settings icon
share icon
प्रश्नः

देवाचे भय राखणे म्हणजे काय?

उत्तरः


अविश्वासणाऱ्यासाठी, देवाचे भय म्हणजे देवाचा निवाडा आणि अनंतकाळच्या मृत्यूची भीती, जे देवापासून अनंतकाळचे अंतर आहे (लूक 12:5; इब्री 10:31). विश्वासणाऱ्यासाठी, देवाची भीती ही बरीच वेगळी आहे. विश्वासणाऱ्याची भीती हा देवाचा आदर आहे. इब्री लोकांस 12:28-29 याचे चांगले वर्णन आहे: “म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू; कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’” ख्रिस्ती लोकांमध्ये देवाची भिती म्हणजे देवाबद्दल भययुक्त आदर होय. आपल्यासाठी विश्वाच्या निर्मात्यास शरण जाण्यासाठी हे एक प्रेरक घटक आहे.

नीतिसूत्रे 1:7 घोषित करते, “परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” जोपर्यंत आपण देव कोण आहे हे समजून घेत नाही आणि त्याच्याविषयी आदरयुक्त भीती बाळगत नाही तोपर्यंत आपल्याजवळ खरी बुद्धी असू शकत नाही. देव कोण आहे आणि तो पवित्र, न्यायी आणि नीतिमान आहे हे समजून घेतल्यावरच सत्य ज्ञान अथवा बुद्धी प्राप्त होते. अनुवाद 10:12, 20-21 मध्ये असे नमूद केले आहे: “तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे, आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत. तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होतेय पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील ताऱ्याप्रमाणे बहुगुणित केली आहे.“ परमेश्वराचे भय त्याच्या मार्गाने चालण्याचा, त्याची सेवा करण्याचा आणि होय, त्याच्यावर प्रेम करण्याचा आधार होय.

काही लोक त्याला “आदर” देणे म्हणून देवाची भीती पुन्हा परिभाषित करतात. देवाचे भय धरण्याच्या संकल्पनेत आदर नक्कीच सामील झाला आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी बरेच काही आहे. विश्वासणाऱ्यासाठी, देवाबद्दल बायबल आधारित भीतीमध्ये, देव पापाचा किती द्वेष करतो हे समजून घेणे आणि पापांबद्दल त्याच्या न्यायदंडाची भीती बाळगणे समाविष्ट आहे - विश्वासणाऱ्याच्या जीवनातही. इब्री 12:5-11 मध्ये विश्वासणाऱ्यासाठी देवाच्या शिस्तीचे वर्णन केले आहे. हे प्रेमात केले जात असतानांही (इब्री 12:6) ही एक भयानक गोष्ट आहे. मुले म्हणून, आपल्या पालकांकडून शिस्तीची भीती बाळगल्यामुळे काही वाईट कृत्ये रोखली गेली. देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधातही हेच असले पाहिजे. आपण त्याच्या शिस्तीची भीती बाळगली पाहिजे आणि म्हणूनच आपले जीवन अशा मार्गाने जगावे जे त्याला आवडेल.

विश्वासणारयांनी देवास घाबरू नये. त्याची भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. आमच्याजवळ त्याचे अभिवचन आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही (रोम 3:38-39). आमच्याजवळ त्याचे अभिवचन आहे की तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही (इब्री 13:5). देवाचे भय धरणे म्हणजे त्याच्याबद्दल इतका आदर बाळगणे की आपल्या जीवनशैलीवर याचा मोठा परिणाम होतो. देवाची भीती धरणे म्हणजे त्याचा आदर करणे, त्याचे आज्ञापालन करणे, त्याच्या शिस्तीच्या अधीन राहणे, आणि भययुक्त आदराने त्याची उपासना करणे होय.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाचे भय राखणे म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries