settings icon
share icon
प्रश्नः

देवाने आपल्याला चार शुभवर्तमान का दिले?

उत्तरः


देवाने केवळ एकाऐवजी चार शुभवर्तमाने दिली याची काही कारणे येथे आहेत:

1) ख्रिस्ताचे अधिक संपूर्ण चित्र देण्यासाठी. संपूर्ण बायबल परमेश्वराद्वारे प्रेरित आहे (2 तीमथ्य 3:16), त्याने वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या मानवी लेखकांचा उपयोग त्यांच्या लिखाणातून त्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी केला. शुभवर्तमान लेखकांपैकी प्रत्येकाचा त्याच्या सुवार्तेमागील हेतू वेगळा होता आणि ती उद्दिष्टे पार पाडताना प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीमत्वाच्या आणि सेवाकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर जोर दिला.

मत्तय इब्री प्रेक्षकांना लिहित होता, आणि येशूच्या वंशावळीतून आणि जुन्या कराराच्या भविष्यवाणीची ही पूर्तता की तो मशीहा आहे हे दाखवणे हा त्याचा हेतू होता, आणि अशाप्रकारे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे हा देखील हेतू होता. मत्तयचा जोर या गोष्टीवर आहे की येशू अभिवचन दिलेला राजा, “दाविदाचा पुत्र” आहे, जो इस्राएलाच्या सिंहासनावर सदैव बसेल (मत्तय 927; 21:9).

मार्क, बर्णबाचा मावस भाऊ (कलस्सै. 4:10), ख्रिस्ताच्या जीवनात घडलेल्या घटनांचा तसेच प्रेषित पेत्राचा मित्र असल्यामुळे प्रत्यक्षदर्शी होता. मार्कने विदेशी प्रेक्षकांकरिता लिहिले, हे यावरून दिसून येते की त्याने यहूदी वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा समावेश केला नाही (वंशावळी, ख्रिस्ताने त्याच्या काळातील यहूदी नेत्यांशी केलेला वाद, जुन्या कराराचा वारंवार उल्लेख इ.). मार्क ख्रिस्तावर दुःख सोसणारा सेवक म्हणून जोर देतो, जो सेवा घ्यावयास आला नाही, परंतु सेवा करावयास आणि अनेकांसाठी त्याचे जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला (मार्क 10:45).

“प्रिय वैद्य” (कलस्सै 4:14 केजेव्ही), सुवार्तिक आणि प्रेषित पौलाचा सहकारी लूक याने लूककृत शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये ही दोन्ही लिहिली. केवळ लूक हाच काय तो नवीन कराराचा एकुलता एक यहूदीतर लेखक आहे. वंशावळी व ऐतिहासिक अभ्यासामध्ये ज्यांनी त्याचे लिखाण वापरले त्यांनी त्याचा एक व्यासंगी श्रेष्ठ इतिहासकार म्हणून फार पूर्वी स्वीकार केला आहे. एक इतिहासकार म्हणून, तो असे म्हणतो की जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्या अहवालांच्या आधारे ख्रिस्ताच्या जीवनाविषयी सुव्यवस्थित लेखन लिहिण्याचा त्याचा हेतू आहे (लूक 1:1-4). त्याने विशिष्टरित्या थिओफिलसच्या फायद्यासाठी लिहिले आहे, जो स्पष्टपणे एक प्रतिष्ठित यहूदीतर विदेशी होता, त्याने विदेशी श्रोत्यांस मनात ठेवून आपल्या शुभवर्तमानाची रचना केली, आणि त्याचा हेतू हे दाखविणे आहे की ख्रिस्ती लोकांचा विश्वास हा ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह आहे की ते ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह आणि सत्यापित करण्यायोग्य घटनांवर आधारित आहे. लूक अनेकदा ख्रिस्ताला “मनुष्याचा पुत्र” असे संबोधित करतो, आणि त्याच्या मानवतेवर जोर देतो आणि त्याने अशा अनेक गोष्टी सांगितले आहेत ज्या इतर शुभवर्तमानांत आढळत नाहीत.

