settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती धर्माचा इतिहास काय आहे?

उत्तरः


खिस्ती धर्माचा इतिहास खरोखर पाश्चात्य संस्कृतीचा इतिहास आहे. मोठ्या प्रमाणात कला, भाषा, राजकारण, कायदा, कौटुंबिक जीवन, दिनदर्शिका, तारखा, संगीत आणि आम्ही कसा विचार करतो यावर अगदी जवळजवळ दोन हजार वर्षे ख्रिस्ती धर्माचा समाजात सर्वांगीण प्रभाव पडला आहे. म्हणून चर्चची कथा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मंडळीची युरूवात

मंडळीची सुरूवात येशूच्या पुनरूत्थानानंतर 50 दिवसांनी झाली (सन 30). येशूने वचन दिले होते की तो आपली मंडळी उभारील (मत्ती 16:18), आणि पेन्टेकाॅस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या आगमनासोबत (प्रे. कृत्ये 2:1-4), मंडळीची - चर्च किंवा इक्लेसिया (”बाहेर करण्यात आलेली मंडळी“) - अधिकृतरित्या सुरूवात झाली. तीन हजार लोकांनी त्या दिवशी पेत्राच्या उपदेशास प्रतिसाद दिला आणि त्यांनी ख्रिस्ताचे अनुकरण करण्याची निवड केली.

आरंभी ख्रिस्ती विश्वासात येणारे यहूदी किंवा यहूदी विश्वासात आलेले लोक होते, आणि मंडळी यरूशलेमात केन्द्रित होती. यामुळे, आरंभी ख्रिस्ती विश्वासास यहूदी पंथ समजले जात असे, जो परूशी, सदूकी, अथवा एसेनेस सम्प्रदायाच्या जवळचा होता. तथापि, प्रेषितांनी ज्या गोष्टीचा प्रचार केला ती इतर यहूदी गट ज्या गोष्टीचा प्रचार करीत होते त्यापेक्षा मूलतः भिन्न होती. येशू यहूदी मशीहा (अभिषिक्त राजा) होता जो नियमशास्त्र पूर्ण करावयास (मत्तय 5:17) आणि त्याच्या मृत्यूवर आधारित नवीन करार स्थापित करावयास आला होता (मार्क 14:24). त्यांनी आपल्या स्वतःच्या मशीहाचा वध केला या आरोपासह या संदेशाने अनेक यहूदी पुढार्‍यास संतप्त केले, आणि तारसाच्या शाऊलासारख्या काहींनी या ”मार्गाचा“ नायनाट करण्यासाठी पाऊल उचलले (प्रे. कृत्ये 9:1-2).

असे म्हणणे योग्य आहे की ख्रिस्ती विश्वासाचे मूळ यहूदी धर्मात आहे. जुन्या कराराने नव्या करारासाठी मूलभूत कार्य केले, आणि जुन्या कराराचे ज्ञान असल्यावाचून ख्रिस्ती धर्मास पूर्णपणे समजणे अशक्य आहे (मत्तय आणि इब्री ही पुस्तके पहा). जुना करार मशीहाच्या आगमनाची गरज समजावितो, त्यात मशीहाच्या लोकांचा इतिहास आहे आणि तो मशीहाच्या आगमनाचे भाकित करतो. त्यानंतर नवा करार मशीहाच्या आगमनाविषयी आणि पापापासून आम्हास वाचविण्यासाठी त्याने केलेल्या कार्याविषयी आहे. त्याच्या जीवनात, येशूने 300 पेक्षा अधिक भाकिते पूर्ण करून, हे सिद्ध केले की जुन्या करारात त्याचीच अपेक्षा करण्यात आली होती.

प्रारंभिक मंडळीची वाढ

पेन्टेकाॅस्टनंतर लवकरच, मंडळीची दारे गैरयहूदी लोकांसाठी उघडली गेली. सुवार्तिक फिलिप्पाने शमरोनी लोकांस सुवार्ता सांगितली (प्रे. कृत्ये 8:5), आणि अनेकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेविला. प्रेषित पेत्राने कर्नेलियसच्या गैरयहूदी घराण्यास प्रचार केला (प्रे. कृत्ये 10), आणि त्यांना सुद्धा पवित्र आत्मा मिळाला. प्रेषित पौलाने (मंडळीचा पूर्वी छळ करणारा) संपूर्ण ग्रीक रोमन जगात सुवार्तेचा प्रसार केला, तो रोमपर्यंत सुद्धा गेला (प्रे. कृत्ये 28:16) आणि शक्यतः स्पेनपर्यंत.

