प्रश्नः
माझ्या वडिलांचा आणि आईचा आदर करणे याचा अर्थ काय?
उत्तरः
तुमच्या वडिलांचा आणि आईचा आदर करणे म्हणजे तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये आदरयुक्त असणे आणि त्यांच्या स्थानांप्रती कदर करण्याची मानसिक वृत्ती असणे. आदर या शब्दासाठी ग्रीक शब्द “आदर करणे, पारितोषिक, आणि मूल्य” हे आहेत. आदर देणे म्हणजे फक्त योग्यतेचा आदर करणे नव्हे तर त्या स्थानाचा सुद्धा आदर करणे आहे. उदाहरणार्थ, काही अमेरिकी लोक कदाचित त्यांच्या राष्ट्राध्यक्ष्याच्या निर्णयाशी असहमत असू शकतात, परंतु तरीसुद्धा त्यांनी त्याच्या राष्ट्राचा अध्यक्ष या पदाचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्व वयातील मुलांनी त्यांचे पालक आदराच्या “पात्र” असले किंवा नसले याची पर्वा न करता त्यांच्या पालकांचा आदर केला पाहिजे.
देव आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करण्याचा आपल्याला बोध करितो. तो पालकांचा आदर करण्याला इतके महत्व देतो की, तो त्याचा समावेश दहा आज्ञांमध्ये (निर्गम 20:12) आणि परत नवीन करारामध्ये: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तु पृथ्वीवर दीर्घायू असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. (इफिस 6:1-3) केला. वचनामध्ये पालकांचा आदर करणे ही एकमेव अशी आज्ञा आहे ज्याच्या पारितोषिकाच्या रुपात दीर्घायुष्याचे अभिवचन आहे. जे त्यांच्या पालकांचा आदर करतात ते आशीर्वादित आहेत (यिर्मिया 35:18-19). याच्या विरोधमध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये “भ्रष्ट मनाचे” आणि अभक्तीचे प्रदर्शन करणारे अशांना त्यांच्या पालकांची अवज्ञा करणारे असे दर्शविले गेले आहे (रोम 1:30; 2 तीमथ्या 3:2).
शलमोन, एक सुज्ञ मनुष्य, त्याने मुलांना त्यांच्या पालकांचा आदर करण्याचे आवाहन केले (नितीसुत्रे 1:8; 13:1; 30:17). जरी कदाचित प्रत्यक्षपणे आपण त्यांच्या अधिकाराखाली खूप जास्त वेळ नसू, तरी आपण आपल्या आईवडिलांचा आदर कर या देवाच्या आज्ञेपेक्षा अधिक मोठे होऊ शकत नाही. अगदी येशु, देव जो पुत्र, त्याने सुद्धा स्वतःला त्याच्या दोन्ही पालकांच्या पृथ्वीवरील पालक (लूक 2:51) आणि त्याचा स्वर्गीय पिता (मत्तय 26:39) अधीन केले. ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करत, आपण सुद्धा जसे आपण आदरयुक्तपणे स्वर्गीय पित्याकडे येतो तसे आपल्या पालकांशी वागले पाहिजे (इब्री 12:9; मलाखी 1:6).
निश्चितच, आपल्याला आपल्या पालकांचा आदर करण्याची आज्ञा दिली गेली आहे, परंतु कसे? त्यांचा आदर कृती आणि वृत्ती या दोन्हींनी करा (मार्क 7:6). त्यांनी सांगितलेल्या आणि न सांगितलेल्या इच्छांचा आदर करा. “सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण धर्मानिंदक वाग्दंडाला मोजीत नाही” (नीतिसुत्रे 13:1). मत्तय 15:3-9 मध्ये येशू परुश्यांना आईचा आणि वडिलांचा आदर कर या देवाच्या आज्ञेची आठवण करून देतो. ते कायद्यातील अक्षरांचे पालन करीत होते, परंतु त्यांनी त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या परंपरा जोडल्या होत्या त्या प्रामुख्याने त्याच्यावर वरचढ झाल्या. ज्या वेळी ते शब्दांमध्ये त्यांच्या पालकांचा आदर करीत होते, त्याच वेळी त्यांच्या कृत्यांनी त्यांचा खरा हेतू सिद्ध केला. आदर हा ओठांच्या सेवेपेक्षा कितीतरी जास्त आहे. या परीच्छेदामधील “आदर” हा शब्द क्रियापद आहे, आणि तसे, तो योग्य कृतीची मागणी करतो.
आपल्या विचारांत, शब्दात, आणि कृतीत जसे आपण देवाला गौरव देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो, तसेच आपण आपल्या पालकांना आदर देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरुण मुलांसाठी, पालकांची आज्ञा पाळणे हे त्यांचा आदर करण्याबरोबर ययेते. ज्यामध्ये ऐकणे, दखल घेणे आणि त्यांच्या अधिकाराच्या अधीन राहणे याचा समावेश होतो. मुले प्रौढ झाल्यानंतर, मुले म्हणून ते जे काही शिकले आहेत ते त्यांना शासन, पोलीस, आणि मालक यांचा आदर करण्यात उपयोगी पडेल.
ज्यावेळी आपल्याला आपल्या पालकांचा आदर करणे गरजेचे आहे, त्यावेळी त्यामध्ये दुष्टतेचे अनुकरण करण्याचा समावेश होत नाही (यहेज्केल 20:18-19). जर पालकांनी कधीही मुलाला असे काही करण्याच्या सूचना केल्या जे देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे, तर त्या मुलाने त्याच्या/तिच्या पालकांच्या ऐवजी देवाची आज्ञा पाळली पाहिजे (प्रेषित 5:28).
आदर आदराला उत्पन्न करतो. देव अशा लोकांचा आदर करत नाही जे त्याची आज्ञा आपल्या पालकांचा आदर करा याचे पालन करत नाहीत. जर देवाला प्रसन्न करणे आणि आशीर्वादित होण्याची आपली इच्छा असेल तर आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. आदर करणे हे सोपे नाही, ते नेहमीच आनंददायी नसते, आणि निश्चितच आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर शक्य नाही. देवाचे गौरव करणे या आपल्या आयुष्याच्या ध्येयाचा आदर हा खात्रीचा मार्ग आहे. “मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे” (कलस्सैकरांस पत्र 3:20).
English
माझ्या वडिलांचा आणि आईचा आदर करणे याचा अर्थ काय?