settings icon
share icon
प्रश्नः

ग्रेट कमिशन काय आहे?

उत्तरः


मत्तय 28:19-20 महान आज्ञेध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे सांगण्यात आले आहे: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” स्वर्गात जाण्यापूर्वी येशूने प्रेषितांना ही आज्ञा दिली आणि येशूने त्याच्या अनुपस्थितीत प्रेषितांना आणि ज्यांनी त्यांचे अनुकरण केले त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे याची हि मूलत: रूपरेषा आहे.

हे रूचक आहे की, मूळ ग्रीक भाषेमध्ये, मत्तय 20:19-20 मधील एकमेव थेट आज्ञा “शिष्य बनवणे” आहे. आपण संपूर्ण जगात जात असताना ग्रेट कमिशन आपल्याला शिष्य बनवण्याची सूचना देते. “जा,” “बाप्तिस्मा” आणि “शिकवा” च्या सूचना अप्रत्यक्ष आज्ञा आहेत – ज्या मूळ मध्ये सहभागी आहेत. आपण शिष्य कसे बनवायचे? त्यांना बाप्तिस्मा देऊन आणि येशूने सांगितलेल्या सर्व गोष्टी शिकवून. “शिष्य बनवा” ही ग्रेट कमिशनची प्राथमिक आज्ञा आहे. “जाणे”, “बाप्तिस्मा देणे”, आणि “शिकवणे” ही अशी साधने आहेत ज्याद्वारे आपण “शिष्य बनवण्याची” आज्ञा पूर्ण करतो.

शिष्य म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीकडून सूचना प्राप्त करते; ख्रिस्ती शिष्य हा ख्रिस्ताचा बाप्तिस्मा घेणारा अनुयायी आहे, जो ख्रिस्ताच्या शिकवणीवर विश्वास ठेवतो. ख्रिस्ताचा शिष्य येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतो, त्याच्या बलिदानाला चिकटून राहतो, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, पवित्र आत्मा धारण करतो आणि त्याचे कार्य करण्यासाठी जगतो. ग्रेट कमिशनमधील “शिष्य बनवण्याच्या” आज्ञेचा अर्थ लोकांना ख्रिस्ताचे अनुसरण करणे आणि त्याचे पालन करणे शिकवणे किंवा प्रशिक्षित करणे आहे.

अनेक लोक प्रेषितांची कृत्ये 1:8 ला देखील महान आज्ञेचा भाग म्हणून समजतात: “परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” महान आज्ञा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सक्षम आहे. आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत, आमच्या शहरांमध्ये (यरुशलेम), आमच्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये (यहूदीया आणि शोमरोन), आणि इतर कुठेही देव आपल्याला (पृथ्वीच्या टोकापर्यंत) पाठवतो.

प्रेषितांची कृत्ये या संपूर्ण पुस्तकात, प्रेषितांनी महान आज्ञेची पूर्तता कशी केली हे आपण बघतो, जसे की प्रेषितांची कृत्ये 1:8 मध्ये वर्णन केले आहे. प्रथम, यरुशलेममध्ये सुवार्तेची घोषणा (प्रेषित 1-7); मग पवित्र आत्मा यहूदिया आणि शोमेरियाद्वारे सभेचा विस्तार करतो (प्रेषित 8-12); शेवटी, सुवार्ता "पृथ्वीच्या टोकापर्यंत" पोहोचते (प्रेषित 13-28). आज, आम्ही ख्रिस्तासाठी राजदूत म्हणून काम करत आहोत आणि “'देवाशी समेट करा' असे आपण ख्रिस्ताच्या वतीने विनवणी करतो” (2 करिंथ 5:20 सीएसबी)

. “देवाच्या पवित्र लोकांवर एकेकाळी सोपवलेला विश्वास” (यहूदा 1:3) हि आम्हाला एक मौल्यवान भेट मिळाली आहे. ग्रेट कमिशनमधील येशूचे शब्द देवाचे हृदय प्रकट करतात, ज्याला “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे” अशी त्याची इच्छा आहे (1 तीमथ्य 2:4). प्रत्येकाने ऐकेपर्यंत महान आज्ञा आम्हाला सुवार्ता सांगण्यास भाग पाडतो. येशूच्या कथेतील सेवकांप्रमाणे, आपण राज्याच्या व्यवसायाबद्दल सर्व राष्ट्रांना शिष्य बनवणार आहोत: “त्याने आपल्या दहा सेवकांना बोलावले आणि त्यांना दहा पौंड दिले आणि त्यांना सांगितले,“ मी येईपर्यंत व्यापून राहा ”(लूक 19:13, केजेव्ही).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ग्रेट कमिशन काय आहे?
© Copyright Got Questions Ministries