सन 70 पर्यंत, ज्या वर्षी यरूशलेमाचा नाश झाला, त्या वर्षी नव्या कराराची बहुतेक पुस्तके पूर्ण झाली होती आणि मंडळîांत वितरीत करण्यात आली होती. पुढील 240 वर्षे रोमद्वारे ख्रिस्ती विश्वासणार्‍याचा छळ करण्यात आला, कधी कधी स्वैरपणे, तर कधी कधी शासनाच्या आदेशाने.

दुसर्‍या आणि तिसर्‍या शतकात, संख्या वाढत असताना चर्चचे नेतृत्व अधिकाधिक श्रेणीबद्ध बनले. यावेळी अनेक पाखंडी मते उघडकीस आली आणि त्यांचे खंडन या काळात करण्यात आले आणि नवीन कराराच्या ग्रंथाविषयीसहमती दर्शविली गेली. छळ तीव्र होतच राहिला.

रोमन चर्चचा उदय

सन 312 मध्ये, रोमन सम्राट कॉन्स्टँटाईनने धर्मांतरणाचा अनुभव असल्याचा दावा केला. सुमारे 70 वर्षांनंतर, थियोडोसियसच्या कारकिर्दीत खिस्ती धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बिशपांना शासनात सन्मानाची जागा दिली गेली आणि सन 400 पर्यंत “रोमन” आणि “ख्रिश्चन” अक्षरशः समानार्थी होते

कॉन्स्टँटाईन नंतर ख्रिस्ती लोकांचा यापुढे छळ केला गेला नाही. कालांतराने, ख्रिस्ती धर्मात “रूपांतरण” न केल्यास विधर्मियांचा छळ केला जाऊ लागला. अशा जबरदस्तीने केलेल्या धर्मांतरणामुळे बरेच लोक मनापासून खर्या बदलाशिवाय चर्चमध्ये येऊ लागले. मूर्तिपूजक आपल्या मूर्ती आणि ज्या प्रथांची त्यांना सवय होती, त्या सोबत घेऊन आले आणि मंडळीत बदल घडून आला; चिन्हे, विस्तृत वास्तुकला, तीर्थक्षेत्रे आणि संतांची उपासना इत्यादी गोष्टी लवकरच मंडळीच्या साध्या सरळ उपासनेत जोडल्या गेल्या. याच काळात, काही खिस्ती रोम सोडून गेले आणि त्यांनी भिक्खूंच्या रूपात एकांतात राहण्याची त्यांनी निवड केली आणि मूळ पाप धुण्याचे साधन म्हणून नवजात मुलांचा बाप्तिस्मा केला जाऊ लागला.

जरी पुढील शतकांत, मंडळीचा अधिकृत सिद्धांत ठरविण्याच्या प्रयत्नात, पाळकांच्या गैरवर्तनास आळा घालण्यासाठी, आणि लढाऊ गटांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध चर्च परिषदा भरल्या, जसजसे रोमन साम्राज्य कमकुवत होत गेले तसतसे मंडळी अधिक सामथ्र्यवान बनू लागली आणि पाश्चात्य मंडळी आणि पौर्वात्य मंडळी यांच्यात बरेच मतभेद वाढले. रोममध्ये स्थित पाश्चात्य (लॅटिन) मंडळीने इतर सर्व मंडळ्यांवर प्रेषितांचा अधिकार असल्याचा दावा केला. रोमच्या बिशपने स्वतःला “पोप” (पिता) म्हणून संबोधण्यास सुरवात केली होती. कॉन्स्टँटिनोपलमधील पौर्वात्य (ग्रीक) मंडळीला हे पटले नव्हते. धार्मिक, राजकीय, कार्यपद्धती आणि भाषिक भाग या सर्वांनी 1054 मध्ये मोठ्या मतभेदास किंवा ग्रेट सिजमला हातभार लावला, ज्यात रोमन कॅथलिक (सार्वत्रिक) मंडळी आणि पौर्वात्य ऑर्थोडॉक्स मंडळीने एकमेकांना बहिष्कृत केले आणि त्यांनी सर्व संबंध तोडले

