settings icon
share icon
प्रश्नः

फिलिओक क्लॉज म्हणजे काय?

उत्तरः


“फिलिओक क्लॉज” पवित्र आत्म्याच्या संबंधात चर्चमध्ये एक वादग्रस्त कलम होते आणि अजूनही आहे. प्रश्न असा आहे की, “पवित्र आत्मा कोणाकडून आला, पित्याकडून, की पिता आणि पुत्राकडून?” लॅटिनमध्ये “फिलिओक” शब्दाचा अर्थ “आणि पुत्रे” आहे. याला “फिलिओक क्लॉज” असे संबोधले जाते कारण नायसीन मतांगिकारात “आणि पुत्र” हा शब्द जोडला गेला होता, ज्यावरून असे सूचित होते की पवित्र आत्मा पित्याकडून “आणि पुत्राकडून”आला आहे. या विषयावर इतका वाद झाला की अखेरीस सन 1054 मध्ये रोमन कॅथोलिक आणि पूर्व ऑर्थोडॉक्स चर्चंमध्ये फूट पडली. दोन मंडळ्या अजूनही फिलिओक कलमवर सहमत नाहीत.

योहान 14:26 आपल्याला सांगते, “तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.” योहान 15:26 आपल्याला सांगते, “परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.” तसेच योहान 14:ं6 आणि फिलिप्पै 1:19 ही वचने पहा. या शास्त्रवचनांमधून असे दिसून येते की आत्मा पिता आणि पुत्राद्वारे पाठविला गेला आहे. फिलिओक कलममधील अत्यावश्यक बाब म्हणजे पवित्र आत्म्याच्या ई्श्वरत्वाचे रक्षण करण्याची इच्छा. बायबल स्पष्टपणे शिकवते की पवित्र आत्मा परमेवर आहे (प्रेषितांची कृत्ये 5:3-4). जे लोक फिलिओक क्लॉजला विरोध करतात त्यांचा विश्वास आहे की पिता आणि पुत्राकडून पवित्र आत्मा आला आहे आणि त्यामुळे तो पिता आणि पुत्र यांच्या अधीनस्थ” आहे. जे लोक या फिलिओक कलमेचे समर्थन करतात त्यांचा असा विश्वास आहे की पिता आणि पुत्रापासून येणारा पवित्र आत्मा पिता आणि पुत्राबरोबर तितकाच परमेश्वर असल्याचा त्याचा प्रभाव पडत नाही.

तसेच फिलिओक क्लॉज वादात, देवाच्या व्यक्तित्वाचा अशा पैलूचा समावेश आहे जो आपण कधीही पूर्ण आकलन करू शकणार नाही. देव, जो अनंत आहे, तो आपल्या मर्यादित मानवी मनांना शेवटी समजण्यायोग्य नाही. पवित्र आत्मा देव आहे आणि येशू ख्रिस्ताची “जागा” घेण्यासाठी म्हणून देवाने त्याला येथे पृथ्वीवर पाठविले. पवित्र आत्मा पित्याद्वारे किंवा पिता आणि पुत्राद्वारे पाठविला गेला की नाही या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे देता येत नाही, किंवा तसे करण्याचीही गरजही नाही. फिलिओक कलम कदाचित एक विवादच राहील.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

फिलिओक क्लॉज म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries