येशु’ देव असल्या विषयी सांगतात.

सर्वात म्हत्वाचे कारण येशुला देव व्हावयाचे होते.जर तो देव नसता तर त्याचे मरण संपूर्ण जगाच्या पाप क्षमेसाठी पूर्ण झाले नसते(Iयोहान 2:2).जर तो देव नसता किंवा जर तो एक घडविलेला प्राणी असता तर तो संपूर्ण मर्याद पापासाठी त्यांने अमर्याद किंमत चुकवू शकला नसता देवच फक्त अमार्याद पापासाठी अमार्याद किंमत चुकवू शकतो. देव संपूर्ण जगाचे पाप घेवू शकतो(2करिथ् 5:21),तो मेला पुन:रुत्थीत झाला, त्याने मरणारवर व पापावर विजय मिळवून प्रमाण दिले आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशु देव आहे का? येशुने देव असल्याचा दावा केला आहे का?
© Copyright Got Questions Ministries