settings icon
share icon
प्रश्नः

मध्यस्थीची प्रार्थना? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण मध्यस्थीची प्रार्थना?

उत्तरः


अगदी सोप्या भाषेमध्ये, मध्यस्थीची प्रार्थना ही दुसऱ्यांच्या वतीने प्रार्थना करण्याची कृती आहे. जुन्या करारात अब्राहम, मोशे, दावीद, शमुवेल, हिज्कीया, एलिया, यिर्मिया, यहेज्केल, आणि दानिएल यांच्या बाबतीत प्रार्थनेमध्ये मध्यस्थ अशी भूमिका प्रचलित होती. नव्या करारात ख्रिस्ताला अंतिम मध्यस्थ म्हणून चित्रित केले आहे, आणि यामुळे सर्व ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मध्यस्थी बनतात कारण त्या ख्रिस्ताच्या माध्यमातून आणि ख्रिस्ताच्या द्वारे देवाला अर्पण केल्या जातात. येशू जेंव्हा वधस्तंभावार मेला तेंव्हा त्याने आपल्या आणि देवामधील दरी संपुष्टात आणली. येशूच्या मध्यस्थीमुळे, आपण आता इतर ख्रिस्ती लोकांसाठी किंवा हरवलेल्यांसाठी प्रार्थनेमध्ये त्यांच्या वतीने मध्यस्थी करून देवाला त्यांच्या विनंत्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे मान्य करण्याची विनवणी करू शकतो. “कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे” (1 तीमथ्या 2:5). “तर दांडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठीही मध्यस्थी करत आहे तो ख्रिस्त येशू आहे” (रोम 8:34).

दनिएल 9 व्या अधिकारात मध्यस्थी प्रार्थनेचा एक अद्भुत नमुना आढळतो. त्यामध्ये खऱ्या मध्यस्थी प्रार्थनेचे सर्व घटक आहेत. हे वचनाला प्रतिसाद म्हणून आहे (वचन 2); तळमळीने वैशिष्ठपूर्ण (वचन 3) आणि स्वतःला नाकारून (वचन 4); देवाच्या लोकांच्याबरोबर निस्वार्थपणे ओळखले (वचन 5); कबूल करण्याद्वारे मजबूत केले गेले (वचन 5); देवाच्या चारित्र्यगुणांवर अवलंबून (वचन 4, 7, 9, 15); आणि त्याचे ध्येय देवाचे गौरव होते (वचन 16-19). दनिएलप्रमाणे, ख्रिस्ती लोकांनी इतरांच्या वतीने भग्नहृदयाने आणि पश्चात्तापी वृत्तीने, स्वतःच्या अपात्रतेस ओळखून आणि स्वतःला नाकारून देवाकडे यायला हवे. दनिएल असे बोलत नाही की, “देवा, मला तुझ्याकडे हे मागण्याचा अधिकार आहे, कारण मी तुझा विशेष असा जण, निवडलेला मध्यस्थी करणारा आहे.” तो म्हणतो की, “मी एक पापी आहे,” आणि, त्याचा परिणाम, “मला काहीही मागण्याचा अधिकार नाही.” खरी मध्यस्थीची प्रार्थना देवाची इच्छा जाणून घेणे आणि तिच्यामुळे आपल्याला फायदा होवो किंवा न होवो, आणि ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीही किंमत मोजावी लागो तरी ती पूर्ण होईल हे पाहणे आहे. खरी मध्यस्थीची प्रार्थना आपल्या स्वतःचे नाही तर देवाच्या गौरवला शोधते.

खाली काही थोडक्या लोकांची यादी आहे ज्यांच्यासाठी आपण मध्यस्थीची प्रार्थना केली पाहिजे: सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी (1 तीमथ्या 2:2); सेवकांसाठी (फिलीप्पैकरांस पत्र 1:19); मंडळींसाठी (स्तोत्र 122:6); मित्रांसाठी (ईयोब 42:8); देशातील लोकांसाठी (रोम 10:1); आजाऱ्यांसाठी (याकोब 5:14); शत्रुंसाठी (यिर्मिया 29:7); जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी (मत्तय 5:44); जे आपल्याला सोडतात त्यांच्यासाठी (2 तीमथ्या 4:16); आणि सर्व मनुष्यांसाठी (1 तीमथ्या 2:1).

