settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र आत्म्याचे फळ काय आहे?

उत्तरः


गलती 5:22-23 आपल्याला सांगते, “आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.” ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा परिणाम म्हणजे पवित्र आत्म्याचे फळ होय. बायबल हे स्पष्ट करते की येशू ख्रिस्तावर जसा व्यक्ती विश्वास ठेवतो त्या क्षणी प्रत्येकाला पवित्र आत्मा प्राप्त होतो (रोम 8:9; 1 करिंथ 12:13; इफिस 1:13-14). ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या येण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे ते जीवन बदलणे होय. आम्हास ख्रिस्ताच्या प्रतिरुपाचे बनविणे आणि आम्हाला आणखी त्याच्यासारखे बनविणे हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे.

गलती 5:19-21 मध्ये पवित्र आत्म्याचे फळ पापी स्वभावाच्या कृतींशी अगदी विपरीत आहे, “देहाची कर्मे तर उघड आहेतय ती ही रू जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणाघर््यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” हा परिच्छेद सर्व लोकांचे वर्णन करतो, वेगवेगळ्या प्रमाणात, जेव्हा ते ख्रिस्ताला ओळखत नव्हते आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली नाहीत. आपले पापमय शरीर आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब दर्शविणारी विशिष्ट प्रकारची फळे उत्पन्न करते आणि पवित्र आत्मा त्याच्या स्वभावास प्रतिबिंबित करणारी फळे उत्पन्न करतो.

खिस्ती जीवन हे ख्रिस्ताने दिलेल्या नवीन स्वभावाविरुद्ध पापमय देहाचे युद्ध आहे (2 करिंथ 5:17). पतीत मानव म्हणून आपण अद्याप पापमय गोष्टींची इच्छा असलेल्या शरीरात अडकलो आहोत (रोम 7:14-25) ख्रिस्ती या नात्याने आपल्यामध्ये पवित्र आत्मा आपले फळ उत्पन्न करतो आणि पापी स्वभावाच्या पापावर विजय मिळविण्यासाठी आपल्याजवळ पवित्र आत्म्याचे सामथ्र्य उपलब्ध आहे (2 करिंथ 5:17; फिलिप्पै 4:13). पवित्र आत्म्याची फळे नेहमी दाखविण्याबाबत ख्रिस्ती व्यक्त कधीही पूर्णपणे विजयी होणार नाही. तरीही ख्रिस्ती जीवनाच्या मुख्य हेतूंपैकी हा एक आहे, की आपल्या जीवनात पवित्र आत्म्याने त्याची अधिकाधिक फळे उत्पन्न करावी - आणि पवित्र आत्म्याला विरोधी पापी इच्छांवर विजय मिळवून देण्याची मुभा देणे. परमेश्वर आपल्या जीवनात आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्याची इच्छा करतो आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने हे शक्य आहे!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र आत्म्याचे फळ काय आहे?
© Copyright Got Questions Ministries