settings icon
share icon
प्रश्नः

आपल्या सर्वांना आदम आणि हव्वा यांच्याकडून वारसाहक्कात पाप मिळाले आहे काय?

उत्तरः


होय, सर्व लोकांना आदम आणि हव्वा, विशेषकरून आदमकडून पाप वारसाहक्कात मिळालेले आहे. पवित्र शास्त्रामध्ये पापाचे वर्णन देवाच्या नियमांचे उल्लंघन (1 योहान 3:4) आणि देवाविरुद्ध बंड (अनुवाद 9:7; यहोशवा 1:18) असे केले आहे. उत्पत्ती 3 आदम आणि हव्वा यांनी देव आणि त्याच्या आज्ञेविरुद्ध केलेल्या बंडाचे वर्णन करते. आदम आणि हव्वा यांनी आज्ञा मोडल्यामुळे, त्यांच्या सर्व वंशजांसाठी पाप हे “वारसाहक्क” बनले. रोम 5:12 आपल्याला सांगते, आदमच्याद्वारे, पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, कारण सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण पसरले. या पसरणाऱ्या पापाला वारसाहक्कात मिळालेले पाप असे ओळखले गेले. जसे आपल्याला आपल्या पालकांकडून शारीरिक चरित्र वारसाहक्कात मिळते, तसेच आपल्याला पापमय स्वभाव आदमकडून वारसाहक्कात मिळालेला आहे.

आदम आणि हव्वा यांना देवाच्या प्रतीरूपात आणि त्याच्या सदृश बनवण्यात आले होते (उत्पत्ती 1:26-27; 9:6). तथापि, आपणसुद्धा आदमचे प्रतिरूप आणि त्याच्या सदृश आहोत (उत्पत्ती 5:3). जेंव्हा आदमने पाप केले, त्याचा परिणाम म्हणून त्याच्या वारसदारापैकी प्रत्येकजण पापाने “प्रभावित” झाला. दावीदाने या वस्तुस्थितीविषयी त्याच्या स्तोत्रांपैकी एका स्तोत्रामध्ये विलाप केला: “पहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेंव्हाचाच मी पातकी आहे” (स्तोत्र 51:5). याचा अर्थ असा नाही की त्याच्या आईने त्याला अवैधरीत्या धारण केले; त्याऐवजी, त्याच्या आईला पाप स्वभाव तिच्या पालकांकडून वारसाहक्कात मिळाला, आणि त्यांना त्यांच्या पालकांकडून तो मिळाला, आणि हे असेच चालू राहिले. जसे आपल्याला मिळाले, तसेच दावीदाला त्याच्या पालकांकडून पाप वारसाहक्कात मिळाले. जरी आपण शक्य तितके चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, तरी वारसाहक्काने मिळालेल्या पापाचा परिणाम म्हणून आपण सर्वजण अजून पापीच आहोत.

पापी म्हणून जन्माला आलेल्याचा परिणाम आपण सर्वांनी पाप केले ही वस्तुस्थिती आहे. रोम 5:12 मधील क्रमवारी लक्षात घ्या: आदमच्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले कारण सर्वांना पाप आदमपासून वारसाहक्कात मिळाले. कारण “सर्वांनी पाप केले आहे नी ते देवाच्या गौरवास उणे पाडले आहेत” (रोम 3:23), आपल्याला आपले पाप धुण्यासाठी एका परिपूर्ण, पापविरहित बलिदानाची गरज आहे, असे काहीतरी ज्याला आपण स्वतः करण्यात असामर्थी आहोत. अभारपुर्वक, येशू ख्रिस्त हा पापापासून तारणारा आहे! आपल्या पापांना येशुबरोबर वधस्तंभाबरोबर खिळले गेले आहे, आणि आता “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे” (इफिस 1:7). देवाने, त्याच्या अमर्याद ज्ञानाने, वारसाहक्कात आपल्याला मिळालेल्या पापापासून उपाय पुरवला, आणि तो उपाय सर्वांसाठी उपलब्ध आहे: “म्हणून, बंधुजनहो, तुम्हाला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हाला पपांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे” (प्रेषित 13:38).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपल्या सर्वांना आदम आणि हव्वा यांच्याकडून वारसाहक्कात पाप मिळाले आहे काय?
© Copyright Got Questions Ministries