settings icon
share icon
प्रश्नः

नरक किंवा अधोलोक खरा आहे काय? नरक सार्वकालिक आहे काय?

उत्तरः


ही मोठी मनोरंजक गोष्ट आहे की नरकाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक मोठ्या टक्क्याने लोक स्वर्गाच्या अस्तित्वावर विश्वास धरतात. बायबलनुसार, जरी, नरक हा स्वर्गाइतकाच खरा आहे. बायबल स्पष्टपणे आणि निक्षून सांगते की स्वर्ग ही खरी जागा आहे जेथे दुष्ट/येशूवर विश्वास न धरणारे पाठविले जातात. आम्ही सर्वांनी देवाविरुद्ध पाप केले आहे (रोमकरांस पत्र 3:23). त्या पापाची योग्य शिक्षा आहे मृत्यू (रोमकरांस पत्र 6:23). आमचे सर्व पाप हे शेवटी देवाविरुद्ध आहे (स्तोत्र 51:4), आणि म्हणून देव अनंत आणि सनातन आहे. नरक ही अनंत आणि सार्वकालिक मृत्यू आहे जो आम्ही आपल्या पापामुळे मिळविला आहे.

नरकात दुष्ट मृतांच्या शिक्षेचे वर्णन संपूर्ण पवित्र शास्त्रात "सार्वकालिक आग" (मत्तय 25:41), "न विझणारी आग" (मत्तय 3:12), "अप्रतिष्ठा व सार्वकालिक धिक्कार" (दानीएल 12:2), असे स्थान जेथील "अग्नी विझत नाही" (मार्क 9:44-49), "यातना" आणि "अग्नीचे" स्थान (लूक 16:23-24), "युगानुयुगाचा नाश" (थेस्सलनीकाकरांस 2 रे पत्र 1:9), "ज्याच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो" (प्रकटीकरण 14:10-11), आणि "अग्नीचे व गंधकाचे सरोवर" जेथे दुष्टांस "रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल" (प्रकटीकरण 20:10) असे करण्यात आले आहे.

जसे स्वर्गात नीतिमानास शाश्वत सुख प्राप्त होईल त्याचप्रमाणे अधोलोकात दुष्टाची शिक्षा कधी समाप्त होणारी नाही. स्वतः येशू हे दाखवितो की नरकातील शिक्षा ही स्वर्गातील जीवनासारखीच सार्वकालिक आहे (मत्तय 25:46). दुष्ट सदाकाळसाठी देवाच्या त्वेषाच्या व क्रोधाच्या आधीन आहे. अधोलोकातील लोक देवाचा सिद्ध न्याय कबूल करतील (स्तोत्र 76:10). अधोलोकातील लोक हे जाणतील की त्यांची शिक्षा न्याय्य आहे आणि केवळ तेच दोषी आहेत (अनुवाद 32:3-5). होय, अधोलोक खरा आहे. होय, अधोलोक हे छळाचे आणि शिक्षेचे स्थान आहे जे सदाकाळ टिकून राहील, त्याचा अंत नाही. परमेश्वराची स्तुती करा की, येशूच्याद्वारे, आपण ह्या सार्वकालिक भवितव्यापासून बचाव करून घेऊ शकतो (योहान 3:16, 18, 36).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

नरक किंवा अधोलोक खरा आहे काय? नरक सार्वकालिक आहे काय?
© Copyright Got Questions Ministries