समकालीन ख्रिस्ती लोकांच्यामध्ये एक चुकीची कल्पना आहे की, जे लोक मध्यस्थीची प्रार्थना करतात त्यांचा “उत्कृष्ठ ख्रिस्ती” अस एक विशेष प्रकार आहे, ज्यांना देवाद्वारे मध्यस्थीच्या विशिष्ठ सेवेसाठी बोलवले जाते. पवित्र शास्त्र स्पष्ट आहे की, सर्व ख्रिस्ती लोकांना मध्यस्थी करण्यासाठी बोलवले आहे. सर्व ख्रिस्ती लोकांच्या हृदयात पवित्र आत्मा आहे, आणि जसा तो देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्यासाठी मध्यस्थी करतो (रोम 8:26-27), तसे आपण सुद्धा एकमेकांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. हा काही खास ख्रिस्ती लोकांच्या वर्गापुरता मर्यादित विशेषाधिकार नाही; ही सर्वांच्यासाठी आज्ञा आहे. वस्तुस्थितीमध्ये, दुसऱ्यांसाठी प्रार्थना न करणे हे पाप आहे. “तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो” (1 शमुवेल 12:23).

निश्चितपणे पेत्र आणि पौल, यांनी जेंव्हा इतरांना त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास सांगितले, तेंव्हा त्यांनी त्यांच्या विनंतीला फक्त त्याच लोकांच्या गटापुरती मर्यादित ठेवली नाही ज्यांना विशेष बोलावणे होते. “पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता; परंतु त्याच्याकरिता मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती” (प्रेषित 12:5). लक्ष द्या की, ज्यांच्याकडे मध्यस्थीचे विशेष वरदान होते फक्त त्यांनी नव्हे तर संपूर्ण मंडळीने त्याच्यासाठी प्रार्थना केली. इफिसकरांस पत्र 6:16-18 मध्ये, पौल इफिसच्या विश्वास ठेवणाऱ्यांना आग्रहाची विनंती करतो-त्यांच्यामधील सर्वांनी-ख्रिस्ती तत्वांच्या मुलभूत जीवनावर, ज्यामध्ये मध्यस्थीच्या प्रार्थनेचा समावेश होतो “सर्व प्रसंगी सर्व प्रकारच्या प्रार्थना आणि विनंत्यासह” मध्यस्थी करण्याचे उत्तेजन देतो. स्पष्टपणे, मध्यस्थीची प्रार्थना ही सर्व विश्वासणाऱ्यांसाठी त्यांच्या ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे.

याव्यतिरिक्त, पौलाने रोमकरांस पत्र 15:30 मध्ये रोममधील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याच्या वतीने प्रार्थना करण्याची विनंती केली. त्याने कलस्सैकरांस पत्र 4:2-3 मध्ये कलस्सै मधील लोकांनासुद्धा त्याच्यासाठी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. पवित्र शास्त्रातील मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या विनंतीसाठी कोठेही असे संकेत दिसून येत नाहीत की, फक्त काही विशिष्ठ लोकांच्या गटाने मध्यस्थी केली. याउलट, जे इतरांना त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी शोधतात, ते त्यांना मिळू शकणाऱ्या सर्व मदतीचा वापर करू शकतात! मध्यस्थी करणे हे काही थोडक्या ख्रिस्ती लोकांचे बोलवणे आणि विशेषाधिकार आहे या कल्पनेला पवित्र शास्त्राचा कोणताही आधार नाही. यापेक्षा वाईट, ही एक विध्वंसक कल्पना आहे जी बऱ्याचदा गर्व आणि श्रेष्ठतेच्या भावनेकडे घेऊन जाते.

देवाने सर्व ख्रिस्ती लोकांना मध्यस्थी होण्यासाठी बोलावले आहे. प्रत्येक विश्वासणारा हा मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये सक्रीय असावा ही देवाची इच्छा आहे. आपल्या प्रार्थना आणि विनंत्यासह सर्वसमर्थ देवाच्या सिंहासनासमोर धैर्याने येऊ शकण्यास आपण सक्षम असू असा आपल्याकडे किती अद्भुत आणि श्रेष्ठ विशेषाधिकार आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मध्यस्थीची प्रार्थना? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण मध्यस्थीची प्रार्थना?
© Copyright Got Questions Ministries