settings icon
share icon
प्रश्नः

मनुष्याचा प्राण मरणाधीन आहे किंवा अमर आहे?

उत्तरः


निःसंशय मानव आत्मा अमर आहे. जुन्या आणि नवीन करारातील अनेक शास्त्रवचनांमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते: स्तोत्र 22:26; 23:6; 49:7-9; उपदेशक 12:7; दानीएल 12:2-3; मत्तय 25:46; आणि 1 करिंथ 15 12-19.. दानीएल 12:2 म्हणते, “भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.” त्याचप्रमाणे, येशू स्वतः असे म्हणाला की दुष्ट “‘तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.” (मत्तय 25:46). “शिक्षा” आणि “जीवन” या दोहोंसाठी वापरल्या जाणार्‍यासमान ग्रीक शब्दामुळे, हे स्पष्ट आहे की दुष्ट आणि नीतिमान दोघांनाही सार्वकालिक/अमर आत्मा आहे.

बायबलची सुस्पष्ट शिकवण अशी आहे की सर्व लोक, ते तारण पावलेले असो किंवा हरवलेले असो, स्वर्ग किंवा नरकात कायमचे अस्तित्वात आहेत. जेव्हा आपले देह मरण पावतात तेव्हा खरे जीवन किंवा आत्मिक जीवन थांबत नाही. आमचे आत्मे सदासर्वकाळ जिवंत राहू शकतील, जर आपण तारले गेलो तर स्वर्गात परमेश्वराच्या उपस्थितीत किंवा जर आपण परमेश्वराचे तारणाचे दान नाकारले तर नरकाच्या शिक्षेत. खरे म्हणजे, बायबलमधील अभिवचन असे आहे की आपले प्राण केवळ सार्वकालिक जीवन जगणार नाहीत तर आपल्या शरीरांचे देखील पुनरुत्थान होईल. शारीरिक पुनरुत्थानाची ही आशा ख्रिस्ती विश्वासाच्या हृदयस्थळी आहे (1 करिंथ 15:12-19).

जरी सर्व प्राणी अमर आहेत, परंतु आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की देव ज्याप्रकारे सनातन आहे, त्या अर्थाने आपण सनातन नाही. केवह देवच खरोखरच सार्वकालिक आहे कारण केवळ त्याला आरंभ किंवा शेवट नाही. देव सदैव अस्तित्त्वात आहे आणि तो सदैव अस्तित्वात राहील. इतर सर्व संवेदनशील प्राणी, ते मानव असो वा देवदूत, मर्यादित आहेत कारण त्यांना सुरूवात आहे. एकदा आपण अस्तित्वात आल्यावर आपले प्राण सदासर्वकाळ जिवंत राहतील, परंतु बायबल या संकल्पनेचे समर्थन करीत नाही की आमचे प्राण नेहमीच अस्तित्वात राहिले आहेत. आमचे प्राण अमर आहेत, देवाने त्यांना अशाप्रकारे निर्माण केले, परंतु त्यांना प्रारंभ होता; एक काळ असा होता जेव्हा ते अस्तित्वात नव्हते.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मनुष्याचा प्राण मरणाधीन आहे किंवा अमर आहे?
© Copyright Got Questions Ministries