settings icon
share icon
प्रश्नः

सामान्य प्रकटीकरण आणि विशेष प्रकटीकरण म्हणजे काय?

उत्तरः


सामान्य प्रकटीकरण आणि विशेष प्रकटीकरण हे असे दोन मार्ग आहेत ज्यांच्याद्वारे देवाने मनुष्यांना स्वतःला प्रकट करण्यासाठी निवडले. सामान्य प्रकटीकरण देवाबद्दलच्या सामान्य सत्याला संदर्भित करते, ज्याच्याबद्दल आपण निसर्गामधून जाणून घेऊ शकतो. विशेष प्रकटीकरण देवाबद्दलच्या विशिष्ठ सत्याला संदर्भित करते, ज्याला आपण अलौकिक माध्यमातून जाणून घेऊ शकतो.

सामान्य प्रकटीकरणाच्या संदर्भासाठी, स्तोत्रसंहिता 19:1-4 जाहीर करते, “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात”. “या परिच्छेदानुसार, विश्वाचे परीक्षण करण्याद्वारे देवाचे अस्तित्व आणि सामर्थ्य स्पष्टपणे बघितले जाऊ शकते. सृष्टीचा क्रम, जटिलता, आणि चमत्कार हे शक्तिशाली आणि गौरवी निर्मात्याच्या अस्तित्वाबद्दल बोलतात.

सामान्य प्रकटीकरण हे रोमकरांस पत्र 1:20 मधून सुद्धा शिकवले जाऊ शकते, “कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.” स्तोत्रसंहिता 19 सारखेच, रोमकरांस पत्र 1:20 आपल्याला शिकवते की देवाचे सनातन सामर्थ्य आणि देवपण हे त्याने केलेल्या गोष्टींवरून “स्पष्टपणे बघितले” आणि “समजले” जाऊ शकते, आणि त्यामध्ये या गोष्टी नाकारण्यासाठी कसलीही सबब नाही. या वचनांना आठवणीत ठेवून, सामान्य प्रकटीकरणाची चालू व्याख्या “सर्व लोकांसाठी, सर्व काळात आणि सर्व ठिकाणी देवाचे प्रकटीकरण हे सिद्ध करते की देव अस्तित्वात आहे आणि तो सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान, आणि सर्वश्रेष्ठ आहे” अशी होऊ शकते.

विशेष प्रकटीकरण म्हणजे देवाने स्वतःला अलौकिक पद्धतीने प्रकट करण्याचे निवडणे होय. विशेष प्रकटीकरणामध्ये देवाचे भौतिक स्वरूप, स्वप्ने, दृष्टांत, देवाचे लिहिलेले वचन, आणि सर्वात महत्वाचे – येशू ख्रिस्त यांचा समावेश होतो. पवित्र शास्त्र देव भौतिकरित्या प्रकट झाल्याच्या अनेक नोंदी देते (उत्पत्ती 3:8, 18:1; निर्गम 3:1-4, 34:5-7), आणि पवित्र शास्त्र देव लोकांबरोबर स्वप्नाद्वारे (उत्पत्ती 28:12, 37:5; 1 राजे 3:5; दानिएल 2) आणि दृष्टांताद्वारे (उत्पत्ती 15:1; यहेज्केल 8:3-4; दानिएल 7; 2 करिंथ 12:1-7) बोलल्याचे सुद्धा सांगते.

देवाला प्रकट करण्याचे प्राथमिक महत्वाचे साधन हे त्याचे वचन, पवित्र शास्त्र आहे, जे एक प्रकारचे विशेष प्रकटीकरण सुद्धा आहे. देवाने वचनांच्या लेखकांना त्यांच्या स्वतःच्या शैलीत आणि व्यक्तीमत्वांचा वापर करून मनुष्यांसाठींचा त्याचा संदेश अचूकपणे नोंद करण्यासाठी अद्भुतरित्या मार्गदर्शन केले. देवाचे वचन हे जिवंत आणि कार्यक्षम आहे (इब्री 4:12). देवाचे वचन हे प्रेरणा देणारे, फायदेशीर, आणि पुरेसे आहे (2 तीमथ्या 3:16-17). देवाने त्याच्याविषयीचे सत्य लिखित स्वरुपात नोंदवण्याचा निश्चय केला कारण त्याला मौखिक परंपरेची अयार्थता आणि अविश्वसनियता यांची माहिती होती. त्याला हे सुद्धा ज्ञात होते की मनुष्याच्या स्वप्नांचा आणि दृष्टांताचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. देवाची काय अपेक्षा आहे आणि त्याने आपल्यासाठी काय काय केले आहे आणि देवाबद्दल मनुष्याला ज्या गोष्टींना जाणून घेण्याची गरज आहे त्या सर्वांना त्याने पवित्र शास्त्रामधून प्रकट करण्याचे ठरविले.

विशेष प्रकटीकरणाचे अंतिम रूप म्हणजे मनुष्य बनून आलेला येशू ख्रिस्त. देव मनुष्य झाला (योहान 1:1, 14). इब्रीकरांस पत्र 1:1-3 याला उत्तम प्रकारे सारांशीत करते, “देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व वेगवेगळ्या प्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, परंतु या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे बोलला आहे... पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज, व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे,” देव आम्हाला ओळखण्यासाठी, उदाहरण स्थापित करण्यासाठी, शिकवण्यासाठी, स्वतःला आम्हावर प्रकट करण्यासाठी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला लीन करून वधस्तंभावर मरण स्वीकारून तारण देण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या रुपात मनुष्य बनून आला (फिलिप्पैकरांस पत्र 2:6-8). येशू ख्रिस्त हा देवाकडून आलेले अंतिम “विशेष प्रकटीकरण” आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

सामान्य प्रकटीकरण आणि विशेष प्रकटीकरण म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries