settings icon
share icon
प्रश्नः

देवाची पूर्ण शस्त्रसामग्री काय आहे?

उत्तरः


“देवाची पूर्ण शस्त्रसामग्री” हे वाक्य इफिसकरांस पत्र 6:13-17 मधून आहे: ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.

इफिसकरांस पत्र 6:12 हे स्पष्टपणे सूचित करते की सैतानाशी असलेला संघर्ष हा आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आणि त्याच्या सैन्यावर कोणतीही मूर्त शस्त्रे प्रभावीपणे वापरली जाऊ शकत नाहीत. सैतानाकडून वापरल्या जाणार्‍या विशिष्ट युक्तींची यादी आपल्याला देण्यात आलेली नाही. तथापि, या परिच्छेदामध्ये स्पष्ट केले गेलेले आहे कि, जेंव्हा आपण विश्वासूपणे सर्व सूचनांचे पालन करू तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध उभे राहू शकतो आणि सैतानाच्या कोणत्याही युक्तीची पर्वा न करता आपण विजयी होऊ शकतो.

आपल्या शस्त्रसामग्रीमधील पहिला घटक सत्य आहे (वचन 14). हे समजणे सोपे आहे कारण सैतानाला “लबाडीचा बाप” म्हटले जात (योहान 8:44). देव ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो अशा गोष्टींच्या यादीत फसवणूक शिखरावर आहे. “लबाड बोलणारी जिव्हा” हि “परमेश्वराला वीट” आणणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे असे तो वर्णीत करतो (नीतिसूत्रे 6:16-17). म्हणूनच आपण आपल्या स्वतःच्या पवित्रतेसाठी आणि तारणासाठी आणि ज्यांना आपण साक्ष देतो त्यांच्या फायद्यासाठी आपल्याला सत्यावर उभे राहण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे.

तसेच, वचन 14 मध्ये आपल्याला नीतिमत्त्वाचे उरस्त्राण परिधान करण्यास सांगण्यात आले आहे. उरस्त्राण योध्याच्या महत्त्वपूर्ण अवयवाचे प्राणघाती हल्ल्यापासून संरक्षण करते. नीतिमत्त्व हे मनुष्यांनी केलेली नीतिमान कामे नसून, ते ख्रिस्ताचे नितीमत्व आहे जे देवाद्वारे मनुष्यांस प्रदान करण्यात आणि ते विश्वसाद्वारे प्राप्त करण्यात येते. हे सैतानाच्या आरोपापासून आणि दोषापासून आपल्या अंतःकरणाचे रक्षण करते आणि आपल्या आतील मनुष्यास त्याच्या हल्ल्यांपासून वाचविते.

वचन 15 अध्यात्मिक संघर्षासाठी पायाच्या तयारीविषयी बोलत आहे. युद्धामध्ये, कधीकधी अग्रगण्य सैनिकांच्या मार्गात शत्रूंकडून धोकादायक अडथळे आणले जातात. पादत्राणे म्हणून शांतीच्या सुवार्तेची तयारी करण्याचा सल्ला म्हणजे आपल्याला सैतानाच्या प्रांतात जेथे पुष्कळ सापळे असल्यामुळे तेथे जाण्यासाठी काय आवश्यक आहे तसेच ख्रीस्तासाठी आत्मे जिंकण्यासाठी कृपेचा संदेश अत्यावश्यक आहे हे सूचित करते. सुवार्तेचा प्रसार थांबविण्यासाठी सैतानाकडून मार्गात अनेक अडथळे आणले जातात.

वचन 16 मध्ये सांगितलेली विश्वासाची ढाल हि देव आणि त्याच्या शब्दाची विश्वासयोग्यता याच्या विषयी पेरलेल्या सैतानाच्या शंकांना कुचकामी ठरवते. आपला विश्वास हा सोन्याच्या ढालीसारखा, मौल्यवान, ठोस आणि भरीव आहे आणि ख्रिस्त त्याचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे (इब्रीकरांस पत्र 12:2).

वचन 17 मधील तारणाचे शिरस्त्राण हे डोक जे शरीराचा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे त्याच्या संरक्षणाचे कार्य करते. आपण असे म्हणू शकतो की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीस संरक्षणाची आवश्यकता आहे. डोके हे मनाचे आसन आहे जे अनंतकाळच्या जीवनाच्या सुवार्तेची खात्री बाळगते तेव्हा ते खोटी शिकवण स्वीकारणार नाही किंवा सैतानाच्या मोहांना जागा देणार नाही. तारण न प्राप्त झालेल्या व्यक्तीजवळ तारणाचे शिरस्त्राण नसल्यामुळे त्याला खोट्या शिकवणीचा नाश करण्याची कोणतीही आशा नसून त्याचे मन आध्यात्मिक सत्य आणि आध्यात्मिक फसवणूकीच्या दरम्यान फरक करण्यास असमर्थ असते.

वचन 17 स्वतःहून आत्म्याच्या तलवारीचा अर्थ देवाचे वचन आहे असे सांगते. आत्मिक शस्त्रसामग्रीतील इतर सर्व शस्त्रे स्वभावाने बचावात्मक आहेत तर आत्म्याची तलवार हे देवाच्या शस्त्रास्त्रातील एकमेव शस्त्र असे आहे जे प्रतिकारक आहे. हे देवाच्या वचनाच्या पवित्रतेविषयी आणि शक्तीविषयी बोलते. महान आत्मिक शस्त्र हे बुद्धीगम्य नाही. येशुंच्या अरण्यातील परीक्षेमध्ये देवाचे वचन हे नेहमीच त्याने सैतानाला दिलेले उत्कट प्रतिसाद होते. किती आशीर्वादाची गोष्ट आहे कि हेच शब्द आपल्यासाठी उपलब्ध आहेत!

वचन 18 मध्ये आपणाला देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री परिधान करण्याबरोबर आपल्या पवित्र आत्म्यात (म्हणजे ख्रिस्ताच्या चित्ताने, त्याच्या अंतःकरणाने आणि त्याच्या प्राधान्याने) प्रार्थना करण्याचे सांगण्यात आले आहे. आपण प्रार्थनेकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण प्रार्थनेमुळे आपण देवाकडून आत्मिक सामर्थ्य प्राप्त करतो. प्रार्थनेशिवाय म्हणजे देवावर विसंबून न राहता आत्मिक युद्धातले आपले प्रयत्न रिकामे आणि निरर्थक आहेत. देवाची पूर्ण शस्त्रसामग्री - सत्य, नीतिमत्त्व, सुवार्ता, विश्वास, तारण, देवाचे वचन आणि प्रार्थना - ही एक साधने आहेत जी देवाने आपल्याला दिली आहेत, ज्याद्वारे आपण सैतानाच्या हल्ल्यांवर व मोहांवर मात करून आत्मिकरित्या विजयी होऊ शकतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाची पूर्ण शस्त्रसामग्री काय आहे?
© Copyright Got Questions Ministries