settings icon
share icon
प्रश्नः

जर माझे तारण झाले आहे आणि माझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, तर मी पाप करणे का सुरु ठेवू शकत नाही?

उत्तरः


प्रेषित पौल अगदी यासारख्याच प्रश्नाचे उत्तर रोमकरांस 6:1-2 मध्ये देतो, “तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?” एखादा व्यक्ती तारणासाठी “येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो” आणि नंतर तो अगोदर जसे जगत होता तसेच जगत राहतो, ही संकल्पना पूर्णपणे पवित्र शास्त्राच्या बाहेरील आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवीन उत्पत्ती आहे (2करिंथकरांस पत्र 5:17). पवित्र आत्मा आपल्याला देहाची कार्ये उत्पन्न करण्यापासून वाचवितो (गलतीकरांस पत्र 5:19-21) आणि आत्म्याची कार्ये उत्पन्न करण्यापर्यंत बदलतो (गलतीकरांस पत्र 5:22-23). ख्रिस्ती जीवन हे बदललेले जीवन आहे कारण ख्रिस्ती लोक हे बदललेले लोक आहेत.

ख्रिस्तीत्व हे देवाने आपल्यासाठी येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे काही केले यावर आधारित आहे-दैवी सिद्धी, आणि हेच ख्रिस्तीत्वाला इतर धर्मापासून वेगळे करते. जगातील इतर सर्व धर्म हे यावर आधारित आहेत की देवाची मर्जी आणि क्षमा मिळवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे-मानवी संपादन. इतर प्रत्येक धर्म हे शिकवतो की, देवाचे प्रेम आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी आपण काही विशिष्ठ गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही विशिष्ठ गोष्टी सोडल्या पाहिजेत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ख्रिस्तीत्व हे शिकवते की, ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे आपण काही विशिष्ठ गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही विशिष्ठ गोष्टी सोडल्या पाहिजेत.

कसे एखादा व्यक्ती ज्याची पापाच्या दंडापासून, सार्वकालिक नरकापासून सुटका झाली असेल तो परत आधीचे नरकाच्या मार्गाने जाणारे जीवन जगू शकतो? कसे एखादा व्यक्ती, जो पापाच्या मलीनतेपासून शुद्ध झाला आहे, त्याची परत दुराचाराच्या खड्ड्यात जाण्याची इच्छा होऊ शकते? कसे एखादा व्यक्ती, हे जाणून की येशू ख्रिस्ताने आपल्या वतीने काय केले आहे, असे जीवन जगू शकतो की जसा तो काहीच महत्वाचा नाही? कसे एखादा व्यक्ती, आपल्या पापासाठी ख्रिस्ताचा किती छळ झाला याची जाणीव होऊनसुद्धा पुन्हा पाप करत राहतो जणू काय त्या छळाला काहीच अर्थ नाही?

रोमकरांस पत्र 6:11-15 असे सांगते कि, “तसे तुम्हीही ख्रिस्त येशुमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. म्हणून, तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका; तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहा, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय? कधीच नाही!”

यानंतर खऱ्याने रुपांतरीत झालेल्यांसाठी पापमय जीवन जगत राहणे हा पर्याय असू शकत नाही. कारण आपल्या रुपांतरणाचा परिणाम हा पूर्णपणे नवीन स्वभाव, आणि परत पापात जीवन न जगण्याच्या आपल्या इच्छा असा होतो. होय, आपण अजून पाप करतो, परंतु आधी जसे आपण त्यामध्ये लोळत होतो, त्याऐवजी आता आपण त्याचा तिरस्कार करतो आणि त्यापासून आपली सुटका होण्याची इच्छा बाळगतो. आपल्या वतीने ख्रिस्ताने केलेल्या बलिदानाचा “गैरफायदा” घेऊन पापमय जीवन जगत राहण्याची संकल्पना ही विचार सुद्धा न करवणारी संकल्पना आहे. ख्रिस्ती ज्याची ख्रीस्तासाठी जगण्याची इच्छा नाही, परंतु त्याऐवजी अविश्वासी लोकांच्यासारखेच ते सुद्धा जीवन जगत असल्याचे आढळतात, त्यांनी स्वतःचे परीक्षण करून हे जाणण्याची गरज आहे की, खरोखर त्यांनी ख्रिस्ताला स्वतःचा तारणहार म्हणून स्वीकारले होते काय. “तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. (2 करिंथकरांस पत्र 13:5).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

जर माझे तारण झाले आहे आणि माझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, तर मी पाप करणे का सुरु ठेवू शकत नाही?
© Copyright Got Questions Ministries