प्रेषित योहानाने लिहिलेले योहानाचे शुभवर्तमान इतर तीन शुभवर्तमानांपेक्षा वेगळे आहे आणि त्यात ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी आणि विश्वासाच्या अर्थाविषयी जास्त ईश्वरविज्ञानांसंबंधी माहिती आहे. मत्तय, मार्क आणि लूक यांना सारख्याच शैली आणि आशयामुळे आणि ख्रिस्ताच्या जीवनाचा सारांश मांडणारे शुभवर्तमान म्हणून “सिंनाॅप्टिक गॉस्पल” म्हणून संबोधले जाते. योहानाच्या शुभवर्तमानाची सुरूवात येशूच्या जन्मापासून किंवा पृथ्वीवरील सेवेपासून नव्हे तर मानव म्हणून जगात येण्यापूर्वी देवाच्या पुत्राची कार्ये व गुण यासह होते (योहान 1:14)). योहानाचे शुभवर्तमान ख्रिस्ताच्या ईश्वरत्वावर जोर देते, जसे की “शब्द देव होता” (योहान 1:1), “जगाचा तारणारा” (योहान 4:42), “देवाचा पुत्र“ (वारंवार वापरलेला) आणि “प्रभु व...परमेश्वर” (योहान 20:28) या वाक््प्रचारांचा त्याचा उपयोग. योहानाच्या शुभवर्तमानात, येशू कित्येक “मी आहे” विधानांद्वारे आपल्या ईश्वरत्वाची पुष्टी करतो; त्यापैकी योहान 8:58 सर्वात उल्लेखनीय आहे, ज्यामध्ये तो म्हणतो की “... अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे” (निर्गम 3:13-14 ची तुलना करा). परंतु योहान येशूच्या मानवतेच्या सत्यतेवर देखील भर देतो, आणि ख्रिस्ताच्या मानवतेवर विश्वास नसलेल्या, त्याच्या दिवसातील धार्मिक पंथ, गूढवादींची चूक दाखविणे हा त्याचा हेतू होता. योहानाचे शुभवर्तमान त्याचे लिखाण करण्याचा एक संपूर्ण हेतू स्पष्ट करते: “ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत“ (योहान 20:30-31).

अशाप्रकारे, ख्रिस्ताची चार वेगळी आणि तरीही तितकीच अचूक वर्णनें लिहिल्यामुळे, त्याच्या व्यक्तिमत्वाचे आणि सेवेचे वेगवेगळे पैलू प्रगट झाले आहेत. प्रत्येक वर्णन बेलबुटीदार कापडामध्ये विनलेल्या वेगवेगळîा रंगांच्या धाग्यांसारखे बनते व त्या व्यक्तीचे अधिक परिपूर्ण चित्र तयार करते जो वर्णनाच्या पलीकडे आहे. आपण कधीही येशू ख्रिस्ताविषयी (योहान 20:30) पूर्णपणे समजू शकणार नाही, परंतु तो कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केले याविषयी आपण बरचे काही जाणू शकतो जेणेकरून आपणास त्याच्यावरील विश्वासाद्वारे जीवन प्राप्त व्हावे.

2) आम्हाला त्याच्या वर्णनाच्या सत्यतेचे वस्तुनिष्ठ सत्यापन करण्यास सक्षम करण्यासाठी. बायबल, अगदी प्राचीन काळापासून असे म्हणते की एका प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीच्या आधारे एका व्यक्तीविरूद्ध न्यायालयात न्यायालयीन निर्णय घेता येणार नाही, परंतु दोन किंवा तीन जण ही किमान संख्या आवश्यक होते (अनुवाद 19:15). तरीसुद्धा, येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाची आणि पृथ्वीवरील सेवेबद्दलची वेगवेगळी वर्णने असल्यामुळे आपण त्याच्याविषयी माहितीच्या अचूकतेचे मूल्यांकन करू शकतो.

