प्रश्नः
चांगले आईबाप होण्याविषयी बायबल काय म्हणते?
उत्तरः
मुलांचे संगोपन हे कठीण आणि आव्हानात्मक साहसकृत्य असू शकते, पण त्याचवेळी ते अत्यंत लाभदायक व समाधानकारक कार्य ठरू शकते जे आम्ही करतो. बायबलमध्ये आपण आपल्या मुलांचे यशस्वीरित्या पालनपोषण करून त्यांना देवाचे स्त्री व पुरुष कसे बनवू शकतो याविषयी बरेच काही लिहिलेले आहे. सर्वात पहिली गोष्ट जी आम्ही केली पाहिजे ती आहे त्यांस देवाच्या वचनाविषयी सत्य शिकविणे.
देवावर प्रीती करण्याद्वारे आणि स्वतःस त्याच्या आज्ञांप्रत समर्पित करण्याद्वारे त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण बनण्यासोबतच, आम्हाला तसे करण्यासाठी मुलांना शिकविण्यासंबंधी अनुवाद 6:7-9 च्या आज्ञेकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा परिच्छेद अशा शिक्षणाच्या चिरस्थायी स्वरूपावर जोर देतो. असे सर्व वेळी केले पाहिजे — घरात, मार्गावर, रात्रीच्या वेळी, आणि सकाळी. बायबलचे सत्य आमच्या घरांचा पाया असला पाहिजे. ह्या आज्ञांच्या सिद्धांतांचे पालन करण्याद्वारे, आम्ही आपल्या मुलांना हे शिकवितो की देवाच्या आज्ञेचे पालन करणे सतत असले पाहिजे, रविवारच्या पहाटेसाठी अथवा रात्रीच्या प्रार्थनांसाठी राखून ठेविता कामा नये.
जरी आमची मुले प्रत्यक्ष शिकवणीद्वारे बरेच काही शिकतात, तरीही आमचे निरीक्षण करून ते आणखी शिकतात. म्हणूनच जे काही आम्ही करतो त्याबाबत आम्ही सावध असले पाहिजे. आम्ही प्रथम देवाने आम्हास दिलेल्या भूमिकांचा स्वीकार केला पाहिजे. पती आणि पत्नी यांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांच्या अधीन राहावे (इफिसकरांस पत्र 5:21). त्याचवेळी देवाने व्यवस्था राखून ठेविण्यासाठी एक अधिकार पातळी ठरविली आहे, "प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे" (करिंथकरांस 1 ले पत्र 11:3). आम्हाला माहीत आहे की ख्रिस्त हा देवापेक्षा कनिष्ठ नाही, जशी पत्नी ही तिच्या पतीपेक्षा कनिष्ठ नाही. तथापि, देव जाणतो, की अधिकाराप्रत अधीनतेवाचून, कुठलीही व्यवस्था नाही. कुटंुबाचे मस्तक म्हणून पतीची जबाबदारी पत्नीवर अगदी तशीच प्रीती करणे आहे जशी तो स्वतःच्या शरीरावर करतो, त्याच बलिदानात्मक पद्धतीने जशी ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो (इफिसकरांस पत्र 5:25-29).
ह्या प्रेमळ नेतृत्वास प्रतिसाद म्हणून, पत्नीला तिच्या पतीच्या अधिकाराच्या अधीन राहणे कठीण जात नाही (इफिसकरांस पत्र 5:24; कलस्सैकरांस पत्र 3:18). तिची मुख्य जबाबदारी पतीवर प्रीती करणे व त्याचा मान राखणे, समंजसपणाने व शुद्धतेने जीवन जगणे, आणि घराची काळजी वाहणे ही आहे (तीताला पत्र 2:4-5). स्त्रीया स्वाभाविकरित्या पुरुषांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे सांभाळ करणार्या असतात कारण त्यांस त्यांच्या मुलांची प्राथमिक देखरेख करणारे म्हणून तयार करण्यात आले होते.
शिस्त आणि शिक्षण संगोपनाची अविभाज्य अंगे आहेत. नीतिसूत्रे 13:24 म्हणते, "जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळींच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीती करणारा होय." जी मुले गैरशिस्त घराण्यांत लहानाची मोठी होतात त्यांस असे वाटते की कोणासही ती हवीशी नव्हती आणि ती स्वतःस अपात्र समजतात. त्यांच्यात निर्देशाची व आत्मसंयमाची उणीव असते, आणि मोठे होत असतांना ते बंड करू लागतात आणि कुठल्याही प्रकारच्या अधिकाराबाबत त्यांच्या मनात थोडा अथवा मुळीच आदर नसतो, देवाबद्दलही नाही. "काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको" (नीतिसूत्रे 19:18). त्याचवेळी, शिस्तीत प्रीतीने समतोल साधावा, अथवा वयात आल्यावर मुलांच्या मनात राग, नैराश्य, आणि बंडखोरपणा असेल (कलस्सैकरांस पत्र 3:21). परमेश्वर जाणतो की शिस्त अथवा ताडन करीत असतांना ते दुःखदायक ठरते (इब्री लोकांस पत्र 12:11), पण जर त्यानंतर प्रेमाने शिकविले, तर ती मुलासाठी अत्यंत फायद्याची ठरते. "बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा" (इफिसकरांस पत्र 6:4).
मुले लहान असतांना त्यांस चर्चकुटुंबात आणि सेवेत सहभागी करणे महत्वाचे आहे. नियमितपणे बायबलवर विश्वास ठेवणार्या मंडळीत जावे (इब्री लोकांस पत्र 10:25), त्यांनी आपणास वचनाचा अभ्यास करतांना पाहावे, आणि आपणही त्यांच्यासोबत अभ्यास करावा. त्यांच्या सभोवतालच्या जगाकडे ते जसे पाहतात त्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करावी, आणि त्यांस रोजच्या जीवनाद्वारे देवाच्या गौरवाविषयी शिकवावे. "मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही" (नीतिसूत्रे 22:6). चांगले आईवडील असणे म्हणजे मुलांचे संगोपन करणे होय जे प्रभुच्या आज्ञेचे पालन करण्यात आणि त्याची उपासना करण्यात आपल्या उदाहरणाचे अनुसरण करतील.
English
चांगले आईबाप होण्याविषयी बायबल काय म्हणते?