प्रश्नः
स्वर्गास जाणे -मी माझ्या सार्वकालिक गंतव्य स्थानाची हमी कशी देऊ शकतो?
उत्तरः
सामना कर. ज्या दिवशी आपण अनंतकाळात प्रवेश करणार आहोत तो आपल्या मनात विचारही येणार नाही इतक्या लवकर येऊ शकतो. त्या क्षणाची तयारी करताना आपल्याला हे सत्य माहित असणे आवश्यक आहे - प्रत्येकजण स्वर्गात जाणार नाही. आपण स्वर्गात जात आहोत हे आपल्याला कसे कळेल? सुमारे २,००० वर्षांपूर्वी, प्रेषित पेत्र आणि योहान यरूशलेमातील मोठ्या जमावाला येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार करीत होते. पेत्राने एक सखोल विधान केले जे आपल्या उत्तर आधुनिक जगामध्येही प्रतिबिंबित होते: “आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये 4:12). म्हणून आता, प्रेषितांची कृत्ये 4:12 राजकीयदृष्ट्या योग्य नाही. आज “प्रत्येकजण स्वर्गात जाईल” किंवा “सर्व मार्ग स्वर्गात घेऊन जातात” ही म्हण लोकप्रिय आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटते की येशूवाचून त्यांना स्वर्ग मिळेल. त्यांना गौरव पाहिजे आहे, परंतु त्यांना वधस्तंभामुळे होणारे दुःख नको, तोही नको जो त्या वधस्तंभावर मेला. बरेच लोक येशूला स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग मानू इच्छित नाहीत आणि दुसरा मार्ग शोधण्याचा त्यांचा निर्धार आहे. परंतु येशू आपल्याला चेतावणी देतो की दुसरा कोणताही मार्ग अस्तित्त्वात नाही आणि हे सत्य नाकारल्याचा परिणाम नरकात अनंतकाळ आहे. त्याने आम्हाला सांगितले की “जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राला नाकारतो त्याला जीवन दिसणार नाही पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो” (योहान 3:36). ख्रिस्तावरील विश्वास स्वर्गात जाण्याची गुरुकिल्ली आहे.
काही लोक असा वाद घालतात की स्वर्गास केवळ एकच मार्ग प्रदान करणे ही देवाची अत्यंत संकुचित मनाची भावना आहे. परंतु, अगदी स्पष्टपणे सांगायचे तर, मनुष्यांनी देवाच्या विरुद्ध केलेल्या बंडाळीच्या प्रकाशात, स्वर्गात जाण्याचा कोणताही मार्ग आपल्याला प्रदान करणे हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्ही न्यायास पात्र आहोत, परंतु देव आपल्या पापांसाठी मरण्याकरिता त्याच्या एकुलता एक पुत्राला पाठवून आम्हाला सुटकेचा मार्ग दाखवितो. एखाद्या या मार्गास संकुचित किंवा व्यापक म्हणून पाहत असला तरीही ते सत्य आहे. चांगली बातमी अशी आहे की येशू मरण पावला आणि पुन्हा उठला; जे स्वर्गात जात आहेत त्यांना विश्वासाने ही सुवार्ता मिळाली आहे.
पुष्कळ लोक आज मिळमिळीत सुवार्ता बाळगतात जे पश्चात्ताप करण्याची गरज दूर करते. त्यांना एका “प्रेमळ” (निःपक्षपाती) देवावर विश्वास ठेवायचा आहे ज्याने कधीही पापाचा उल्लेख केला नाही आणि ज्याला त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही. ते असे म्हणू शकतात, “माझा देव कधीही माणसाला नरकात पाठवणार नाही.” परंतु येशू स्वर्गापेक्षा नरकाबद्दल अधिक बोलला, आणि स्वर्गात जाण्याचे एकमेव साधन देणारा आमचा तारणारा म्हणून स्वतःला सादर केले: “मी मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही “(योहान 14:6).
देवाच्या राज्यात खरोखर कोण प्रवेश करेल? मी स्वर्गात जात आहे याची हमी मी कशी देऊ शकतो? बायबलमध्ये ज्यांना सार्वकालिक जीवन आहे आणि ज्यांना ते नाही त्यांच्यात स्पष्ट फरक आहे: “ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; आणि ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.” (1 योहान 5:12). ही सर्व विश्वासाची बात आहे. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना देवाची मुले बनविले जाते (योहान 1:12). जे लोक त्यांच्या पापांसाठी मोबदला म्हणून येशूच्या बलिदानाचा स्वीकार करतात आणि ज्यांचा त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास आहे ते स्वर्गात जात आहेत. जे ख्रिस्त नाकारतात ते नाही. “जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येणार नाही, जो विश्वास ठेवीत नाही त्याचा निवाडा होऊन चुकला कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही” (योहान 3:18).
ज्यांनी येशू ख्रिस्ताला त्यांचा तारणारा म्हणून स्वीकारले त्यांच्यासाठी स्वर्ग जितका आश्चर्यकारक असेल तितकाच जास्त भयानक त्याला नाकारणाऱ्यासाठी नरक असेल. बायबल पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कोणीही गंभीरपणे ते वाचू शकत नाही - सीमा ठरविलेली आहे. बायबल सांगते की स्वर्गात जाण्याचा एकच आणि एकच मार्ग आहे - येशू ख्रिस्त. येशूच्या आज्ञेचे अनुसरण करा: “अरुंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत” (मत्तय 7:13-14).
स्वर्गात जाण्याचे एक माध्यम म्हणजे येशूवरील विश्वास. ज्यांचा विश्वास आहे त्यांना तिथे जाण्याची हमी आहे. आपण येशूवर विश्वास ठेवता का?
English
स्वर्गास जाणे -मी माझ्या सार्वकालिक गंतव्य स्थानाची हमी कशी देऊ शकतो?