settings icon
share icon
प्रश्नः

आम्ही पवित्र आत्म्यास अनुभवण्यात सक्षम असले पाहिजे काय?

उत्तरः


पवित्र आत्म्याच्या काही सेवाकार्यांमध्ये पाप, सांत्वन आणि सशक्तिकरणाबद्दल खात्री यासारख्या भावना असू शकतात, परंतु पवित्र आत्म्याशी आपला संबंध आपल्याला कसे किंवा काय वाटते यावर आधारित करण्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला शिकवीत नाही. नव्याने जन्मलेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याठायी पवित्र आत्मा वसतो. येशूने आम्हाला सांगितले की जेव्हा कैवारी येईल तेव्हा तो आमच्याबरोबर व आमच्यामध्ये राहील. “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईलय अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील” (योहान 14:16-17) दुसर््या शब्दांत, येशू स्वतःसमान एखाद्यास आमच्याबरोबर व आमच्यामध्ये राहण्यासाठी पाठवित आहे.

आम्हाला माहित आहे की पवित्र आत्मा आपल्याबरोबर आहे कारण देवाचे वचन सांगते की ते तसे आहे. प्रत्येक नव्याने जन्मलेल्या विश्वासणाऱ्यामध्ये पवित्र आत्म्याचा वास असतो, परंतु प्रत्येक विश्वासणारा पवित्र आत्म्याने नियंत्रित केलेला नसतो आणि यात एक स्पष्ट फरक आहेे. जेव्हा आपण आपल्या देहात पाऊल पुढे टाकतो तेव्हा जरी अद्याप पवित्र आत्म्याचा वास आमच्याठायी असला तरीही आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली नसतो. प्रेषित पौल या सत्यावर आपले विचार व्यक्त करतो आणि तो एक उदाहरण सांगतो जे आपल्याला समजण्यात मदत करते. “द्राक्षारसाने मस्त होऊ नकाय द्राक्षारसात बेतालपणा आहेय पण आत्म्याने परिपूर्ण व्हा”(इफिस 5:18). अनेक लोक हे वचन वाचतात आणि याचा अर्थ असा लावतात की प्रेषित पौल द्राक्षरसाविरुद्ध बोलत आहे. तथापि, या परिच्छेदाचा संदर्भ आत्म्याने-भरलेल्या विश्वासणाऱ्याची चाल आणि युद्ध आहे. म्हणून, येथे जास्त प्रमाणात मद्यपान करण्याबद्दल चेतावणी देण्यावाचून यात आणखी काही आहे.

जेव्हा लोक जास्त मद्य प्यालेले असतात तेव्हा ते विशिष्ट वैशिष्ट्ये दर्शवितात: ते अभद्र व्यवहार करतात, त्यांचे बोलणे अस्पष्ट असते आणि त्यांची निर्णयशक्ती निर्बळ अशक्त होते. प्रेषित पौल येथे तुलना करीत आहे. ज्याप्रमाणे काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत ज्याद्वारे अशा एखाद्या व्यक्तीस ओळखले जाते ज्यावर मद्याचे नियंत्रण असते, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित असलेल्या एखाद्यास ओळखण्याची विशिष्ट वैशिष्ट्ये देखील असली पाहिजेत. आम्ही गलती 5:22-24 मध्ये आत्म्याच्या फळांविषयी वाचतो. हे पवित्र आत्म्याचे फळ आहे, आणि हे त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या पुन्हा नव्याने जन्मलेल्या विश्वासणाऱ्याद्वारे दर्शविले जाते.

इफिस 5:18 मधील क्रियापद काल पवित्र आत्म्याद्वारे सतत “भरले” जाण्याची क्रिया सूचित करते. हा एक उपदेश आहे म्हणूनच, हे आत्म्याने भरलेले असणे किंवा नियंत्रित नसणे देखील शक्य आहे असे म्हणतात. बाकीचे इफिस 5 आपल्याला आत्म्याने भरलेल्या विश्वासणाऱ्याची वैशिष्ट्ये सांगतात. “स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवाय आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा; आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा” (इफिस 5:19-21).

आम्ही आत्म्याने यासाठी पूर्ण झालेले नाही कारण आपल्याला तसे वाटते, परंतु ख्रिस्ती व्यक्तीचा हा विशेषाधिकार व संपत्ती आहे. आत्म्याने भरलेले किंवा नियंत्रित असणे परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याचा परिणाम आहे. ही कृपेचे कृपादान आहे आणि भावनात्मक बोध नाही. भावना आपल्यास फसवू शकतात आणि फसवितात आणि आपण स्वतःला भावनात्मक वेडाने उत्मत करू शकतो जे पूर्णपणे देहाद्वारे येते आणि पवित्र आत्म्यापासून नव्हे.

“मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही....आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे” (गलती 5:16,25).

असे म्हटल्यावर आपण हे नाकारू शकत नाही की असेही काही वेळा होते जेव्हा आपण आत्म्याच्या सामर्थ्याने आणि प्रेमाने भारावून जाऊ शकतो आणि बरेचदा हा एक भावनात्मक अनुभव असतो. जेव्हा हे घडते तेव्हा हा इतरांसारखा आनंद नसतो. जेव्हा कराराचा कोश यरुशलेमाला आणला गेला तेव्हा राजा दावीद “आवेशाने नृत्य करीत चालला” (2 शमुवेल 6:14). आत्म्याद्वारे आनंद अनुभवणे ही समजूत आहे की देवाची मुले म्हणून आपण त्याच्या कृपेने आशीर्वादित होत आहोत. तर, पूर्णपणे, पवित्र आत्म्याच्या सेवेमध्ये आपल्या भावना आणि जाणीव यांचा समावेश असू शकतो. त्याच वेळी, पवित्र आत्मा आपल्याला मिळाल्याचे आश्वासन आपल्याला कसे वाटते यावर आधारित नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आम्ही पवित्र आत्म्यास अनुभवण्यात सक्षम असले पाहिजे काय?
© Copyright Got Questions Ministries