बायबल समलिंगी विवाहासंबंधाने/पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यासंबंधी काय म्हणते?


प्रश्नः बायबल समलिंगी विवाहासंबंधाने/पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यासंबंधी काय म्हणते?

उत्तरः
बायबल समलिंगी संबंधाविषयी बोलते, पण ते स्पष्टपणे समलिंगी विवाहाचा/पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यासंबंधीचा उल्लेख करीत नाही. तथापि, हे स्पष्ट आहे, की बायबल समलिंगी संबंधास अनैतिक आणि अस्वाभाविक पाप म्हणून दोषी ठरविते. लेवीय 18:22 समलिंगी यौनसंबंधास घृणास्पद, तिरस्करणीय पाप समजते. रोमकरांस पत्र 1:26-27 घोषणा करते की समलिंगी अभिलाषा आणि कृत्ये लज्जास्पद, अस्वाभाविक, वासनामय, आणि अभद्र आहेत. करिंथकरांस 1 ले पत्र 6:9 सांगते की समलिंगी लोक अनीतिमान आहेत आणि ते देवाच्या राज्याचे वारस ठरणार नाहीत. समलिंगी अभिलाषा आणि कृत्ये या दोन्ही गोष्टींस बायबलमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे, त्यामुळे हे स्पष्ट आहे की समलिंगी "विवाह करणे" ही देवाची इच्छा नाही, आणि, खरे म्हणजे, पाप ठरेल.

बायबल जेव्हा कधी विवाहाचा उल्लेख करते, तेव्हा ते पुरुष व स्त्रीच्यामध्ये असते. विवाहाचा पहिला उल्लेख, उत्पत्ति 2:24, त्याचे वर्णन पुरुषाचे आपल्या आईबापास सोडून त्याच्या पत्नीशी जुळून राहणे असे करते. विवाहासंबंधी सूचनांचा समावेश असलेल्या परिच्छेदांत, जसे करिंथकरांस 1 ले पत्र 7:2-16 आणि इफिसकरांस पत्र 5:23-33, बायबल स्पष्टपणे विवाह पुरुष आणि स्त्रीच्यामध्ये असल्याचे सांगते. बायबलच्या दृष्टीने म्हणता, विवाह हा पुरुष आणि स्त्रीच्यामधील आजीवन संगम होय, मुख्यत्वेकरून कुटुंबाच्या उभारणीसाठी आणि त्या कुटुंबास स्थिर वातावरण देण्यासाठी.

परंतु, केवळ बायबलचा, विवाहाचा हा समज दाखविण्यासाठी उपयोग करावा असे नाही. विवाहसंबंधाने बायबलचा दृष्टिकोण हा जगाच्या इतिहासातील प्रत्येक मानव संस्कृतीत विवाहाचा सार्वत्रिक समज आहे. इतिहास समलिंगी विवाहाविरुद्ध वाद घालतो. आधुनिक जगीक मानसशास्त्रज्ञ हे जाणतात की पुरुष आणि स्त्रीस एकमेकांस पुरक ठरण्यासाठी मानसशास्त्राच्या दृष्टीने आणि भावनात्मक दृष्टीने घडविण्यात आले आहे. कुटुंबासंबंधाने, मानसशास्त्रज्ञ हा युक्तिवाद मांडतात की स्त्री आणि पुरुषाचे मिलन ज्यात दोन्ही जोडीदार उत्तम लैंगिक आदर्श असतात ते उत्तमरित्या समायोजित झालेल्या मुलांचे संगोपन करता येईल असे उत्तम वातावरण होय. मानसशास्त्र समलिंगी विवाहाविरुद्ध वाद घालते. निसर्गात/शारीरिक बळाच्या दृष्टीने, स्पष्टपणे, स्त्री आणि पुरुषांस लैंगिक दृष्टीने एकमेकांसोबत "अनुरूप बसण्यास" घडविण्यात आले होते. यौन समागमाचा "स्वाभाविक" हेतू प्रजनन असल्यामुळे, स्पष्टपणे केवळ स्त्री आणि पुरुषामधील लैंगिक संबंध हा हेतू पूर्ण करू शकतो. निसर्ग समलिंगी विवाहाविरुद्ध वाद घालतो.

म्हणून, जर बायबल, इतिहास, मानसशास्त्र, आणि निसर्ग हे सर्व विवाह स्त्री आणि पुरुषामध्ये असल्यासंबंधाने वाद घालतात — तर आज इतका वादविवाद का? का म्हणून समलिंगी विवाह/पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्याचा विरोध करणार्यांस तिरस्कार करणारे, असहिष्णू मतांध हे नामनिधान दिले जाते, मग ते आपला विरोध कितीही सन्माननीय पद्धतीने का मांडत असेनात? समलिंगी अधिकार चळवळ इतक्या आक्रामक पद्धतीने समलिंगी विवाहास/पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यास प्रोत्साहन का देत आहे — जेव्हा बहुतेक लोक, धार्मिक आणि अधार्मिक, हे समलिंगी दाम्पत्त्यांस सर्व समान हक्क असण्याच्या पक्षात — अथवा कमी विरोधात आहेत — जसे विवाहित दाम्पत्त्यांस आहेत?

