settings icon
share icon
प्रश्नः

1 तीमथ्य 3:2 मध्ये ‘एक स्त्रीचा पति’ या वाक्यांशाचा अर्थ काय आहे? घटस्फोट घेतलेला पुरुष पाळक, वडील, किंवा डिकन म्हणून सेवा करू शकतो का?

उत्तरः


1 तीमथ्य. 3:2 मध्ये एका स्त्रीचा पती या वाक्यांशाचे किमान तीन अर्थ आहेत. 1) हे असे म्हणता येईल की अनेक पत्नी असणारा वडील, डिकन किंवा पाळक म्हणून पात्र नाही. या इंग्रजी वाक्यांशाचे हे यथाशब्द भाषांतर आहे, परंतु पौल ज्या काळी लिहित होता त्या काळात बहुपत्नीत्व बहुतेक दुर्मिळ होते हे लक्षात घेतल्यास हे काहीसे अशक्य वाटते. 2) ग्रीक भाषांतर शब्दशः “एक स्त्रीचा पुरुष” म्हणून केले जाऊ शकते. दुसर्‍या शब्दांत, बिशपने ज्या स्त्रीशी लग्न केले आहे त्या स्त्रीशी पूर्णपणे निष्ठावान असले पाहिजे. हा अर्थ कबूल करतो की मूळ मजकूर वैवाहिक स्थितीवर नव्हे तर नैतिक शुद्धतेवर केंद्रित आहे. 3) आपण असे समजू शकतो की हा वाक्प्रचार असे जाहीर करतो की, वडील/डिकन/पाळक होण्यासाठी एखाद्या पुरुषाने फक्त एकदाच लग्न केलेले असावे, हे पुनर्विवाह केलेल्या विधुराच्या बाबतीत नाही; दुसर्‍या शब्दांत, पाळक घटस्फोट घेतलेला असू शकत नाही.

अन्वयार्थ 2 आणि 3 आज सर्वात प्रचलित आहेत. स्पष्टीकरण 2 सर्वात मजबूत असल्याचे दिसते, मुख्यतः कारण पवित्र शास्त्र अपवादात्मक परिस्थितींत घटस्फोट घेण्याची परवानगी देते (मत्तय 19:9; 1 करिंथ. 7:12-16). ख्रिस्ती होण्यापूर्वी घटस्फोट घेतलेल्या आणि पुनर्विवाह झालेल्या पुरुषापासून खिस्ती झाल्यानंतर घटस्फोट घेतलेल्या आणि पुनर्विवाह झालेल्या पुरुषांमध्ये फरक करणे देखील महत्वाचे आहे. प्रभु येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून ओळखण्यापूर्वीच्या त्याच्या कृत्यांमुळे अन्यथा पात्र व्यक्तीला चर्चच्या नेतृत्वातून वगळता कामा नये. 1 तीमथ्य 3:2 घटस्फोटीत किंवा पुनर्विवाह झालेल्या पुरुषाला वडील/डिकन/पाळक म्हणून सेवा करण्यापासून वंचित ठेवितो हे आवश्यक नसले तरी इतरही बाबी विचारात घ्याव्यात.

वडील/डिकन/पाळकाची प्रथम पात्रता म्हणजे तो “अदूष्य” असावा (1 तीमथ्य 3:2). जर घटस्फोट आणि/किंवा पुनर्विवाहास कोणताही बायबल आधार नसता तर त्या व्यक्तीने चर्च आणि समाजात त्याची साक्ष बिगडविली आहे; “एका स्त्रीचा पति” म्हणून पात्रतेऐवजी “अदूष्य” म्हणून पात्रता पूर्ण न करणे त्याला पाळक होण्यापासून वंचित करील. वडील/डिकन/पाळक असा मनुष्य असावा ज्याच्याकडे मंडळी व समाज ख्रिस्तासमान असण्याचे व धार्मिक नेतृत्त्वाचे उदाहरण म्हणून पाहू शकेल. जर पूर्वीचा घटस्फोट आणि/किंवा पुनर्विवाह त्याला या आदर्शातून दूर करीत असेल तर त्याने वडील/डिकन/पाळक म्हणून काम करू नये. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, जरी एखादी व्यक्ती वडील/डिकन/पाळक म्हणून सेवा करण्यास अपात्र ठरली असली तरीही ती ख्रिस्ताच्या शरीराचा बहुमूल्य सदस्य आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीजवळ आत्मिक कृपादाने असतात (1 करिंथ 12:4-7) आणि त्यांना त्या कृपादानांनी (1 करिंथ 12:7) इतर विश्वासणार्‍याची वाढ करण्यास पाचारण करण्यात आले आहे. वडील/डिकन/पाळक म्हणून अपात्र ठरलेला व्यक्ती अजूनही चर्चमध्ये शिकवू शकतो, उपदेश देऊ शकतो, सेवा करू शकतो, प्रार्थना करू शकतो, उपासना करू शकतो आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

1 तीमथ्य 3:2 मध्ये ‘एक स्त्रीचा पति’ या वाक्यांशाचा अर्थ काय आहे? घटस्फोट घेतलेला पुरुष पाळक, वडील, किंवा डिकन म्हणून सेवा करू शकतो का?
© Copyright Got Questions Ministries