settings icon
share icon
प्रश्नः

इतके वेगवेगळे ख्रिस्ती अन्वयार्थ का आहेत?

उत्तरः


पवित्र शास्त्र म्हणते की “प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच” (इफिस. 4:5). हा परिच्छेद ऐक्यावर जोर देतो जे ख्रिस्ताच्या मंडळीत अस्तित्वात असले पाहिजे कारण आमच्यामध्ये “एकच आत्मा” वस्ती करतो (वचन 4). 2र्‍या वचनात, पौल नम्रता, सौम्यता, धैर्य आणि प्रीती यासाठी आग्रह करतो - हे सर्व गुण ऐक्य राखून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. 1 करिंथ 2:10-13नुसार, पवित्र आत्मा परमेश्वराचे अंतःकरण जाणतो (वचन 11), जे तो त्या लोकांस प्रगट करतो (वचन 10) आणि शिकवितो (वचन 13) ज्यांच्याठायी तो वस्ती करतो. पवित्र आत्म्याच्या या कार्यास प्रकाशन किंवा प्रकटीकरण म्हटले जाते.

सिव्द्ध जगात, प्रत्येक विश्वासणारा पवित्र आत्म्याच्या प्रकाशनावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहून कर्तव्यबुद्धीने बायबलचा अभ्यास करील (2 तीमथ्य. 2:15). पण जसे आपणास स्पष्टपणे दिसून येते की हे सिद्ध जग नाही. ज्याच्याठायी पवित्र आत्मा आहे, त्यापैकी प्रत्येक जण पवित्र आत्म्याचे खरोखर ऐकत नाही. काही ख्रिस्ती लोक आहे जे त्याला दुखवितात (इफिस. 4:30). कोणत्याही शिक्षणतज्ञास विचारा - वर्गात शिकविणाÚया शिक्षकालाही अवखळ विद्यार्थी भेटतात जे शिक्षणाचा विरोध करीत असल्यासारखे वाटते, मग शिक्षक त्यांना शिकविण्याचा कितीही प्रयत्न का करीत असे ना. म्हणून, वेगवेगळे लोक बायबलचा वेगवेगळîा अर्थ काढतात याचे कारण केवळ हे आहे की काही जण त्या शिक्षकाचे - पवित्र आत्म्याचे ऐकत नाहीत. बायबलची शिक्षण देणाÚया लोकांमध्ये विश्वासाची व्यापक भिन्नता आहे याची इतर काही कारणे येथे दिली आहेत.

1. अविश्वास. वस्तुस्थिती ही आहे की ख्रिस्ती असल्याचा दावा करणाÚया अनेक लोकांचा नव्याने कधीही जन्म झालेला नसतो, ते “ख्रिस्ती” हे नाव धारण करतात, पण त्यांच्या अंतःकरणात कधीही खरा बदल झालेला नसतो. अनेक लोक आहेत जे हा देखील विश्वास करीत नाही की बायबल खरे आहे, ते सुद्धा ते शिकविण्याचा प्रयत्न करतात. ते परमेश्वराच्या वतीने बोलण्याचा दावा करतात, तरीही अविश्वासाच्या स्थितीत जगत असतात. पवित्र शास्त्राचे बहुतेक खोटे अर्थबोध याच स्रोतापासून प्राप्त होतात.

जो व्यक्ती विश्वासणारा नाही त्याच्यासाठी पवित्र शास्त्राची योग्य व्याख्या करणे अशक्य आहे. “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतातय आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते” (1 करिंथ 2:14). तारण न पावलेला व्यक्ती बायबलचे सत्य समजू शकत नाही. त्याला कुठलेही प्रकटीकरण किंवा प्रकाशन नसते. याशिवाय पाळक असल्यामुळे किंवा पवित्र शास्त्राचा ज्ञानी पंडित असल्यामुळे व्यक्ती तारण पावलेला आहे याची हमी देता येत नाही.

अविश्वासामुळे उत्पन्न गोंधळाचे एक उदाहरण योहान 12:28-29 मध्ये आढळून येते. येशू पित्याजवळ प्रार्थना करतो, “पित्या, तुझ्या नावाचे गौरव कर.” पिता स्वर्गातून श्रवणीय आवाजाने उत्तर देतो, जे जवळ असलेला प्रत्येक जण ऐकतो. परंतु, अर्थबोधामधील फरक लक्षात घ्या: “तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.” प्रत्येकाने सारख्याच गोष्टी ऐकल्या स्वर्गातून एक स्पष्ट कथन - तरीही प्रत्येकाने तेच ऐकले जे त्यांना ऐकावयाचे होते.

2. प्रशिक्षणाची उणीव. प्रेरित पेत्र पवित्र शास्त्राचा चुकीचा अर्थ लावणाÚयांविरूद्ध ताकीद देतो. तो खोट्या शिकवणीचे आंशिक कारण हे सांगतो की ते “अज्ञान” आहेत (2 पेत्र 3:16). तीमथ्यास सांगण्यात आले की “तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतरूला सादर करण्यास होईल तितके कर” (2 तीमथ्य. 2:15). योग्य बायबल अर्थबोधासाठी जवळचा मार्ग नाही; आम्हास अभ्यास करणे भाग आहे.