कोर्टाच्या न्यायालयात विश्वसनीय पुरावे काय आहेत यावर सुप्रसिद्ध आणि मान्य अधिकारी म्हटलेले सायमन ग्रीनलीफ यांनी कायदेशीर दृष्टिकोनातून या चार शुभवर्तमानांची तपासणी केली. त्यांनी नमूद केले की चार शुभवर्तमानात दिलेली प्रत्यक्षदर्शी वर्णने विश्वसनीय, स्वतंत्र स्त्रोतांचे वैशिष्ट्य आहे जे कायद्याच्या न्यायालयात मजबूत पुरावा स्वीकारले जातील - या वर्णनांचे परस्पर सामंजस्य असले तरीही प्रत्येक लेखकाने काही भाग वगळण्याची किंवा इतरांपेक्षा वेगळे तपशील जोडण्याची निवड केली आहे. जर शुभवर्तमानात समान दृष्टिकोनातून लिहिलेल्या त्याच तपशीलांसह नेमकी तीच माहिती असती तर ती संगनमत असल्याचे सूचित करते, म्हणजे एक काळ असा होता की जेव्हा लेखक आधीच त्यांच्या कथा लिहिण्यासाठी “त्यांची कथा सरळ” करण्यासाठी एकत्र जमले होते. शुभवर्तमानातील फरक, अगदी पहिल्या तपासणीनंतर तपशीलांचे अगदी स्पष्ट विरोधाभास, लिखाणांच्या स्वतंत्र स्वरूपाविषयी सांगतात. अशा प्रकारे, चार शुभवर्तमान अहवालांचे स्वतंत्र स्वरुप, त्यांच्या माहितीशी सहमत आहे परंतु दृष्टिकोनातून भिन्न आहे, तपशील किती आहे आणि कोणत्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत, हे सूचित करतात की ख्रिस्ताच्या जीवनाची व सेवांबद्दलची जी साक्ष नोंदविली आहे ती साक्षात आणि विश्वसनीय आहे

3) तत्परतेने धावा करणार्यांस प्रतिफळ देण्यासाठी: प्रत्येक शुभवर्तमानाच्या स्वतंत्र अभ्यासाद्वारे बरेच काही मिळू शकते. पण तरीही येशूच्या सेवेतील विशिष्ट घटनांच्या वेगवेगळ्या अहवालांची तुलना करून बरेच काही प्राप्त करता येऊ शकते. उदाहरणार्थ, मत्तय 14 मध्ये आपल्याला पाच हजारांना भोजन देणे आणि येशूचे पाण्यावरून चालणे याचा अहवाल देण्यात आला आहे. मत्तय 14:22 मध्ये आपल्याला सांगितले आहे की “त्याने लोकांना सोडले तेव्हा त्याने शिष्यांना नावेत बसून आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले.” कोणी विचारेल, त्याने असे का केले? मत्तयाच्या वर्णनात कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही. पण जेव्हा आम्ही मार्क 6 मधील वर्णनाशी ते जोडतो तेव्हा आपण पाहतो की जेव्हा येशूने शिष्यांस अधिकार देऊन जोडीने पाठविले होते त्याद्वारे ते भुते काढून आणि लोकांस बरे करून परत आले. परंतु ते “मोठे डोके“ घेऊन परत आले आणि ते आपली जागा विसरले होते आणि तो आता त्यांस शिकवावयास तयार होता (मत्तय 14:15). तेव्हा, त्यांना संध्याकाळी गालीलाच्या समुद्राच्या पलीकडे त्यांना पाठवून येशू त्यांना दोन गोष्टी दाखवून देतो. स्वतःवर अवलंबून राहून वारा आणि लाटाविरूद्ध पहाट होईपर्यंत संघर्ष करीत असताना (मार्क 6:48-50), त्यांना दिसून येते की 1) ते स्वतःच्या क्षमतेत देवासाठी काहीच साध्य करू शकत नाहीत आणि 2) जर ते त्याचा धावा करतील आणि त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहतील तर त्यांना काहीही अशक्य नाही. देवाच्या वचनाचा जो व्यासंगी विद्यार्थी पवित्रशास्त्राच्या वचनाची दुसर्या शास्त्रवचनाशी तुलना करण्यासाठी वेळ काढतो त्याला अशा अनेक “रत्नांचा” समावेश असलेले कित्येक परिच्छेद असले आढळून येईल.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाने आपल्याला चार शुभवर्तमान का दिले?
© Copyright Got Questions Ministries