settings icon
share icon
प्रश्नः

आत्म्यास खिन्न करण्याचा, आत्म्यास विझविण्याचा अर्थ काय आहे?

उत्तरः


जेव्हा पवित्र शास्त्रात “विझवणे” हा शब्द वापरला जातो तेव्हा तो आगीचे शमन करण्याविषयी बोलतो. जेव्हा विश्वासणारे त्यांच्या शस्त्रसामग्रीचा एक भाग म्हणून विश्वासाची ढाल धारण करतात तेव्हा (इफिसकर 6:16), ते सैतानाचे अग्नीमय बाण विझवितात. ख्रिस्ताने नरकाचे वर्णन असे स्थान म्हणून केले जेथील आग विझविणार नाही (मार्क 9:44, 46, 48). त्याचप्रमाणे, पवित्र आत्मा हा प्रत्येक विश्वासणाऱ्यात राहणारी एक आग आहे. तो स्वतःला आमच्या कृतीत आणि दृष्टिकोनात व्यक्त करू इच्छितो. जेव्हा विश्वासणाराच्या आपल्या कृतीत आत्मा दिसून देत नाही, जेव्हा आपण चूक ते करतो तेव्हा आपण आत्म्यास दडपतो किंवा विझवितो. आपण आत्म्यास त्याला हवे त्यास स्वतःस प्रकट करू देत नाही.

आत्म्याला खिन्न करण्याचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी, आपण प्रथम हे समजून घेतले पाहिजे की याद्वारे दिसून येते की आत्म्यास व्यक्तित्व आहे. केवळ एका व्यक्तीलाच दुःख होते; म्हणून, ही भावना होण्यासाठी आत्मा एक ईश्वरीय व्यक्ती असला पाहिजे. एकदा आपल्याला हे समजल्यानंतर, तो कसा दुःखी होतो हे आपण समजू शकतो, मुख्यतः कारण आपणही दुःखी आहोत. इफिस 4:30 आपल्याला सांगते की आपण आत्म्याला दुःखी करू नये. आपण मूर्तिपूजकांसारखे जगण्याद्वारे (4:17-19) खोटे बोलून (4:25), रागावून (4:26-27), चोरी करून (4:28)), शाप देऊन (4:29) ), कटुत्वाद्वारे (4:31), क्षमा न करण्याद्वारे (4:32) आणि लैंगिकदृष्ट्या अनैतिक बनून (5:3-5) आत्म्यास खिन्न करतो. आत्म्याला खिन्न करणे म्हणजे पाप्यासारखे वागणे, मगते केवळ विचारात असो किंवा कृतींत.

आत्मा विझविणे आणि आत्म्यास खिन्न करणे या दोन्ही गोष्टी समान आहेत. दोन्हीही ईश्वरी जीवनशैलीत अडथळा आणतात. जेव्हा विश्वासणारा देवाविरूद्ध पाप करतो आणि आपल्या स्वतःच्या ऐहिक इच्छांचे अनुसरण करतो तेव्हा दोन्ही गोष्टी घडतात. अनुसरण करण्याचा एकमेव योग्य मार्ग हा आहे जो विश्वासणाऱ्याला देवाजवळ आणि पवित्रतेकडे नेतो, आणि जग व पापांपासून दूर नेतो. ज्याप्रमाणे आपणास दुःखी होणे आवडत नाही आणि ज्याप्रमाणे आपण जे चांगले ते विझवण्याचा प्रयत्न करीत नाही - त्याचप्रमाणे आपण त्याच्या आत्म्याचे अनुसरण करण्यास नकार देऊन पवित्र आत्म्यास दुःखी किंवा खिन्न करू नये.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आत्म्यास खिन्न करण्याचा, आत्म्यास विझविण्याचा अर्थ काय आहे?
© Copyright Got Questions Ministries