3. हीन व्याख्या. उत्तम व्याख्याशास्त्र (पवित्र शास्त्राची व्याख्या करणारे शास्त्र) लागू न केल्यामुळे बÚयाच चुका होतात. कुठलाही संदर्भ घेऊन वचनाचा उपयोग केलाने त्या वचनाच्या हेतूस मोठी हानि होते. अध्यायाच्या आणि पुस्तकाच्या व्यापक अर्थाकडे दुर्लक्ष केले आहे, अथवा ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भ न समजल्यामुळे समस्या उत्पन्न होतील.

4. परमेश्वराच्या संपूर्ण वचनाविषयी अज्ञान. अप्पुलोस हा एक सामथ्र्यवान आणि वाक्पटू प्रचारक होता, पण त्याला केवळ योहानाच्या बापतिस्म्याचे ज्ञान होते. तो येशूविषयी आणि त्याच्या तारणाच्या तरतूदीविषयी अज्ञान होता, म्हणून त्याच्या संदेश अपूरा होता. अक्विला आणि प्रिस्किला त्याला बाजूस घेऊन गेले आणि “त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला” (प्रे. कृत्ये 18:24-28). त्यानंतर, अप्पुलोस येशू खिस्ताचा प्रचार करू लागला. काही गटांजवळ आणि व्यक्तींजवळ आज अपूरा संदेश आहे कारण ते पवित्र शास्त्राचे इतर परिच्छेद वगळून काही थोडक्या परिच्छेदांवर आपले लक्ष केंद्रित करतात. ते पवित्र शास्त्राच्या एका वचनाची दुसÚया वचनाशी तुलना करावयास चुकतात.

5. स्वार्थ आणि अहंकार. दुखाची गोष्ट ही आहे की, बायबलचे अनेक व्याख्याकार आपल्या स्वतःच्या वैय्यक्तिक पूर्वाग्रहावर आणि क्षुल्लक सिद्धांतावर अवलंबून आहेत. काही लोक पवित्र शास्त्रावर “नवीन दृष्टिकोन” सादर करून वैय्यक्तिक लाभाची संधी शोधत असतात. (यहूदाच्या पत्रात खोट्या शिक्षकांचे वर्णन पाहा.)

6. परिपक्व किंवा सिद्ध न होणे. जेव्हा ख्रिस्ती विश्वासणारे हवे तसे परिपक्व किंवा सिद्ध होत नाहीत, तेव्हा देवाचे वचन हाताळण्यावर प्रभाव पडतो. “मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही; कारण त्या वेळेस तुम्हांला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; मानवी रीतीने चालता की नाही?” (1 करिंथ. 3:2-3). अपरिपक्व ख्रिस्ती देवाच्या वचनाच्या “जड अन्नासाठी” तयार नाही. लक्षात घ्या की करिंथ येथील विश्वासणाÚयांच्या दैहिकतेचा पुरावा म्हणजे त्यांच्या मंडळीत असलेली फूट (वचन 4).

7 परंपरांवर अनुचित जोर. काही मंडळîा दावा करतात की ते बायबलवर विश्वास ठेवतात, पण त्यांच्या अर्थबोधात किंवा व्याख्येत स्थापित परंपरेचा पुट मिसळलेला असतो. ज्या ठिकाणी परंपरा आणि बायबलची शिकवण यांच्यात संघर्ष असतो, त्या ठिकाणी परंपरेस प्रथम स्थान दिले जाते. हे प्रभावीरित्या देवाच्या वचनाच्या अधिकाराचा नाकार करते आणि मंडळीच्या पुढारीपणास वर्चस्व देते.

मुख्य गोष्टींबाबत बायबल अत्यंत स्पष्ट आहे. ख्रिस्ताचे परमेश्वरात्व, स्वर्ग आणि नरक यांची वास्तविकता, विश्वासाद्वारे कृपेने तारण याविषयी काहीही संदिग्ध नाही. तथापि, कमी महत्वाचा काही बाबींवर पवित्र शास्त्र कमी स्पष्ट आहे, आणि यामुळे स्वाभाविकतः वेगळे अर्थबोध निर्माण होतात. उदाहरणार्थ, प्रभूभोजन किती वेहा घ्यावे किंवा कुठल्या शैलीचा संगीताचा उपयोग करावा याविषयी बायबलमध्ये कुठलीही प्रत्यक्ष आज्ञा दिलेली नाही. प्रामाणिक, खरे खिस्ती अशा बाहîवर्ती विषयांसंबंधाने परिच्छेदांचे वेगवेगळे अर्थ लावू शकतात.

महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणी पवित्र शास्त्र कट्टर आहे त्या ठिकाणी कट्टर असावे आणि ज्या ठिकाणी पवित्र शास्त्र कट्टर नाही, त्या ठिकाणी आपणही कट्टर असू नये. मंडळîांनी यरूशलेमातील प्रारंभिक मंडळीचा नमून्याचे अनुसरण केले पाहिजे: “ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत” (प्रे. कृत्ये 2:42). प्रारंभिक मंडळी ऐक्य होते कारण ते प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर होते. जेव्हा आपण परत प्रेषितांच्या शिक्षणाकडे जाऊ आणि मंडळीत प्रविष्ट झालेल्या इतर सिद्धांताचा, खूळ, आणि क्लूप्तींचा त्याग करू, तेव्हा पुन्हा एकदा मंडळीत ऐक्य स्थापित होईल.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

इतके वेगवेगळे ख्रिस्ती अन्वयार्थ का आहेत?
© Copyright Got Questions Ministries