मानवजात ही देवाच्या प्रतिरूपात आणि सदृश्य निर्मिली गेली आहे याचा अर्थ काय (उत्पत्ती 1:26-27)?


प्रश्नः मानवजात ही देवाच्या प्रतिरूपात आणि सदृश्य निर्मिली गेली आहे याचा अर्थ काय (उत्पत्ती 1:26-27)?

उत्तरः
उत्पत्तीच्या शेवटच्या दिवशी देव म्हणाला, "मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू" (उत्पत्ती 1:26). अशाप्रकारे त्याने "वैय्यक्तिक स्पर्शाने" आपले कार्य समाप्त केले. देवाने मातीपासून आदामास घडविले आणि आपला स्वतःचा श्वास देऊन त्याला जीवन दिले (उत्पत्ती 1:7). यानुसार, मानवजात देवाच्या अखिल सृष्टीमध्ये अद्वितीय आहे, तिला भौतिक शरीर आणि अभौतिक प्राण/आत्मा दोन्ही आहेत.

देवाचे "प्रतिरूप" अथवा "सादृश्य" याचा अर्थ, अगदी सरळ शब्दांत, हा आहे की आम्ही देवासमान असे उत्पन्न केले गेलो होतो. देवास रक्त व मांस आहे ह्या अर्थाने आदाम देवाच्या सदृश नव्हता. पवित्र शास्त्र म्हणते की "देव आत्मा आहे" (योहान 1:24) आणि म्हणून तो देहावाचून अस्तित्वात आहे. तथापि, आदामाचे शरीर जरी पूर्ण आरोग्यवान असे उत्पन्न करण्यात आले होते आणि मृत्यूच्या आधीन नव्हते तरी ते देवाचे जीवन प्रतिबिम्बित करीत नव्हते.

देवाचे प्रतिरूप (लॅटिनः इमेजो डई) मानवजातीच्या अभौतिक भागाचा उल्लेख करते. ते मानवजातीस प्राणी जगतापासून वेगळे करिते, त्यांस त्या प्रभुत्वासाठी योग्य बनविते जे त्यांनी पृथ्वीवर गाजवावे असे देवाने त्यांच्यासाठी योजिले होते (उत्पत्ती 1:28), आणि त्यांस त्यांच्या उत्पन्नकत्र्यासोबत संवाद साधण्याची योग्यता देते. हे सादृश्य मानसिकरित्या, नैतिकरित्या, आणि सामाजिकरित्या आहे.

मानसिकरित्या, मानवजात बुद्धिनिष्ठ, स्वतंत्र इच्छाशक्ती लाभलेला अभिकर्ता म्हणून निर्माण करण्यात आला होता. दुसर्या शब्दांत मानवजात बुद्धिवाद घालू शकते आणि निवड करू शकते. हे देवाच्या बुद्धीचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिबिंब होय. जेव्हा कधी कोणी यंत्राचा शोध लावतो, पुस्तक लिहितो, दृश्य रंगवितो, संगीत सुराचा आनंद घेतो, गणित करतो, अथवा पाळीव प्राण्याचे नाव ठेवितो, तेव्हा तो किंवा ती हे तथ्य जाहीर करीत असतो किंवा असते की आम्ही देवाच्या प्रतिरूपात निर्मिलेले आहोत.

नैतिकदृष्ट्या, मानवजात नीतिमत्वात आणि सिद्ध निष्पाप अवस्थेत, देवाच्या पवित्रतेचे प्रतिबिंब म्हणून उत्पन्न करण्यात आली होती. देवाने पाहिले की जे काही त्याने उत्पन्न केले होते (ज्यात मानवाचा समावेश होता) ते पाहिले आणि त्यास "चांगले आहे" असे म्हटले (उत्पत्ती 1:31). आमची विवेकबुद्धी अथवा "नैतिक होकायंत्र" त्या मूळ अवस्थेचा अवशेष आहे. जेव्हा कधी एखादा कायदा लिहितो, वाईटापासून परावृत्त होतो, उत्तम आचरणाची प्रशंसा करतो, अथवा स्वतःला दोषी मानतो, तेव्हा तो किंवा ती ह्या गोष्टीची पुष्टी करीत असतो किंवा असते की आम्ही देवाच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्मिलेले आहोत.

सामाजिकरित्या, मानवजात सहभागित्वासाठी निर्माण करण्यात आली होती. हे देवाच्या त्रिएक स्वभावाचे आणि त्याच्या प्रीतीचे प्रतिबिंब आहे. एदेन बागेत, मानवजातीचे मूळ नाते देवासोबत होते (उत्पत्ती 3:8 देवासोबत सहभागित्व सुचविते), आणि देवाने प्रथम स्त्रीस घडविले कारण "मनुष्य एकटा असावा हे बरे नाही" (उत्पत्ती 2:18). जेव्हा कधी कोणी लग्न करतो, मित्र बनवितो, लहान मुलास आलिंगन देतो, अथवा मंडळीत जातो, तेव्हा तो किंवा ती हे तथ्य प्रदर्शित करीत असतो किंवा असते की आम्ही देवाच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत.

देवाच्या प्रतिरूपात निर्मिलेले असण्याचा भाग हा आहे की देवाजवळ स्वतंत्र निवडी करण्याची क्षमता होती. जरी त्यांस नीतिमान स्वभाव देण्यात आला होता, तरीही आदाम आणि हव्वेने त्यांच्या उत्पन्नकत्र्याविरुद्ध बंड करण्याची वाईट निवड केली. असे करण्याद्वारे, त्यांनी स्वतःठायी देवाचे प्रतिबिंब डागाळले, आणि ते बिघडलेले प्रतिरूप वारश्याने त्यांच्या वंशजास दिले (रोमकरांस पत्र 5:12). आज, आम्ही अद्याप देवाचे प्रतिरूप आहोत (याकोब 3:9), पण आमच्याठायी पापाचे व्रण देखील आहेत. आमच्यात मानसिकरित्या, नैतिकरित्या, सामाजिकरित्या, आणि भौतिकरित्या, आम्ही पातकाचे परिणाम दिसून येतात.

आनंदाची बातमी ही आहे की जेव्हा देव एखाद्या व्यक्तीस मुक्ती देतो, तेव्हा देव त्याच्या मूळ प्रतिरूपाची पुनस्र्थापना करू लागतो, "आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करतो" (इफिसकरांस पत्र 4:24). ती मुक्ती आम्हास केवळ देवापासून वेगळे करणार्या पापापासून मुक्ती देणारा आमचा त्राता येशू ख्रिस्त याच्यावरील विश्वासाद्वारे देवाच्या कृपेने उपलब्ध आहे (इफिसकरांस पत्र 2:8-9). ख्रिस्ताद्वारे, आम्ही देवाच्या प्रतिरूपात नवी उत्पत्ती असे घडविले गेलो आहोत (2 करिंथ. 5:17).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
मानवजात ही देवाच्या प्रतिरूपात आणि सदृश्य निर्मिली गेली आहे याचा अर्थ काय (उत्पत्ती 1:26-27)?