बायबलच्या दृष्टीने, उत्तर, हे आहे की प्रत्येक जण आपल्या अंतर्मनात हे जाणतो की समलैंगिकता अनैतिक व अस्वाभाविक आहे, आणि ह्या अंतर्जात ज्ञानाचे दमन करण्याची एकमात्र पद्धत समलैंगिकतेस सामान्य ठरविणे आणि त्याच्या सर्व आणि कोणत्याही विरोधावर हल्ला करणे होय. समलैंगिकतेचे सामान्यिकरण करण्याची उत्तम पद्धत आहे समलिंगी विवाह, पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यास परंपरागत स्त्री व पुरुषांच्या समान पातळीवर ठेवणे. रोमकरांस पत्र 1:18-32 हे समजाविते. सत्य ज्ञात आहे कारण देवाने ते स्पष्ट केले आहे. सत्याचा नाकार करण्यात आला आहे आणि त्याची जागा असत्यास देण्यात आली आहे. मग असत्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे आणि सत्याचे दमन करण्यात आले आहे व त्याच्याविरुद्ध आक्रमण करण्यात आले आहे. समलिंगी अधिकार आंदोलनातील अनेकांद्वारे त्याचा विरोध करणार्‍या कोणत्याही व्यक्तीबद्दल व्यक्त करण्यात आलेला आवेश आणि क्रोध, वस्तुतः, ह्या गोष्टीचे दर्शक आहे की त्यांस माहीत आहे की त्यांचे मत असमर्थनीय आहे. निर्बळ मतावर आपला आवाज उंच करून विजय मिळविण्याचा प्रयत्न करणे ही वादविवादातील सर्वात जुनी युक्ती होय. रोमकरांस पत्र 1:31 या वचनातील आधुनिक समलिंगी अधिकार कार्यावलीत कदाचित यापेक्षा दुसरे कुठलेही यथार्थ वर्णन नसेल, "निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहिन, निर्दय असे आहेत."

समलिंगी विवाह, पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यास मंजूरी देणे समलिंगी जीवनशैलीस मान्यता देणे होय, ज्यास बायबल स्पष्टपणे आणि सतत पापमय म्हणून दोषी ठरविते. ख्रिस्ती लोकांनी समलिंगी विवाह, पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्याच्या कल्पनेविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. याशिवाय, बायबलपेक्षा अगदी वेगळ्या संदर्भातूनसुद्धा समलिंगी विवाह, पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्याविरुद्ध मजबूत आणि तर्कयुक्त वाद आहेत. हे ओळखण्यासाठी की विवाह हा पुरुष आणि स्त्रीच्या मध्ये आहे व्यक्तीस इव्हॅन्जिलिकल ख्रिस्ती असणे जरूरी नाही.

बायबलनुसार, विवाह हा देवाने पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये ठरविला आहे (उत्पत्ति 2:21-24; मत्तय 19:4-6). समलिंगी विवाह, पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करणे हे विवाह संस्थेचा विपर्यास आणि विवाहाची उत्पत्ती करणार्‍या देवाविरुद्ध अपराध आहे. ख्रिस्ती म्हणून, आम्ही पापास सूट देता कामा नये अथवा त्याकडे दुर्लक्ष कामा नये. तर, आम्हास सर्वांसाठी, येशू ख्र्रिस्ताद्वारे, उपलब्ध असलेल्या देवाच्या प्रीतीत व पापांच्या क्षमेत सहभागी झाले पाहिजे, ज्यात समलैंगिकतेचा समावेश आहे. आम्ही प्रेमाने सत्य बोलले पाहिजे (इफिसकरांस पत्र 4:15) आणि "सौम्यतेने आणि भीडस्तपणाने" सत्यासाठी लढले पाहिजे (पेत्राचे 1 ले पत्र 3:15). ख्रिस्ती म्हणून, जेव्हा आम्ही सत्याच्या वतीने उभे राहतो आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला हल्ले, अपमान, आणि छळास तोंड द्यावे लागत असेल, तेव्हा आम्ही येशूचे शब्द लक्षात ठेविले पाहिजेत : "जग जर तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडिले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते" (योहानाचे पत्र 15:18-19).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
बायबल समलिंगी विवाहासंबंधाने/पुरुषाने पुरुषाशी व स्त्रीने स्त्रीशी विवाह करण्यासंबंधी काय म्हणते?