मध्य युग

मध्ययुगात रोमन कॅथलिक चर्चने यूरोपात आपली सत्ता कायम ठेवली आणि पोपने लोकांच्या जीवनातील सर्व स्तरांवर अधिकार गाजवणारे आणि राजे म्हणून जगण्याचे काम केले. मंडळीच्या पुढार्‍यात भ्रष्टाचार आणि लोभ ही एक सामान्य गोष्ट होती. 1095 ते 1204 पर्यंत पोपांनी मुस्लिम प्रगती मागे टाकण्यासाठी आणि यरूशलेमास मुक्त करण्याच्या प्रयत्नात रक्तरंजित आणि महागड्या धर्मयुद्धांच्या मालिकेचे समर्थन केले.

सुधारणा

वर्षानुवर्षे, अनेक लोक रोमन चर्चमधील धार्मिक, राजकीय आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते. सर्वांना कोणत्या ना कोणत्याप्रकारे गप्प करण्यात आले होते. पण 1517 मध्ये मार्टिन लूथर नावाच्या जर्मन भिक्षूने चर्चच्या विरोधात भूमिका घेतली आणि सर्वांनी ऐकले. ल्यूथरच्या सहाय्याने प्रोटेस्टंट सुधार झाला आणि मध्ययुगाचा अंत झाला

ल्यूथर, कॅल्व्हिन आणि झ्विंगली यांच्यासह सुधारकांत ईश्वरविज्ञानाच्या अनेक बारीक मुद्द्यांमध्ये भिन्नता होती पण चर्चच्या परंपरेवरील बायबलच्या सर्वोच्च अधिकारावर आणि कर्मावाचून केवळ विश्वासाद्वारे कृपेने पापी लोकांस तारण प्राप्त होते यावर त्यांनी भर दिला. इफिस 2:8-9).

जरी कॅथोलिक धर्माने यूरोपात पुनरागमन केले, आणि प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक यांच्यात अनेक युद्धे सुरू झाली, तरीही सुधारणेने रोमन कॅथोलिक चर्चची शक्ती यशस्वीरित्या मोडली आणि आधुनिक युगाचे द्वार उघडण्यास मदत केली..

आधुनिक मंडळी

आज, रोमन कॅथलिक चर्च आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चने कॅथलिक आणि लूथरन यांच्याप्रमाणे त्यांचे तुटलेले संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. इव्हॅन्जेलिकल चर्च पूर्णतः स्वतंत्र आहे आणि सुधारित ईश्वरविज्ञानात रुजलेले आहे. पेन्टेकोस्टॅलिझम, करिश्माई चळवळ, इक्यूमेनिकलिजम आणि विविध पंथांचा उदय देखील मंडळीने पाहिला आहे.

आपल्या इतिहासावरून आपण काय शिकतो

जर आपण मंडळीच्या इतिहासामधून दुसरे काहीच शिकत नाही तर आपण कमीत कमी “ख्रिस्ताचे वचन आमच्यात भरपूर राहू देण्याचे” महत्व जाणले पाहिजे (कलस्सै 3:16) देण्याचे महत्त्व कमीतकमी ओळखले पाहिजे. पवित्र शास्त्र काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार जगण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण जबाबदार आहे. जेव्हा बायबलची शिकवण मंडळी विसरे आणि येशूने शिकवलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा गोंधळ माजतो.

आज अनेक मंडळ्या आहेत, पण केवळ एकच शुभवर्तमान आहे. हा “एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला विश्वास आहे“ (यहूदा 3). आपण त्या विश्वासाचे रक्षण करण्याविषयी सावध असले पाहिजे आणि त्यात फेरबदल न करता जो इतरांपर्यंत पोहोचविला पाहिजे, परमेश्वर आपली मंडळी उभारण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण करीत राहील.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती धर्माचा इतिहास काय आहे?
© Copyright Got Questions Ministries