settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती लोकांनी वंध्यत्वाचा सामना कसा करावा?

उत्तरः


ज्या जोडप्यांनी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये मुलांची अपेक्षा केली आहे त्यांच्यासाठी वंध्यत्वाची समस्या ही एक कठीण समस्या असू शकते. ख्रिस्ती जोडपे स्वतःला “प्रभु, आम्हीच का” असे विचारताना आढळते. ख्रिस्ती लोकांनी मुलांनी आशीर्वादित होऊन त्यांच्यावर प्रेम करावे आणि त्यांचे चांगले संगोपन करावे हि देवाची इच्छा आहे. शारीरिकदृष्ट्या निरोगी जोडप्यांसाठी, वंध्यत्वाच्या सर्वात धक्कादायक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे हि तात्पुरती किंवा कायम परिस्थिती आहे की नाही हे जाणून न घेता येणे होय. जर ते तात्पुरते असेल तर त्यांनी किती काळ थांबले पाहिजे? जर हे कायमस्वरूपी असेल तर त्यांनी काय करायला हवे?

पवित्र शास्त्रामध्ये कित्येक गोष्टींमध्ये तात्पुरत्या बांझपणाची समस्या दर्शविली गेली आहे:

देवाने अब्राहम आणि सारेला मूल देण्याचे वचन दिले होते, परंतु 90 वर्षापर्यंत तिला इसाहक हा मुलगा झाला नाही (उत्पत्ति 11:30).

रिबेकाचा नवरा इसहाक याने मनापासून प्रार्थना केल्यामुळे देवाने उत्तर दिले ज्यामुळे याकोब व एसाव यांचा जन्म झाला (उत्पत्ति 25:21).

राहेलने प्रार्थना केली आणि शेवटी देवाने “तिचा गर्भ” उघडला. तिला योसेफ व बन्यामीन अशी दोन मुले झाली (उत्पत्ति 30:1; 35:18).

मानोहाची पत्नी, जी काही काळ वांझ होती, तिने शमशोनाला जन्म दिला (शास्ते 13: 2).

वयस्कर अलीशिबाने ख्रिस्ताचा अग्रदूत बाप्तिस्मा देणारा योहान यास जन्म दिला (लूक 1: 7, 36)

सारा, रिबेका, आणि राहेल (इस्राएली राष्ट्राच्या माता) यांचे नापीकपणा महत्त्वपूर्ण आहे कारण शेवटी मुलांना जन्म देण्याची त्यांची क्षमता ही देवाची कृपा आणि कृपा यांचे लक्षण होती. तथापि, वांझ जोडप्यांनी असे मानू नये की देव त्याची दया आणि कृपा राखून ठेवत आहे किंवा त्यांना एखाद्या मार्गाने शिक्षा दिली जात आहे असे त्यांनी समजू नये. ख्रिस्ती जोडप्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे आणि मुले असण्यास असमर्थता हे देवाकडून दिलेली शिक्षा नाही या ज्ञानास चिकटून राहिले पाहिजे.

तर एक वांझ ख्रिस्ती जोडप्याने काय करावे? स्त्रीरोग तज्ञ आणि इतर प्रजनन तज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे. गर्भधारणेच्या तयारीसाठी पुरुष आणि स्त्रि अशा दोघांनीही आरोग्यदायी जीवनशैली जगणे आवश्यक आहे. इस्राएली राष्ट्राच्या मातांनी गर्भधारणेसाठी मनापासून प्रार्थना केली, म्हणून मुलासाठी प्रार्थना करणे निश्चितच चुकीचे नाही. तथापि, मुख्यतः आपण आपल्या जीवनासाठी देवाच्या इच्छेसाठी प्रार्थना केली पाहिजे. जर आपल्याला नैसर्गिक मूल मिळावे ही त्याची इच्छा असेल तर आपणास ते प्राप्त होईल. जर त्याची इच्छा असेल की आपण दत्तक घ्यावे किंवा आपणास संतान प्राप्ती होऊ नये तर आपण हे हि स्वीकारले पाहिजे आणि आनंदाने त्याप्रमाणे केले पहिजे. आम्हाला माहित आहे की देवाची त्याच्या प्रियजनांसाठी एक दिव्य योजना आहे. देव जीवनाचा लेखक आहे. तो गर्भधारणेस परवानगी देतो आणि गर्भधारणा रोखतो. देव सार्वभौम आहे आणि सर्व शहाणपण आणि ज्ञान त्याच्याकडे आहे (रोमन्स 11: 33-36 पहा) “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे...” (याकोब 1:17) हे सत्य जाणून घेणे आणि याचा स्वीकार करणे हे वांझ जोडीदाराच्या अंतःकरणातील वेदना भरण्यासाठी खूप उपयोगी ठरेल .

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती लोकांनी वंध्यत्वाचा सामना कसा करावा?
© Copyright Got Questions Ministries