नोहाचा जलप्रलय जागतिक होता अथवा स्थानिक?


प्रश्नः नोहाचा जलप्रलय जागतिक होता अथवा स्थानिक?

उत्तरः
जलप्रलयासंबंधीचा बायबलचा उतारा हे स्पष्ट करतो की तो प्रलय जागतिक होता. उत्पत्ती 7:11 म्हणते की "महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची द्वारे उघडली." उत्पत्ती 1:6-7 आणि 2:6 आम्हास सांगते की जलप्रलयापूर्वीचे वातावरण आज आपण अनुभव करीत असलेल्या वातावरणापेक्षा फार वेगळे होते. ह्या आणि इतर बायबल वर्णनांच्या आधारे, योग्य अनुमान लावता येते की एकेकाळी पृथ्वी एक प्रकारच्या जलमंडपाने आच्छादलेली होती. हा मंडप वाफेचा मंडप असावा, अथवा त्यात वलयांचा समावेश असावा, शनि ग्रहाच्या बर्फवलयांसारखे काहीसे. जमीनीखालील पाण्याच्या थरासोबत, हे पृथ्वीवर सोडले गेले (उत्पत्ती 2:6) ज्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगात जलप्रलय आला.

जलप्रलयाचा व्याप दाखविणारी सर्वात स्पष्ट वचने आहेत उत्पत्ती 7:19-23. "पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्îा आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडविले. पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले; ह्याप्रमाणे सर्व पर्वत झांकून गेले. तेव्हा पृथ्वीवर सचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतु व सर्व मानव मरण पावले; ज्यांच्या म्हणून नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरले झाडून सारे मेले. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रागणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला. ती पृथ्वीवरून नाहीशी झाली; नोहा व त्याजबरोबर तारवांत होते तेवढे मात्र वाचले."

वरील परिच्छेदात, आम्हाला "सर्व" हा शब्द वारंवार आढळून येतो, पण सोबतच असेही दिसून येते की, "त्याने सगळ्îा आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडविले," "पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व ...सर्व उंच पर्वत बुडविले. पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले; ह्याप्रमाणे सर्व पर्वत झांकून गेले," आणि "पृथ्वीवर सचार करणारे सर्व प्राणी सारे मेले." ही वर्णने स्पष्टपणे संपूर्ण पृथ्वीस व्यापून टाकणार्‍या जागतिक जलप्रलयाचे वर्णन करतात. तसेच, जर जलप्रलय स्थानिक असता, तर देवाने नोहाला दुसर्‍या जागी जाण्यास व सर्व प्राण्यांस दुसर्‍या जागी नेण्यास सांगण्याऐवजी तारू बनविण्याची आज्ञा का दिली असती? आणि त्याने नोहाला पृथ्वीवर आढळणार्‍या सर्व वेगवेगळîा पशुंना सामावून घेईल इतके मोठे जहाज बनविण्याची आज्ञा का दिली? जर जलप्रलय वैश्विक नसता, तर तारू अथवा जहाज बनविण्याची गरज नसती.

पेत्र देखील पेत्राचे 2 रे पत्र 3:6-7 मध्ये महाप्रलयाच्या जगव्यापी स्परूपाचे वर्णन करतो, जेथे तो म्हणतो, "त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला; पण आतांचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेविलेली आहेत." ह्या वचनांत, पेत्र नोहाच्या काळातील जलप्रलयाची येणार्‍या "सार्वत्रिक" न्यायाशी तुलना करतो आणि सांगतो की त्यावेळी जे जग अस्तित्वात होते त्याचा पाण्याने नाश झाला. याशिवाय, अनेक बायबल लेखकांनी जागतिक जलप्रलयाच्या ऐतिहासिकतेचा स्वीकार केला आहे (यशया 54:9; पेत्राचे 1 ले पत्र 3:20; पेत्राचे 2 रे पत्र 2:5; इब्री लोकांस पत्र 11:7). शेवटी, प्रभु येशू ख्रिस्ताचाही सार्वत्रिक जलप्रलयावर विश्वास होता आणि त्याने त्याच्या आगमनाच्या वेळी येणार्‍या जगाच्या नाशाचा प्रकार म्हणून त्याचा स्वीकार केला (मत्तय 24:37-39; लूक 17:26-27).

अनेक बायबलव्यतिरिक्त पुरावे आहेत जे जागतिक जलप्रलयासारख्या सर्वनाशाकडे अंगुलीनिर्देश करतात. प्रत्येक भूखंडावर जीवाश्मांची मोठमोठी स्मशाने आहेत आणि कोळश्यांचे मोठमोठे साठे आहे ज्यांस मोठ्या प्रमाणात वनस्पतींच्या जलद आच्छादनाची गरज भासेल. समुद्री जीवाश्मे जगभरातील पर्वतशिखरांवर आढळून आले आहेत. जगाच्या सर्व भागांतील संस्कृतींत जलप्रलयाविषयी दंतकथा आढळून येतात. ही सर्व तथ्ये आणि आणखी अनेक जागतिक जलप्रलयाचा पुरावा आहेत.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
नोहाचा जलप्रलय जागतिक होता अथवा स्थानिक?