settings icon
share icon
प्रश्नः

मजविरुद्ध पाप करणार्यास मी कशी क्षमा करू शकतो?

उत्तरः


प्रत्येकासोबत कधी न कधी वाईट घडले आहे, मन दुखावले आहे, आणि त्याच्याविरुद्ध पाप करण्यात आले आहे. जेव्हा ख्रिस्ती लोकांविरुद्ध अशाप्रकारचे अपराध घडतात तेव्हा त्यांनी कसा प्रतिसाद द्यावा? बायबल अनुसार आम्हास इतरांस क्षमा केली पाहिजे. इफिसकरांस पत्र 4:32 घोषणा करते, "तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्याठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा." त्याचप्रमाणे, कलस्सैकरांस पत्र 3:13 घोषित करते, "एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभुने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा." दोन्ही वचनांत किल्ली ही आहे की जशी देवाने आम्हास क्षमा केली आहे तशीच आम्ही देखील आमच्या सोबतच्या विश्वासणार्यांस क्षमा करावी. आम्ही क्षमा का करतो? कारण आम्हाला क्षमा करण्यात आली आहे! इतरांस आमचे क्षमा करणे आमच्यासाठी देवाच्या क्षमेचे प्रतिबिंब ठरावे.

आमच्याविरुद्ध पाप करणार्यांस क्षमा करण्यासाठी, आम्ही सर्वप्रथम देवाची क्षमा समजून घेतली पाहिजे. देव कुठलीही पूर्व अट न ठेवता सहजच प्रत्येकास क्षमा करीत नाही — जर त्याने असे केले असते, तर प्रकटीकरण 20:14-15 मध्ये अग्नीचे सरोवर नसते. क्षमेस, योग्यप्रकारे समजल्यास, त्यात पाप्याच्या वतीने पश्चाताप आहे आणि देवाच्या वतीने प्रीती व कृपा आहे. प्रीती व कृपा असते, पण पश्चातापाचा बहुधा अभाव असतो. म्हणून, आम्ही एकमेकांस क्षमा करावी ह्या बायबलच्या आज्ञेचा अर्थ असा होत नाही की आम्ही पापाकडे डोळेझाक करावी. याचा अर्थ असा आहे की आम्ही आनंदाने, कृपेने, प्रेमाने पश्चाताप करणार्यास क्षमा करावी. आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही नेहमीच क्षमा करण्यास इच्छुक असतो. केवळ सात वेळा नव्हे, तर "साताच्या सत्तर" वेळा (मत्तय 18:22, के.जे.वी.). क्षमेची विनंती करणार्या एखाद्या व्यक्तीस क्षमा करण्यास नाकार देणे क्रोध, कटुत्व, आणि राग दर्शविते, यापैकी कुठलाही गुण खर्या ख्रिस्ती व्यक्तीचा गुण नाही.

आमच्याविरुद्ध पाप करणार्यास क्षमा करण्यासाठी धैर्य आणि सहनशीलतेची गरज भासते. मंडळीला आज्ञा देण्यात आलेली आहे की तिने "प्रत्येकाबरोबर सहनशीलतेने वागावे" (थेस्सलनीकाकरांस 1 पत्र 5:14). आम्ही व्यक्तिगत चुका आणि लहानसहान अपराधांकडे दुर्लक्ष करण्यास शिकावे. येशूने म्हटले, "जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर" (मत्तय 5:39). "तोंडावरील प्रत्येक चपाटीस" प्रतिसादाची गरज नसते.

आमच्याविरुद्ध पाप करणार्यास क्षमा करण्यासाठी आमच्या जीवनात देवाच्या परिवर्तनकारी सामर्थ्याची गरज आहे. पतीत मानव स्वभावात खोलवर असे काय आहे जे बदला घेण्यास व्याकुळ होते आणि कुठल्यातरी प्रकारे सूड घेण्याची इच्छा धरते. आम्ही स्वभावतःच आम्हास दुखापत करणार्या व्यक्तीस तशाच प्रकारची दुखापत करू इच्छितो — डोळ्याबद्दल डोळा न्यायपूर्ण वाटतो. परंतु, ख्र्रिस्ताठायी, आम्हास आमच्या शत्रूंवर प्रीती करण्याचे, आमचा हेवा करणार्याचे बरे करण्याचे, शाप देणार्यास आशीर्वाद देण्याचे, आणि वाईट करणार्यासाठी प्रार्थना करण्याचे सामर्थ्य देण्यात आले आहे (पाहा लूक 6:27-28). येशू आम्हास असे अंतःकरण देतो जे क्षमा करण्यास इच्छुक आहे आणि त्या हेतूने कार्य करील.

परमेश्वर देवाने आमच्या अपराधांची किती मोठ्या प्रमाणात क्षमा केली आहे त्याचा विचार जेव्हा आम्ही करतो, तेव्हा आमच्याविरुद्ध पाप करणार्यांस क्षमा करणे सोपे जाते. आमच्यावर कृपेची वृष्टी करण्यात आली आहे आणि म्हणून आम्हास इतरांपासून कृपा रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. कोणीही व्यक्ती आम्हाविरुद्ध पाप करीत त्यापेक्षा आम्ही देवाविरुद्ध कितीतरी अधिक पाप केले आहे. मत्तय 18:23-35 मधील येशूचा दाखला ह्या सत्याचे सामर्थ्यशाली उदाहरण आहे.

देव अभिवचन देतो की जेव्हा आम्ही त्याजकडे क्षमा मागत येतो, तेव्हा तो ती मुक्तपणे देतो (1 योहान 1:9). जे आम्हास क्षमा मागतात त्यांस आम्ही जी कृपा देऊ करतो ती सुद्धा तितक्याच सहजपणे उपलब्ध असावी (लूक 17:3-4).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मजविरुद्ध पाप करणार्यास मी कशी क्षमा करू शकतो?
© Copyright Got Questions Ministries